खराब स्नायू आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीला घातक, ‘इम्युनिटी बूस्टर’ साठी तुम्हाला हवीत स्ट्राँग स्नायू रचना !
तुमच्या शरीरात मजबूत स्नायू रचना असल्यास शरीराला आवश्यक इम्युनिटी वाढण्यास मदत होते. परंतु, जर तुमचे स्नायू कमकूवत असतील, तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घ्या, स्नायू कमजोर असल्यास कोणत्या समस्या येतात.
सध्याच्या काळात, पूर्वीपेक्षा निरामय आयुष्य जगणे आणि मजबूत रोगप्रतिकारक शक्ती (Strong immune system) विकसित करणे व ती राखणे सर्वाधीक महत्त्वाचे झाले आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप गरजेचे आहे, ज्यामुळे शरीराला अनेक आजारांपासून दूर (Away from diseases) ठेवता येते. वयाच्या चाळिशी नंतर महिला असो की, पुरुषांच्या शरीरात अनेक बदल होतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वयात स्नायूंची ताकद क्षीण होऊ लागते. 40 ते 80 वर्षांच्या दरम्यान, स्नायूंची ताकद 33% कमी होते. परिणामी संपूर्ण शरीरावर याचे प्रभाव जाणवतात. तुमच्या शरीरात मजबूत(स्ट्राँग) स्नायू रचना असल्यास शरीराला आवश्यक इम्युनिटी (Essential Immunity) वाढण्यास मदत होते. निरोगी आणि संतुलित आहार आपल्या शरीराला मजबूत रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यास मदत करतो. बऱ्याच लोकांना हे माहीतच नसते की खराब स्नायूंच्या आरोग्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होऊ शकते आणि त्याचा वाईट परिणाम होतो.
हालचालींमध्ये स्नायूंची महत्वाची भूमिका
अॅबॉट न्यूट्रिशन बिझनेसचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक व्यवहार प्रमुख, डॉ. इरफान शेख, म्हणाले, “स्नायू, रोगप्रतिकारक प्रणाली आणि रोग व्यवस्थापन यांच्यातील दुवा आहे. आपल्या हालचालींमध्ये स्नायूंची महत्त्वाची भूमिका आहे. जसजसे आपले वय वाढत जाते. तसतसे, स्नायूंचे आरोग्य चांगले राखणे शक्ती आणि निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे.
स्नायं बळकट नसल्यास, प्रतिकारशक्ती कमी
स्नायू संयुगे तयार करतात आणि सोडतात, जे विशिष्ट रोगप्रतिकारक पेशींच्या निर्मिती व त्यांच्या सक्रियतेमध्ये गुंतलेले असतात. शरीरात तयार होणारे संयुगे वितरणासाठी जबाबदार असणे. तणाव आणि संसर्गाच्या काळात शरीराद्वारे वापरल्या जाणाऱ्या अमिनो ऍसिडचे हे मुख्य स्रोत आहेत. कमकुवत किंवा खराब स्नायूंमुळे आणि पुरेसे प्रथिने न घेतल्याने, जखमा किंवा रोग शरीराला दुखापत किंवा संसर्ग झाल्यास लवकर बरे होत नाहीत. म्हणजेच त्यांच्याकडे शरीराचा प्रतिसाद कमी होतो.
गंभीर आजार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी
स्नायूंची ताकद क्षीण झाल्यामुळे, शरीराच्या प्रतिकारशक्ती तडजोड करावी लागू शकते किंवा संक्रमणास सामोरे जावे लागू शकते, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. प्रत्येकाने स्नायूंच्या चांगल्या आरोग्यास प्राधान्य देणे आणि वयानुसार स्नायूंची ताकद जतन करणे महत्त्वाचे आहे. ज्या लोकांना गंभीर किंवा जुनाट आजार आहेत त्यांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, फुफ्फुसाचा जुनाट आजार, मधुमेह आणि हृदयविकाराचा स्नायूंच्या आरोग्यावर परिणाम होऊन ते कमकुवत होऊ शकतात.