अॅडमिट होण्यासाठी कोरोना रिपोर्टची गरज नाही; वाचा रुग्णालयात भरती होण्याचे सर्व नवे नियम!
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. (Positive Covid test report not mandatory for hospitalisation: Govt revises policy)
नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या नव्या नियमानुसार रुग्णालयात भरती होण्यासाठी आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवण्याची गरज नाही. संशयित व्यक्तिलाही रुग्णालयात भरती करता येणार आहे. तसेच कोरोनाच्या प्रत्येक व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. रुग्णांच्या लक्षणांनुसार त्याला वॉर्ड सीसीसी, डीसीएससी आणि डीएससीमध्ये भरती करण्यात येणार आहे. (Positive Covid test report not mandatory for hospitalisation: Govt revises policy)
नव्या नियमांनुसार रुग्ण कोणत्याही शहरात राहणारा असला तरी कोणत्याही रुग्णाला कोणत्याही कारणाने सेवा देण्यास नकार देता येणार नाही. यात ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचाही समावेश आहे. कोणत्याही रुग्णाला कोणत्याही रुग्णालयात केवळ वैध ओळखपत्रं नाही म्हणून प्रवेश नाकारता येणार नाही. आवश्यकतेनुसार त्याला रुग्णालयात प्रवेश दिला जाईल, असं नव्या नियमावलीत स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.
4 हजार रुग्णांचा मृत्यू
देशात एका दिवसात कोरोनाच्या 4,187 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची संख्या 2,38,270 वर गेली आहे. तर देशात एका दिवसात 4,01,078 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 2,18,92,676 झाली आहे.
काय आहेत नियम
>> रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या रिपोर्टची गरज नाही >> संशयित व्यक्तीही रुग्णालयात अॅडमिट होऊ शकतो >> कोणत्याही शहरातील कोणत्याही रुग्णाला ओळखपत्रं नाही म्हणून रुग्णालयात अॅडमिट करण्यापासून रोखता येणार नाही >> कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन आणि औषधे देण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, मग तो कुठल्याही शहरात राहणारा असो >> रुग्णाची लक्षणे आणि गरज पाहूनच रुग्णालयात दाखल केलं जाईल >> रुग्णालयात अॅडमिट करण्याची गरज नसतानाही रुग्णांनी बेड अडवून ठेवले तर नाही ना, हे पाहणं बंधनकारक आहे >> येत्या तीन दिवसात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागाने याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाने दिले आहेत (Positive Covid test report not mandatory for hospitalisation: Govt revises policy)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 8 May 2021https://t.co/Q1gV7lLFjr
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 8, 2021
संबंधित बातम्या:
कोरोनावरील आणखी एका औषधाला मंजुरी, DRDO नं बनवलेलं औषध ऑक्सिजनची आवश्यकता कमी करणार
LIVE | लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहापूरमधील दुकानदारांवर धडक कारवाई
(Positive Covid test report not mandatory for hospitalisation: Govt revises policy)