वयाच्या ‘या’ टप्प्यात पालकांनी मुलांसोबत झोपू नये; जाणून घ्या, मुलांसोबत एकाच बेडवर झोपणे वाईट असते की चांगले!

वयाच्या एका ठरावीक टप्प्यानंतर, पालकांनी आपल्या मुलांसोबत एकाच पलंगावर झोपू नये. कारण याचे खूप दुष्परिणाम मुलांना भोगावे लागू शकतात. जाणून घ्या, नेमक्या कोणत्या टप्प्यावर पालकांनी आपल्या मुलांसोबत झोपू नये.

वयाच्या ‘या’ टप्प्यात पालकांनी मुलांसोबत झोपू नये; जाणून घ्या, मुलांसोबत एकाच बेडवर झोपणे वाईट असते की चांगले!
वयाच्या ‘या’ टप्प्यात पालकांनी मुलांसोबत झोपू नये; जाणून घ्या,Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 7:23 PM

नवी दिल्ली : अमेरिकन अभिनेत्री ‘ॲलिसिया सिल्व्हरस्टोन’ तिच्या पालकत्वा संबंधी (Regarding parentage) वेगळ्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच ॲलिसियाने खुलासा केला आहे की, ती तिच्या 11 वर्षांच्या मुलासोबत एकत्र झोपते. एलिसिया म्हणाली, ‘बीअर आणि मी अजूनही एकत्र झोपतो.’ तिच्या म्हणण्यानुसार ती फक्त निसर्गाला फॉलो करत आहे. ॲलिसियाच्या या वक्तव्यावर तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले. अ‍ॅलिसियाच्या वक्तव्यावर टिप्पणी करताना एका यूजरने लिहिले की, ‘तो स्वतंत्र व्हायला कसे शिकेल? तुम्ही त्याला मदत करत नसून नुकसान करत आहात. प्रत्येक पालक आपल्या मुलाची सर्व प्रकारे काळजी घेतात. बरेच पालक आपल्या मुलांना सुरक्षित (Safe) वाटण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्याच्या उद्देशाने त्यांच्यासोबत झोपतात. परंतु, काहीवेळा पालकांची हीच कृती मुलासाठी खूप हानिकारक (Very harmful) ठरू शकते.

सोशल मिडीयावर रंगली चर्चा

सोशल मीडियावर, जिथे लोक अॅलिसियाच्या एकत्र झोपण्याचा (को-स्लिपिंग संकल्पनेचा) निषेध करत आहेत. त्याच वेळी, काही लोक आहेत ज्यांच्या नजरेत ते सामान्य आहे. अ‍ॅलिसियाच्या निवडीवर, एका युझरने ट्विट केले, की ‘सध्या समाजात बरेच मुलं मोकाट फिरत आहेत..कदाचित पालकांकडून थोडे अधिक प्रेम, हे उत्तर असू शकते. अशा परिस्थितीत मुलांसोबत एकाच बेडवर झोपणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. किंवा कोणत्या वयापर्यंत पालकांनी मुलांसोबत झोपावे? अशा परिस्थितीत बालरेागतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया.

बालरोगतज्ज्ञ काय म्हणतात

न्यूयॉर्कस्थित बालरोगतज्ज्ञ डॉ. रेबेका फिस्क म्हणाल्या, ‘मी पालकांना नेहमी सांगते की मुलांसोबत एकाच बेडवर झोपणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. तसेच याला कोणतेही वैद्यकीय कारण किंवा निर्णय नाही. एका वेबसाइटशी बोलताना फिस्क म्हणाले की, पालकांनी 12 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांसोबत कधीही बेड शेअर करू नये कारण यामुळे जिव गुदमरुन मृत्यू (SIDS सडन इन्फंट डेथ सिंड्रोम) होण्याचा धोका वाढतो. त्याच वेळी, फिस्क म्हणतात की, प्रत्येकाच्या झोपण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात.

हे सुद्धा वाचा

बहुतांशवेळा तुम्हाला आणि मुलांना झेापतांना अडचणी येवु शकतात.जर तुम्ही तुमच्या बाळासोबत झोपत असाल, तर तो दिवसभर आरामात आहे याची खात्री करा. जर असे होत नसेल, तर एकत्र झोपण्याशिवाय तुमच्याकडे इतर अनेक पर्याय आहेत. जसे आपण खोलीत अतिरिक्त बेड ठेवू शकता. बाळ झोपल्यानंतर, तुम्ही त्यात झोपू शकता जेणेकरून तुमचे मूल बेडवर मोकळेपणाने झोपू शकेल आणि झोपेच्या वेळी त्याला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. आपण इच्छित असल्यास, बाळाला झोपवल्या नंतर दुसऱ्या खोलीत देखील झोपू शकता.

मुलांना सुरक्षित वाटते

त्याच वेळी, बाल मानसशास्त्रज्ञ एलिझाबेथ मॅथिस यांनी सांगितले की, मुलांसोबत बेड शेअर करणे कधीकधी खूप चांगले सिद्ध होते, विशेषत: जेव्हा दोन्ही पालक वेगळे राहतात. मॅथिस म्हणतात की, ज्या लोकांसोबत तुम्हाला सुरक्षित वाटते अशा लोकांसोबत राहिल्याने तुम्हाला बरे वाटते.

या वयात मुलांसोबत झोपणे बंद केले पाहिजे

कोणत्या टप्प्यावर तुम्ही तुमच्या बाळासोबत झोपणे थांबवावे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्या बाळामध्ये शारीरिक बदल दिसू लागतात, तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत झोपणे बंद केले पाहिजे. याला प्री-प्युबर्टी (पौगंडावस्था)असे म्हणतात. तारुण्य किंवा प्री-प्युबर्टी ही अशी वेळ असते जेव्हा तुमच्या बाळाचे शरीर लैंगिकदृष्ट्या परिपक्व होऊ लागते. या दरम्यान मुलींमध्ये स्तनांची वाढ, पुरुषांमध्ये दाढी-मिशी वाढणे, प्रायव्हेट पार्टचा आकार वाढणे असे शारीरिक बदल होतात. फिस्क म्हणाले, ‘प्री-प्युबर्टी ही अशी वेळ असते जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसोबत झोपणे बंद केले पाहिजे.’

तुमच्याही खासगी स्वातंत्र्यावर परिणाम

मॅथिसनेही फिस्कच्या मुद्द्याचे समर्थन करत म्हटले की, यौवन ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या बेडवर झोपायला सुरवात केली पाहिजे. यौवन अवस्थेच्या प्रारंभाचे सरासरी वय मुलींसाठी 11 वर्षे आणि मुलांसाठी 12 वर्षे आहे. तथापि, मुलींमध्ये 8 ते 13 वर्षांच्या दरम्यान प्युबर्टी सुरू होणे देखील सामान्य आहे. त्याच वेळी, मुलांमध्ये प्युबर्टी 9 वर्षे ते 14 वर्षे वयाच्या दरम्यान सुरू होऊ शकते. मॅथिस म्हणाले, यौवनकाळात मुलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात, त्यामुळे तुम्ही मुलांना जागा देणे गरजेचे आहे. हे त्याला आरामदायक करेल. जर तुम्ही तुमच्या मुलांना एकाच बेडवर झोपविले तर त्याचा तुमच्या खासगी स्वातंत्र्यावरही परिणाम होतो.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.