कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा, तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल!

मुंबईः ज्या वेळ तुम्ही आजारी असता आणि तुम्हाला उत्तम आहार मिळतो त्यावेळी आजारातून तुम्ही लवकर बरे झालेला असता. त्यामुळे अनेक तज्ज्ञ हेच सांगतात की, आहारातूनच (Diet) रोगप्रतिकारक (immunosuppressant) शक्ती मजबूत करता येते. तुमच्या खाण्या-पिण्याकडे योग्य लक्ष दिल्यास ही परिस्थिती लवकर बरी होऊ शकता असा दावाही अनेक संशोधनांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशाच काही […]

कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा, तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल!
DietImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 7:33 PM

मुंबईः ज्या वेळ तुम्ही आजारी असता आणि तुम्हाला उत्तम आहार मिळतो त्यावेळी आजारातून तुम्ही लवकर बरे झालेला असता. त्यामुळे अनेक तज्ज्ञ हेच सांगतात की, आहारातूनच (Diet) रोगप्रतिकारक (immunosuppressant) शक्ती मजबूत करता येते. तुमच्या खाण्या-पिण्याकडे योग्य लक्ष दिल्यास ही परिस्थिती लवकर बरी होऊ शकता असा दावाही अनेक संशोधनांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही कोरोनापासून (corona) लवकर बऱ्या व्हाल आणि आरोग्यही तुमचे चांगले राहिल.

भारतावर ज्यावेळी कोरोनाचे संकट ओढावले त्यावेळी त्याचा फटका अनेक नागरिकांना आणि राज्यांना बसला आहे. या रोगामध्ये फक्त माणसांचाच बळी गेला असे झाले नाही तर देशाची अर्थव्यवस्थाही मोडकळीला आली आहे. भारत अजूनही कोरोना मुक्त नाही, त्यामुळे आजही अनेक लोकं या रोगाला बळी पडत आहेत. त्यासाठी खरी गरज आहे ती तुमचे आरोग्य उत्तम असण्याची. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची गरज आहे, एक म्हणजे तुम्ही काय खाता, पिता आणि दुसरं म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती किती मजबूत आहे.

उत्तम आहारातूनच रोगप्रतिकारक

मनुष्याला कोणताही आजार झाला आणि त्याला जर पोषक आहार दिला तर तो आजारातून लवकर बरा होतो. उत्तम आहारातूनच रोगप्रतिकारक शक्ती चांगली करता येते. उत्तम आहार आणि तुमच्या खाण्यापिण्याकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष दिल्यास तुम्ही लवकर बरे होऊ शकता असे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत की, तुम्ही कोरोना बरोबरच कोणताही आजार झाला तर या पदार्थांचे सेवन केले तर तुम्ही लवकर बरे होऊ शकता.

आजारातून बरे होण्यासाठी तुम्हाला आहारातूनच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता येते. तुमचे खाणे पिणे चांगले असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचा आजारातून बरे होण्यासाठी मदत होते. त्यामुळे कोरोनाच्या या काळात तुमची तब्बेत बरी झाली नसेल तर काही गोष्टींकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्या. त्यामुळे आजारातून तुम्ही लवकर बरे होऊ शकता.

व्हिटॅमिन डी

शरीरासाठी हे एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे, त्याच्या कमतरतेमुळे अनेक आजार आपल्याला घेरतात. व्हिटॅमिन डी शरीरातील अँजिओटेन्सिनचे झालेल्या रुपांतरित एंझाईम 2 वर आसर करत असते. हा एक प्रकारचा प्रोटीन रिसेप्टर आहे, आणि जो फुफ्फुसात आढळत असतो. कोरोना झालेल्या नागरिकांच्या फुफ्फुसातच सर्वात जास्त समस्या निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे या अशा परिस्थितीत, व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण झाली तर ती तुम्हाला आजारी पाडते. व्हिटॅमिन डी असलेल्या गोष्टी खात राहा. उन्हात बसून व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवरही मात करता येऊ शकते.

झिंकमुळे पांढऱ्या रक्त पेशीमध्ये वाढ

सध्या जगात कोरोना झालेले अनेक रुग्ण आहेत, कोरोनामुळे आरोग्याला झालेला तोटा भरून काढायचा असेल तर झिंकयुक्त पदार्थांचे सेवन करावे. झिंकमुळे पांढऱ्या रक्त पेशीमध्ये वाढ होते, आणि त्याचा फायदा रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी होतो. पांढऱ्या रक्त पेशी रोगप्रतिकारक शक्तीमध्ये अत्यंत महत्वाचा घटक असतो. शरीरात अनेक प्रकारच्या पांढऱ्या रक्त पेशी असल्यामुळे त्यातील काही अँटीबॉडीज तयार करण्यासाठी त्या मदत करतात. या पेशी सूक्ष्मजीव पकडतात आणि त्यांचा नाश करण्याचे कामही करतात. त्यासाठी तुम्ही डार्क चॉकलेट, काजू, मसूर आणि स्प्राउट्स इत्यादींचे सेवन करू शकता.

व्हिटॅमिन सी

आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी हे फार महत्वाचे असतात. हे सुद्धा एक प्रकारचे अँटिऑक्सिडेंट आहे, त्यामुळे शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते. कोरोना झालेल्या माणसाला जर व्हिटॅमिन सी दिले तर ते खूप लवकर बरे होतात. यासाठी संत्री, लिंबू, किवी आणि आवळा यांसारख्या पदार्थांचे सेवन करून तुम्ही व्हिटॅमिन सीच्या कमतरतेवर मात करू शकता.

संबंधित बातम्या

शरीरात काही लक्षणं दिसताच करू नका दुर्लक्ष, वेळीच व्हा सावध, अन्यथा लिव्हर होऊ शकते खराब!

नेहमी थकल्यासारखं वाटतं? या वाईट सवयींमुळे बिघडते आरोग्य

जास्त मीठाचं सेवन करताय? आजच आहारातून कमी करा, टक्कल पडण्यासोबतच अनेक दुष्परिणाम…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.