‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ योजनेवर सरकार करणार 64,180 कोटी रुपये खर्च, पुढील 6 वर्षांसाठी ‘हे’ लक्ष्य…

भारतातील कोणताही नागरिक ‘पीएम आत्मानिर्भर स्वस्थ भारत’ योजनेचा लाभ घेऊ शकतो. यासाठी आधार कार्ड, रेशनकार्ड, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, बँक खात्याचे तपशील, रहिवासी पुरावा आणि उत्पन्नाचा दाखला देता येईल.

‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ योजनेवर सरकार करणार 64,180 कोटी रुपये खर्च, पुढील 6 वर्षांसाठी ‘हे’ लक्ष्य...
कोरोनाच्या सावटाखाली आगामी अर्थसंकल्प सादर होत असला तरी आरोग्याच्या दृष्टीने काय सुविधा दिल्या जातात याकडे लक्ष लागलेले आहे.
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 11:50 AM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या 2021 च्या आरोग्य बजेटमध्ये (Health budget) 137 टक्के वाढ झाली होती. यंदाच्या बजटवरदेखील कोरोनाचे सावट आहे. त्यामुळेच सरकारने अर्थसंकल्पात (Budget 2022) आरोग्यासाठी तरतूद वाढवली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे, त्यामुळे सर्वांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले आहे. आतापर्यंत देशात कोविड लसीकरणाचे (Covid Vaccination) काम पूर्ण झालेले नाही. 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ही लस दिली जात आहे. मार्च महिन्यापासून 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांनाही ही लस दिली जाऊ शकते. हे पाहता अर्थसंकल्पात लसीकरणाचा कार्यक्रम जाहीर होऊन त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही केली जाऊ शकते, अशी लोकांची अपेक्षा आहे. 2021-22 मध्ये आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 2,34,846 कोटी रुपये होती. मागील अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की आरोग्य बजेट तीन विशिष्ट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल. या तीन क्षेत्रांचे त्यांनी इंग्रजीत वर्णन ‘Preventive, Curative and Well Being’ असे केले. म्हणजेच रोग कसा टाळता येईल, कोणी आजारी पडल्यास त्यावर उपचार कसे करावे आणि लोकांना निरोगी ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील. हे तीन मंत्र निर्मला सीतारामन यांनी आरोग्य बजेटसाठी दिले होते.

काय आहे योजना

गेल्या अर्थसंकल्पात ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ योजनेचा पाया रचला गेला, ही केंद्र सरकारतर्फे चालवली जाणारी एक नवीन योजना आहे. लोकांच्या आजारांवर प्रतिबंध, उपचार आणि संशोधनावर आधारित ही योजना गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आली होती. ही योजना फक्त राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चालवली जात आहे, ज्याचा संपूर्ण निधी केंद्र सरकारचा आहे. या योजनेंतर्गत 17000 ग्रामीण आणि 11000 आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मदत केली जात आहे. या योजनेसाठी पुढील 6 वर्षात 64,180 कोटी रुपये खर्च करण्याची योजना सरकारने आखली आहे. देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये या योजनेचा भाग आहेत.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’योजनेचा एक भाग असलेल्या आरोग्य माहिती पोर्टलचे उद्घाटन केले. देशातील सर्व सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा या पोर्टलद्वारे जोडल्या जात आहेत. या योजनेच्या मदतीने 17778 गावे आणि 11024 भागात ‘वेलनेस सेंटर’ उघडण्यात येणार आहेत. देशातील 602 जिल्ह्यांमध्ये क्रिटिकल केअर रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत. 2 फिरती रुग्णालये आणि 15 आरोग्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्रे बांधण्याचीही योजना आहे. या योजनेचे काम सुरू असून अनेक जिल्ह्यांमध्ये केंद्रे सुरू झाली आहेत. या योजनेंतर्गत कोविड लसीकरणासाठी 35000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

2026 पर्यंत हे आहे लक्ष्य

1) 10 लक्षकेंद्रीत राज्यांमध्ये 17,788 ग्रामीण आरोग्य आणि कल्याण केंद्रांसाठी सहाय्य

2) सर्व राज्यांमध्ये 11,024 शहरी आरोग्य आणि कल्याण केंद्रांची स्थापना.

3) सर्व जिल्ह्यांमध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि 11 उच्च केंद्रीत राज्यांमध्ये 3382 ब्लॉक सार्वजनिक आरोग्य युनिट्सची स्थापना.

4) 602 जिल्हे आणि 12 केंद्रीय संस्थांमध्ये क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक्सची स्थापना.

5) नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC), त्याच्या 5 प्रादेशिक शाखा आणि 20 मेट्रोपॉलिटन हेल्थ सव्‍‌र्हेलन्स युनिट्सचे बळकटीकरण.

6) सर्व सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांना जोडण्यासाठी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकात्मिक आरोग्य माहिती पोर्टलचा विस्तार.

इतर बातम्या:

तुम्हाला वारंवार विसरण्याची सवय आहे काय? ही अल्झायमरची लक्षणे तर नाही…

Nagpur Health | थंडीमुळे वातरोग वाढलेत; काळजी कशी घ्यालं, डॉक्टर काय म्हणतात…

Health Tips | प्रसूतीनंतर पोट वाढले ? डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्याचे काही खास उपाय

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.