Thyroid झाल्यावर जीवनशैलीत ‘हे’ बदल करावेत!
व्यायाम शरीरासाठी खूप महत्वाचा आहे. व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहते. जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर दररोज व्यायाम करण्याची सवय लावा.
मुंबई: आजकाल थायरॉईडची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. थायरॉईड ही घशाजवळील एक ग्रंथी आहे जी अधिक हार्मोन तयार करण्यास सुरवात करते. ज्यामुळे थायरॉईडची समस्या उद्भवते. त्याचबरोबर जर तुम्हाला थायरॉईडचा आजार होत असेल तर तो दुरुस्त करण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करायला हवेत.
थायरॉईड झाल्यावर जीवनशैलीत करा हे बदल
व्यायाम
व्यायाम शरीरासाठी खूप महत्वाचा आहे. व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहते. जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर दररोज व्यायाम करण्याची सवय लावा.
ओमेगा-3 समृध्द आहार
जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर आहारात ओमेगा-3 युक्त आहार घ्या.
कॅफिन
कॅफिन शरीरासाठी खूप हानिकारक आहे. थायरॉईडची समस्या असल्यास कॅफिनचे सेवन टाळा. कारण कॅफिनमुळे शरीरात डिहायड्रेशन वाढते, जे शरीरासाठी हानिकारक आहे.
या भाज्यांचे सेवन टाळा
थायरॉईडची समस्या असल्यास ब्रोकोली, फ्लॉवर आणि कोबी सारख्या भाज्या खाणे टाळावे. या भाज्या शरीरातील थायरॉईड हार्मोनची निर्मिती कमी करू शकतात.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)