Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही दुखणं सांगतात तुम्हाला थंडी बाधली…त्यामुळे घ्या काळजी कारण मुंबईत अचानक थंडी वाढली…

Health Tips : थंडी वाजली की आपल्याला सर्दी खोकला होतो. अगदी थंडी वाजून तापही येतो. पण आपला थंडीची बाधा झाली हे कसं कळणार. शरीराला थंडीचा बाधा झाली तर शरीरातील काही भाग दुखायला लागतात. त्या दुखण्यामुळे आपल्याला संकेत मिळतात आपल्याला थंडीची बाधा झाली आहे.

ही दुखणं सांगतात तुम्हाला थंडी बाधली...त्यामुळे घ्या काळजी कारण मुंबईत अचानक थंडी वाढली...
ही दुखणं सांगतात तुम्हाला थंडी बाधली
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 5:19 PM

मुंबई : बदलेली जीवनशैली आणि बाहेरच्या खाण्यामुळे अनेकांची रोगप्रतिकारशक्ती(Immunity) दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. त्यात मुंबईत सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे अनेकांची तब्येत खराब होत आहे. मुंबईत अचानक थंडी वाढली आहे. मग अशावेळी आपल्याला थंडीची बाधा झाली हे कसं समजणार आणि त्यावर काय घरगुती उपाय(Home Remedies) आहेत.

ही लक्षणं तुम्हाला आहेत

वारंवार शिंका येणे – जर तुम्हाला वारंवार शिंका येत असेल तर हेही एक लक्षण आहे की तुला सर्दीची बाधा झाली आहे. हिवाळ्यात गरम पाणी प्यायला पाहिजे.

घसा दुखणे – थंडी बाधली म्हणजे तुमचा घसा दुखायला लागतो. अशावेळी घरगुती उपचार करा आणि या समस्येतून बाहरे पडा. घसा दुखत असेल तर हल्के गरम पाण्यात मीठ घालून गरारे करा. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

डोकेदुखी – तुम्हाला थंडीची बाधा झाली आहे सगळ्यात मोठं संकेत म्हणजे डोकं दुखणे. जर तुम्ही थंडीत गरम कपडे न घातला बाहेर पडले तर त्याला थंडी लागू शकते. अशावेळी घरगुती उपाय करुन तुम्ही करु शकता. तुम्ही या दिवसांमध्ये गरम पदार्थांचं सेवन करा. हिवाळ्यात काढाचे सेवन करा.

छातीत दुखणे – थंडी लागल्याने अनेकांना छातीत दुखतं. हे ही संकेत आहे तुम्हाला थंडीची बाधा झाली आहे. अशावेळी तुम्ही गरम पाण्याचा वाफारा घ्या. हिवाळ्यात शरीरात रक्ताभिसरण होत नाही म्हणून अशावेळी आपल्या शरीरातील काही भाग दुखतात.

सांधेदुखी – हिवाळ्यात सगळ्यात जास्त त्रास हा वृद्ध नागरिकांना होतो. हिवाळ्यात त्यांना सांधेदुखीचा त्रास होतो. काहींना गुडघे दुखीचा त्रास होतो. अशावेळी मोहरीच्या तेलात लसून घालून ते गरम करा आणि जरा कोमट झाल्यावर या तेलाने मालिश करा. यामुळे तुम्हाला नक्की फायदा होईल.

या पदार्थांचा करा आहारात समावेश

1. हळद पाणी किंवा हळद दूध 2. लसून 3. हिरवी मिरची 4. आलं 5. शेंगदाणे 6. कांदा

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

इतर बातम्या

Pregnency Tips | गर्भवतीने आनंदी राहिल्यावर काय होतो फायदा…जाणून घ्या एका क्लिकवर

Health Tips | मुलांची स्मरणशक्ती वाढवायचीय, जाणून घ्या आहारात कोणत्या पदार्थांचा करावा समावेश!

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.