आजारी पडलेले कोरोना योद्धे रुग्णालयातून परतलेच नाहीत; मोदींना अश्रू अनावर

गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाचा सामना केल्यानंतर अखेर कोरोनाची लस शोधण्यात भारतीय संशोधकांना यश मिळालं आहे. (PM Narendra Modi flags-off 'massive' vaccination drive)

आजारी पडलेले कोरोना योद्धे रुग्णालयातून परतलेच नाहीत; मोदींना अश्रू अनावर
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 12:09 PM

नवी दिल्ली: गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाचा सामना केल्यानंतर अखेर कोरोनाची लस शोधण्यात भारतीय संशोधकांना यश मिळालं आहे. आज पासून देशात लसीकरणही सुरू झालं आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशावासियांशी संवाद साधला. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाची जाणीव करून देतानाच कोविड योद्ध्यांचंही त्यांनी कौतुक केलं. तसेच कोरोना काळात जीव गमावलेल्या कोविड योद्ध्यांच्या आठवणीने मोदींना अश्रू अनावर झाले. (PM Narendra Modi flags-off ‘massive’ vaccination drive)

देशावासियांशी संवाद साधताना मोदी गहिवरून गेले होते. कोरोना काळात कोविड योद्ध्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली. अनेक कोविड योद्धे कोरोनामुळे आजारीही पडले. रुग्णालयात उपचार घेणारे हे कोविड योद्धे घरी परतलेच नाही, असं सांगताना मोदींना अश्रू अनावर झाले. संकटाच्या काळात निराशेच्या गर्तेत असताना हेच योद्धे आशेचा किरण म्हणून वावरत होते. आपल्याला वाचवण्यासाठी स्वत:चे जीव धोक्यात घालत होते. हे लोक होते डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, रुग्णवाहिका चालक, आशा वर्कर, सफाई कामगार, पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्स. रुग्णांची सेवा करताना या बहादूर कोविड योद्ध्यांना कोरोना झाला. त्यांना रुग्णालयात दाखल केले. पण ते परत आलेच नाही, असं सांगताना मोदी भावूक झाले.

अंत्यसंस्कारालाही जाता आलं नाही

यावेळी मोदींनी कोरोनाचं संकट किती गंभीर होतं हे सुद्धा सांगितलं. या आजाराने लोकांना आपल्या घरापासून दूर ठेवलं. मुलं रुग्णालयात असल्याने त्यांच्या आईची तगमग सुरू होती. त्यांना मुलांना भेटता येत नव्हते. अनेकांना त्यांच्या घरातील बुजुर्गांनाही रुग्णालयात भेटता येत नव्हते. आमचे अनेक योद्धे कोरोनामुळे दगावले. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारालाही कुणाला जाता आलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

अफवांपासून दूर राहा

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच आपण 3 कोटी आरोग्य सेवकांना लस देणार आहोत. दुसऱ्या टप्प्यात आलल्याला ही मोहीम 30 कोटी लोकांपर्यंत घेऊन जायची आहे. दुसऱ्या टप्प्यात वृद्ध नागरिकांना आणि फ्रन्ट लाईन कामगारांना लस दिली जाणार आहे. भारताची लसीकरण मोहीम खूप मोठी आहे. त्यामुळे ही मोहीम म्हणजे भारताच्या सामर्थ्याचं दर्शन म्हणावं लागेल. आपले शास्त्रज्ञांनी भारतीय बनावटीच्या दोन्ही लसीबाबत खात्री पटल्यानंतरच लसीच्या आपत्कालीन वापसाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नका. जगभरातील 60 टक्के बालकांना ज्या लस दिल्या जातात. त्याची निर्मिती ही भारतातच होते. त्यामुळे भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लसही विश्वासार्ह असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. (PM Narendra Modi flags-off ‘massive’ vaccination drive)

संबंधित बातम्या:

PM Narendra Modi : भारताची लसीकरण मोहीम म्हणजे प्राणाची आहुती दिलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली- पंतप्रधान मोदी

कोरोनाचे दोन डोस घेणं बंधनकारक, हयगय करू नका; पंतप्रधान मोदींचं कळकळीचं आवाहन

आपण टाळ्या-थाळ्या वाजवल्या, दिवे लावले; यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला : नरेंद्र मोदी

(PM Narendra Modi flags-off ‘massive’ vaccination drive)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.