Periods दरम्यान या गोष्टी टाळा, या गोष्टी आवर्जून करा!
अनेक सल्ले देखील दिले जातात हे करावं, हे करू नये. या सगळ्यात अत्यंत महत्त्वाच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नये. या गोष्टी फॉलो केल्यास तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेऊ शकता. जाणून घेऊयात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात...
मुंबई: मासिक पाळी दरम्यान महिलांना खूप त्रास होतो. या काळात काय करावं आणि काय करू नये याबाबत फार संभ्रम असतात. या काळात खूप काळजी घ्यावी लागते कारण ही बाब आरोग्याशी निगडीत आहेत. अनेक सल्ले देखील दिले जातात हे करावं, हे करू नये. या सगळ्यात अत्यंत महत्त्वाच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नये. या गोष्टी फॉलो केल्यास तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेऊ शकता. जाणून घेऊयात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात…
मासिक पाळीच्या काळात करू नका या गोष्टी-
पॅड वेळेत बदला
सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅड वापरा, कापड वापरू नका. पॅड हे वेळेत बदला, अनेकदा तुमच्या कानावर हे आलंच असेल. पीरियड्सदरम्यान पॅडचा वापर केला जातो. पण पॅड कधी बदलायचा हे माहित असायला हवं. याबाबत अनेकजण संभ्रमात असतात, पण जर तुम्हाला याची माहिती नसेल तर तुम्हाला गंभीर समस्या उद्भवू शकते. एकच पॅड 4 तासांपेक्षा जास्त काळ लावू नये, याचे कारण असे आहे की पॅड जास्त वेळ लावल्याने रक्त शोषले जात नाही. त्यामुळे दिवसातून 3 वेळा पॅड बदला.
व्यायाम सोडू नका
मासिक पाळीत वेदना झाल्यामुळे थकवा येतो. अशा वेळी अनेक जण व्यायाम सोडून देतात. पण तसे अजिबात करू नये. कारण व्यायाम केल्याने तुम्हाला फ्रेश वाटेल आणि पीरियड्सचा त्रास कमी होईल. या काळात सुद्धा व्यायाम करा, कमी करा पण करत राहा.
मीठाचे सेवन करू नका
मासिक पाळीदरम्यान सूज येण्याची समस्या उद्भवते. अशावेळी पीरियड्स दरम्यान जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्याने शरीरात अनेक प्रकारचे आजार होतात. त्यामुळे आपल्या आहारात मिठाच्या पदार्थांचा समावेश करू नका. जास्त मीठ खाऊ नका त्याने समस्या निर्माण होऊ शकते.
नाश्ता करा
नाश्ता हा दिनक्रमाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नेहमी नाश्ता करण्याचा सल्ला दिला जातो. अशातच जर तुमची मासिक पाळी सुरु असेल तर या दरम्यान आपल्या शरीरातून रक्त बाहेर पडते. त्यामुळे या वेळी शरीराला अधिक पोषणाची गरज असते. अशा वेळी नाश्ता अवश्य करावा.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)