सकारात्मक सामाजिक संवादामुळे वृद्धांच्या जीवनालाही मिळतो हेतू; नवं संशोधन काय सांगतं?
वृद्ध नागरिकांशी सकारात्मक सामाजिक परस्पर संवाद राखल्यास त्यांच्या जीवनाला हेतू मिळतो, अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे.
वॉशिंग्टन विद्यापीठातील मानसशास्त्रीय आणि मस्तिष्क विज्ञान विभागाच्या अभ्यासानुसार, (Department of Psychological and Brain Sciences) वृद्ध व्यक्तींशी सकारात्मक सामाजिक परस्पर संवाद साधल्यामुळे त्यांच्या जीवनाला हेतू मिळतो. अमेरिकन जर्नल ऑफ जेरिॲट्रीक सायकिॲट्रीच्या (The American Journal of Geriatric Psychiatry) जुलै 2022 च्या अंकात ही माहिती पब्लिश झाली आहे. या संशोधनानुसार, हे निष्कर्ष कार्यरत व सेवानिवृत्त प्रौढ नागरिक अशा दोघांनाही लागू होतात. मात्र असे असले तरी सकारात्मक सामाजिक संवाद राखणे हे सेवानिवृत्त नागरिकांच्या हेतूपूर्णतेशी अधिक संबंधित आहे. विशेषत: आपल्या सेवानिवृत्त वृद्धांसाठीची ही अशी एक रचना आहे, ज्याची आपण खरोखरच वास्तवात काळजी घेतली पाहिजे, असं गॅब्रिएल फंड यांनी सांगितलं. गॅब्रिएल हे मानशास्त्रीय आणि मस्तिष्क विज्ञानाचे सहयोगी प्राध्यापक आहेत. ते पीएचडीचे विद्यार्थीही आहेत. यासाठी 71 वर्षांपर्यंतच्या 100 प्रौढ नागरिकांचा 15 दिवस अभ्यास करण्यात आला. दिवसभरात झालेल्या सकारात्मक सामाजिक संवादाच्या गुणवत्तेबाबत त्यांना दिवसभरात तीन वेळा प्रश्न विचारण्यात आले. तुमच्या आयुष्याला काही हेतू मिळाला, असे आज दिवसभरात तुम्हाला वाटले का? असा प्रश्न त्यांना रोज संध्याकाळी विचारण्यात आला व त्या अनुभवासाठी त्यांना 1 ते 5 पैकी गुण देण्यास सांगण्यात आले. त्या नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादांचा अभ्यास करण्यात आला. ज्या व्यक्तींशी अधिक सकारात्मक संवाद साधण्यात आला, दिवसाअखेरीस त्यांनी अधिक हेतूपूर्ण वाटल्याचे नमूद केले.
हेतू काय?
- आपल्याकडे व्यक्तिगतरित्या अर्थपूर्ण उद्दिष्ट आणि आयुष्याला मार्गदर्शन करण्यासाठी दिशानिर्देश आहेत अशी जाणीव ज्यांना होते, त्या मर्यादेपर्यंत उद्देशाच्या भावनेला परिभाषित केलं जातं. एखाद्या व्यक्तीची आपल्या उद्देशाची भावना किती गतिशील असते हे सुद्धा अभ्यासाने दाखवून दिल्याचं फंड म्हणाले.
- उद्देशाच्या भावनेवरील सर्वाधिक शोध एखाद्याचा उद्देश असण्याविरुद्ध एखाद्याचा उद्देश नसण्यावर अधिक केंद्रीत आहे. मात्र, उद्देशपूर्णता अधिक गतिमान असू शकते हे निष्पन्न झालं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र ही लोकांचा कल साधारणपणे कमी अधिक प्रमाणात उद्देशपूर्ण असतो. हेतू दिवसागणिक बदलू शकतो हे आम्हाला दिसून आलं. प्रत्येकजण आपआपल्या कुवतीनुसार चढउतार अनुभवत होता, असंही ते म्हणाले.
- सेवानिवृत्त लोकांचे जोडणं जाणं अधिक सशक्त आणि प्रभावी होतं. अधिक सकारात्मक सामाजिक परस्पर संवादाने उद्देशाच्या उच्च भावनेसह मजबूत संबंध दाखवला. तर नकारात्मक भावना त्या तुलनेत कमी असल्याचं डेटामधून दिसून आलं. सर्वांसाठी विशेषत: सेवानिवृत्त वृद्धांसाठी त्यांच्या आयुष्यातील लोक अधिक महत्त्वाचे आहेत, असं फंड यांनी सांगितलं.
- संशोधनालाही आपल्या मर्यादा आहेत. ज्युरिख आणि स्वित्झर्लंडमधून नमूने गोळा करण्यात आले होते. निरोगी लोकांचेच नमूने घेण्यात आले होते. मात्र, आम्ही काढलेले निष्कर्ष इतर देशात किंवा आरोग्य चांगले नसलेल्या वृद्धांमध्ये भिन्न असू शकतात.
- चांगलं वाटण्यापेक्षा उद्देशाची भावना अधिक चांगली आहे. उच्च हेतू असलेले प्रौढ निरोगी आणि आनंदी आयुष्य जगत असल्याचं आधीच्या शोधातून दिसून आलं आहे. स्मृतीभ्रंश आणि हृदयाशी संबंधित विकाराचं प्रमाण त्यांच्यात कमी असल्याचं दिसून आलं आहे. “तुमच्या आयुष्यातील लोकांचा त्यावर खूप मोठा प्रभाव पडणार आहे.” जर तुम्ही अशा लोकांमध्ये वेढले गेले असाल तर तुम्हाला जे कमी लेखतात… त्याचा प्रभाव पडणार आहे. दुसरीकडे तुम्हाला जे लोक प्रगतीपथावर आणतात, तुमच्या आयुष्यात सकारात्मकता भरतात, त्याचाही प्रभाव पडणारच आहे. ही तर चांगली बातमी आहे, असं ती म्हणाली. जर तुम्हाला वाटत असेल जीवनाचा काहीच उद्देश नाही, तर सदैव असं होत नाही. ते तुमचं आयुष्यच नाही. ते बदलू शकते.