Powder Milk : तुम्हीही तुमच्या मुलांना ‘पावडरचे दूध’ देताय का? सावधान, मुलांच्या वाढीसाठी आहे घातक

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात लिहिले आहे की, फॉर्म्युला मिल्क म्हणजेच दूध पावडर बनवणाऱ्या मोठ्या कंपन्या नवजात मुलांशी खेळत आहेत. वास्तविक या कंपन्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉर्म्युला दुधाची जाहिरात करत आहेत.

Powder Milk : तुम्हीही तुमच्या मुलांना ‘पावडरचे दूध’ देताय का? सावधान, मुलांच्या वाढीसाठी आहे घातक
पावडर दूध (प्रातिनिधिक फोटो) Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 8:46 PM

मुंबई : नव्याने आई होणाऱ्या बहुतेक माता आपल्या बाळाला स्तनपानाऐवजी फॉर्म्युला दूध पाजण्यावर भर देत आहेत. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात लिहिले आहे की, फॉर्म्युला मिल्क म्हणजेच दूध पावडर (Milk powder) बनवणाऱ्या मोठ्या कंपन्या नवजात मुलांच्या जिवनाशी खेळ करत आहेत. कंपन्या त्यांच्या उत्पादनांची इतकी हुशारीने जाहिरात करतात की, त्यांच्या जाहिरातीला जाहिरात म्हणून नावही देता येत नाही. भारतातही हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळेच भारतातील फॉर्म्युला दुधाचा व्यवसाय वार्षिक 4.2 लाख कोटींवर पोहोचला आहे. आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱयानुसार, फॉर्म्युला मिल्क नवजात बालकांसाठी (For newborns) चांगले आहे का? नसल्यास, त्याचे तोटे काय आहेत? याबाबत तज्ज्ञांनी काय सल्ला दिला आहे या सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊया.

फॉर्म्युला मिल्क म्हणजे काय?

फॉर्म्युला मिल्क हे एक प्रकारचे कृत्रिम दूध पावडर आहे. तुम्ही त्याला पावडर आधारित दूध देखील म्हणू शकता. साखर, चरबी, जीवनसत्त्वे आणि प्रथिने यांचे मिश्रण करून ते तयार केले जाते. बरेचदा डॉक्टर आईला फॉर्म्युला दूध देण्याचा सल्ला देतात, परंतु जेव्हा आई स्तनपान करवण्याच्या स्थितीत नसते तेव्हा असे वरचे दुध देणे योग्य होते. लक्षात ठेवा की फॉर्म्युला दूध हे एक कृत्रिम दूध आहे, ज्याचा तुम्ही फक्त पर्याय म्हणून विचार करू शकता. याचा अर्थ असा नाही की ते स्तनपानासारखे कार्य करते.

दिवसातून किती वेळा फॉर्म्युला दूध देता येईल?

फॉर्म्युला दूध दिवसातून सहा ते आठ वेळा देता येते. तथापि, त्याचे प्रमाण देखील मुलाच्या आरोग्यावर अवलंबून असते. बाळाच्या भुकेनुसार डॉक्टरांचा सल्ला घेऊनच बाळाला दुध द्यावे.

हे सुद्धा वाचा

आईचे दूध आणि फॉर्म्युला दूध यात काय फरक आहे?

आईच्या दुधात ग्लिसरॉल मोनोलॉरेट (GML) नावाचा घटक असतो, जो हानिकारक जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करतो. हे निरोगी बॅक्टेरिया वाढण्यास देखील मदत करते. आईच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा 200 पट जास्त GML असते, तर फॉर्म्युला दुधात जवळपास नगण्य प्रमाण असते. त्यात आईच्या दुधासारखी कोणतीही खासियत नाही. युनिसेफच्या कार्यकारी संचालक कॅथरीन रसेल यांच्या मते, फॉर्म्युला फीडिंगबाबत केल्या जाणाऱ्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांमुळे नव्याने आई झालेल्या महिला स्तनपान करणं टाळत आहे. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी स्तनपान हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.