AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trending: वैज्ञानिकांनी बनवला श्वासोच्छ्वासाने नियंत्रित होणारा कृत्रिम हात

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी लहान मुलांसाठी एक कृत्रिम हात विकसित केला आहे. त्याचे वैशिष्ट्य हे की घालणाऱ्या व्यक्तीच्या श्वासोच्छ्वासानुसार या कृत्रिम हाताची (Prosthetic Hand) हालचाल होते व तो नियंत्रित होतो.

Trending: वैज्ञानिकांनी बनवला श्वासोच्छ्वासाने नियंत्रित होणारा कृत्रिम हात
कृत्रिम हात Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 3:52 PM

वैज्ञानिक वेळोवेळी नवनवीन शोध (Science Experiment) लावत असतात. मानवजातीच्या प्रगतीसाठी काही शोध लाभदायक ठरतात. आणि नव्या गोष्टींचा विकासही होत असतो. असाच एक शोध इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील (Oxford University) वैज्ञानिकांनी लावला आहे. त्यांनी लहान मुलांसाठी कृत्रिम हात (Prosthetic Hand) विकसित केला आहे. त्याचे वैशिष्ट्य हे की या हाताची हालचाल , तो घालणाऱ्या व्यक्तीच्या श्वासोच्छ्वासानुसार होते व त्यामुळेच हात नियंत्रितही करता येतो. एका रिपोर्टनुसार, हा कृत्रिम हात वजनाने अतिशय हलका (Very light weight)आहे. त्यामुळे त्याची हालचालही सहजरित्या होऊ शकते. तसेच त्याची देखभालही सहज करत येऊ शकते. विशेष गोष्ट म्हणजे या उपकरणाची ( कृत्रिम हात) किंमतही फार महाग नाही.

कोणाला मिळेल याचा लाभ ?

हे सुद्धा वाचा

खूप लहान या कृत्रिम हाताचा (Prosthetic Hand) लाभ किंव उपयोग विशेषत्वाने त्या मुलांना होईल, जे खूप लहान आहेत अथवा ज्यांचे विद्यमान शरीर कृत्रिम हातांसाठी अनुपयुक्त ठरते. ज्यासाठी हार्नेस आणि केबलची आवश्यकता लागते. अशा मुलांसाठी श्वासोच्छ्वासावर नियंत्रित होणारा हात हा नक्कीच एक वरदान ठरू शकेल.

कसे होणार कृत्रिम हाताचे नियंत्रण ?

संशोधकांनी 29 जुलै रोजी प्रोस्थेसिस नावाच्या जर्नलमध्ये काही निष्कर्ष प्रकाशित केले होते. त्यानुसार, हा कृत्रिम हात केवळ श्वासोच्छ्वासावर नियंत्रित होतो. म्हणजेच जी व्यक्ती किंवा लहान मूल हा कृत्रिम हात परिधान करेल, त्याच्या श्वासानुसार या हाताची हालचाल होईल व तीच व्यक्ती त्याचे नियंत्रण करू शकेल. याचा ( कृत्रिम हाताचा) वापर करण्यासाठी लहान मुलाला श्वास घ्यावा लागेल आणि एक ब्लेड रहीत टर्बाईनला उर्जा मिळून तो कृत्रिम बोटांना नियंत्रित करेल. त्या उर्जेसाठी आवश्यक असलेली हवा, लहान मुल श्वासोच्छ्वासाच्या माध्यमातून सहज उत्पन्न करू शकतात. आणि या उपकरणाची रचना अशी करण्यात आली आहे, त्यावरून ते एखादी गोष्ट किती झटकन पकडेल, हे समजू शकेल.

सध्याच्या कृत्रिम हातांपेक्षा हे अधिक चांगले

सध्या उपलब्ध असलेल्या कृत्रिम हातांच्या तुलनेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी डिझाईन केलेला हा कृत्रिम हात वापरणे आणि त्याची देखभाल करणे अधिक सोपे आहे. आत्तापर्यंत वापरण्यात येणारे कृत्रिम हात बऱ्याच तारांवर अवलंबून असतात, ज्याची निगा राखण्यासाठी बराच खर्च येऊ शकतो. कारण त्याची स्थापना करणे व देखभाल करणे यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. संशोधकांच्या सांगण्यानुसार, ज्यांच्याकडे केबल तंत्रज्ञानासह असलेले कृत्रिम हात उपलब्ध नसतील. (Old Technique Expensive Prosthetic Hand) अशा वंचित देशातील तरूणांनाही श्वासावर नियंत्रित होणाऱ्या कृत्रिम हाताचा खूप लाभ होईल.

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.