मधुमेहाच्या रुग्णांना 45 टक्के किडनीचे आजार होण्याचा धोका, या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!
किडनी हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. किडनी (Kidney) लाल रक्तपेशी देखील बनवते. तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी किडनीची काळजी घेणे खूप गरजेचे आणि तितकेच महत्वाचे देखील आहे. ज्या लोकांना मधुमेहाचा (Diabetes) त्रास असतो. त्यांना किडनीचा आजार होण्याचा सर्वाधिक धोका नेहमीच असतो.
मुंबई : किडनी हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. किडनी (Kidney) लाल रक्तपेशी देखील बनवते. तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी किडनीची काळजी घेणे खूप गरजेचे आणि तितकेच महत्वाचे देखील आहे. ज्या लोकांना मधुमेहाचा (Diabetes) त्रास असतो. त्यांना किडनीचा आजार होण्याचा सर्वाधिक धोका नेहमीच असतो. अशा परिस्थितीत शरीरातील साखरेची पातळी (Sugar level) नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. ज्या लोकांना मधुमेह झाला आहे. त्यांनी किडनीची नियमित तपासणी केली पाहीजे. किडनीच्या आजाराची लक्षणे कोणती आहेत आणि ते कसे टाळता येईल. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
किडनीच्या आजाराबद्दल डाॅक्टर नेमके काय म्हणतात जाणून घ्या!
डॉ. हिमांशू वर्मा, एचओडी, नेफ्रोलॉजी विभाग यांच्या मते, किडनीशी संबंधित आजार केवळ लघवीद्वारे ओळखता येतात. लघवी करताना वेदना होत असतील, लघवीचा रंग बदलत असेल किंवा वारंवार लघवी होत असेल, तर हे किडनी संसर्गाचे लक्षण असू शकते. काही वेळा लोकांना पायांना सूज येते. भूक न लागणे आणि ओटीपोटात दुखणे हे देखील आहे. डॉक्टरांच्या मते ज्या लोकांची साखरेची पातळी नियंत्रणात नसते. त्यांना किडनीशी संबंधित आजारांचा धोका अधिक असतो.
डाॅक्टरांच्या मते 45 टक्के किडनीचे आजार मधुमेहाच्या रुग्णांना होतात. जे लोक पुरेसे पाणी पीत नाहीत त्यांनाही किडनीचा आजार होण्याची शक्यता असते. चुकीच्या आहार आणि जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन आणि बीपी नियंत्रणात राहत नाही. त्यांना किडनीच्या आजाराचीही अधिक शक्यता असते. डॉ. हिमांशू यांच्या मते, किडनी निकामी होण्याशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर ते गंभीर स्वरूपाचे बनतात. गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांमध्येही किडनीचे आजार आढळून येत आहेत आणि ही धोक्याची घंटा आहे.
तेलकट पदार्थ खाणे पूर्णपणे टाळाच!
डॉ. हिमांशू यांच्या मते, किडनी निरोगी ठेवण्यासाठी लोकांनी जेवणात मीठ आणि तेलाचा कमी वापर करणे सर्वात महत्त्वाचे आहे. वजन नियंत्रणात ठेवा. लठ्ठपणा वाढत असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करा. रोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या. वर्षातून किमान एकदा KFT करा. जर आपण जेवणामध्ये तेलकट आणि मीठ जास्त घेतले तर वजन कमी करणे शक्य होत नाही. यामुळे वजन वाढते आणि धोका देखीव अधिक होतो.
संबंधित बातम्या :
महिलांनो… या समस्येविषयी न लाजता बिनधास्त डाॅक्टरांना बोला, नाही तर समस्या अधिक गंभीर होऊ शकते!
Child care : लहान मुलांच्या तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी हे उपाय करा, तोंड नेहमी राहील निरोगी!