जी मुले धाडसी खेळ खेळतात, ती मानसिकदृष्ट्या जास्त स्ट्राँग, वाचा संशोधनातून नेमके काय पुढे आले!

संशोधनामध्ये 5 ते11 वर्षे वयोगटातील सुमारे 2,500 पालकांचे सर्वेक्षण केले. यामध्ये त्यांना मुलांच्या खेळाविषयी प्रश्न विचारण्यात आले आहे. संशोधकांना असे प्रामुख्याने दिसून आले की, जी मुले बाहेर खेळण्यात जास्त वेळ घालवतात त्यांना आरोग्य समस्या आणि नैराश्य जवळपास नाहीयेच. पहिल्या लॉकडाऊनमध्ये या मुलांची संख्या अधिक असल्याचे देखील दिसून आले.

जी मुले धाडसी खेळ खेळतात, ती मानसिकदृष्ट्या जास्त स्ट्राँग, वाचा संशोधनातून नेमके काय पुढे आले!
Image Credit source: unicef.org
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 10:15 AM

मुंबई : कोरोनाच्या (Corona) काळामध्ये अनेक निर्बंध होते, घराच्या बाहेर पडण्याची देखील परवानगी नव्हती. यामुळे घरातील लहान मुलांना बाहेर खेळायला जाण्याचा प्रश्नच नव्हता. यादरम्यान घरामध्ये सतत राहून मुलांची चिडचिड चांगलीच वाढली होती. यामुळे पालकांनी (parents) मुलांना मोबाईल, लॅपटाॅप आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर वेळ घालवण्यासाठी रोख लावली नाही. आताही मुले मोबाईल आणि लॅपटाॅपवर दिवसभर टाईमपास करत बसतात, अशावेळी त्यांना जेवणाचे देखील भान राहत नाही. मात्र, आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि जवळपास पुर्ण निर्बंध हाटवण्यात आले आहेत. कोरोनामध्ये जवळपास दीड वर्ष मुले घरामध्येच होती. त्यामुळे त्यांना आता धाडसी आणि मैदानी खेळ खेळण्याची अजिबात सवय राहिली नाही. सतत मोबाईल (Mobile) आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर मुले चिटकून आहेत.

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स

मुलांच्या हातामध्ये सतत मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पाहून पालकांचे देखील टेन्शन वाढताना दिसत आहे. नुकताच झालेल्या संशोधनातून एक माहिती पुढे येते आहे, जी मुले धाडसी खेळ जास्त खेळतात त्यांच्यामध्ये चिंता आणि नैराश्य खूप कमी असते. म्हणजेच जी मुले सतत मोबाईल, लॅपटाॅप आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरतात आणि शारिरीक हालचाली अत्यंत कमी करतात, त्यांच्या फक्त आरोग्य समस्याच नाही तर चिंता आणि नैराश्य देखील वाढते. एक्सेटर युनिव्हर्सिटीच्या चाइल्ड सायकॅट्री अँड ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात पालकांना विचारले की त्यांची मुले किती वेळ मैदानी खेळ खेळतात. मैदानी खेळामध्ये कबड्डी, खो-खो, सायकल चालवणे, झाडावर चढणे, धावण्याचे खेळ इत्यादी येतात.

हे सुद्धा वाचा

5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांवर संशोधन

संशोधनामध्ये 5 ते11 वर्षे वयोगटातील सुमारे 2,500 पालकांचे सर्वेक्षण केले. यामध्ये त्यांना मुलांच्या खेळाविषयी प्रश्न विचारण्यात आले आहे. संशोधकांना असे प्रामुख्याने दिसून आले की, जी मुले बाहेर खेळण्यात जास्त वेळ घालवतात त्यांना आरोग्य समस्या आणि नैराश्य जवळपास नाहीयेच. पहिल्या लॉकडाऊनमध्ये या मुलांची संख्या अधिक असल्याचे देखील दिसून आले. या अभ्यासातील एक्सेटर विद्यापीठातील बाल मानसशास्त्राच्या प्राध्यापक हेलन डॉड म्हणाल्या की, मुलांच्या मानसिक आरोग्याबाबत पूर्वीपेक्षा जास्त चिंता सध्या वाढली आहे, आमच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की मुलांचे मानसिक आरोग्य खराब होत जात आहे. मुलांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण त्यांना धाडसी खेळ खेळण्यासाठी संधी दिली पाहिजे.

मैदानी खेळ खेळल्याने चिंता कमी होते

सेव्ह द चिल्ड्रेनचे संचालक डॅन पासकिन्स म्हणाले की, प्रत्येक मुलाला खेळण्याची संधी मिळाली पाहिजे आणि हे मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक देखील आहे. कारण कोरोनाच्या काळामध्ये लहान मुलांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त बदल झाले आहेत आणि ते परत एकदा सुरळीत करण्यासाठी मुलांना खेळायला लावणे आवश्यक आहे. मुलांनी मैदानी खेळ खेळल्याने त्यांची चिंता कमी होते आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यामुळे मुलांना नेहमीच लॅपटाॅप आणि मोबाईलपासून दूर ठेवा आणि बाहेर खेळण्यास नक्कीच पाठवा. (यासंदर्भात aninews ने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.)

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.