डेंग्यू, मलेरिया सारख्या पावसाळी आजारांमुळे कोव्हिड संसर्गाचा धोका दुप्पट, डॉक्टरांनी दिला इशारा
कोविड 19 सारख्या महामारीच्या काळात आता पावासाळी आजारांनीही डोके वर काढले आहे. पावसाळ्यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या विषाणुजन्य रोगांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
मुंबई : कोविड 19 सारख्या महामारीच्या काळात आता पावासाळी आजारांनीही डोके वर काढले आहे. पावसाळ्यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या विषाणुजन्य रोगांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. तसेच बुरशीजन्य, उघड्यावरील अन्न आणि पाण्यामुळे होणारे रोग आणि इतर त्वचेचे संक्रमणात वाढ झाली आहे. या आजारांची लक्षणे काहीशी कोरोना सारखीच असल्याने अशी लक्षणे आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Rainy diseases like dengue, malaria double the risk of covid infection, doctors warn)
कोविड 19 आणि मलेरिया किंवा/आणि डेंग्यूचे एकाच वेळी होणारे संक्रमण रोखणे ही काळाची गरज आहे. कोविड 19 च्या प्रोटोकॉलचे पालन करा आणि संसर्ग होण्याची शक्यता टाळण्यासाठी चांगली वैयक्तिक स्वच्छता ठेवा, असे तज्ज्ञ डॉक्टर म्हणतं आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जून महिन्यात 357 मलेरिया रूग्ण आढळले होते. तर जुलै अखेरच्या आठवड्यात मलेरियाचे 557रूग्ण नोंद झाल्याने चिंता वाढली आहे. एकूण रुग्णांमध्ये 57 टक्के वाढ झाली असून इतर पावसाळी आजारांत 20 ते 30 टक्के वाढ झाल्याचे समोर येत आहे.
दरम्यान गॅस्ट्रोचे 221 रूग्ण, 29 लेप्टो, 19 डेंग्यू, 34 काविळ आणि 6 एच1एन1 चे रूग्ण आढळले. कोहिनुर हॉस्पीटलचे वरिष्ठ फिजीशियन डॉ. शरत कोलके सांगतात, दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात शहरातील मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, कावीळच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असते. या आजारांमध्ये ताप, अतिसार, उलट्या होणे, डोकेदुखी आणि सांधेदुखीसारखी ही लक्षणे दिसून येतात. खोकला, वास तसेव चव जाणे किंवा घसा खवखवल्यासारखी लक्षणे कोविड -19च्या निदानात मदत करू शकतात.
सम लक्षणांमुळे कोविड रुग्ण ओळखून त्यादृष्टीने अचूक उपचार करणे आव्हनात्मक ठरत आहे. डेंग्यू आणि मलेरियाला दूर ठेवण्यासाठी, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती काढून टाकली पाहिजेत. पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था आहे याची खात्री करून घ्या. डास चावणे टाळण्यासाठी पूर्ण बाहीचे कपडे घाला आणि डास प्रतिबंधक आणि जाळी वापरा आणि वेळोवेळी फवारणी करण्याची गरज आहे. चेंबूरच्या झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जनरल फिजीशियन तसेच संसर्गज्य रोग तज्ञ डॉ विक्रांत शहा म्हणाले की, सध्या आमच्याकडे डेंग्यू आणि मलेरियाची रुग्ण वाढत चालले आहेत.
गेल्या दोन आठवड्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आमच्याकडे उपचाराकरिता आलेल्या रुग्णांपैकी एकाला लेप्टोस्पायरोसिसचे निदान झाले होते. जर लोकांचा ताप 2-3 दिवसात कमी होत नसेल तसेच थंडी, पुरळ येणे, डोकेदुखीशी होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे .हे लक्षणे मलेरिया, डेंग्यूची देखील असू शकतात. लहान मुले आणि वृद्धांकडे त्वरित लक्ष दिले पाहिजे. पावसाळ्यात ताप उलट्या आणि जुलाब आणि डोळे पिवळसर होणे, कावीळ सारखी लक्षणे दिसताच पोटविकार तज्ञांचा सल्ला घ्या.
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधोपचार करा स्वतःच्या मर्जीने उपचार करू नका. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन टाळण्यासाठी, हातांची स्वच्छता राखा, फक्त उकळलेले पाणी प्या, शिळे किंवा कच्चे किंवा दूषित अन्न खाणे टाळा किंवा दुषित पाणी, रस्त्यावरील पेय, द्रव पदार्थांचे सेवन टाळा. शिळे आणि उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नका. खराब पाण्यात जाऊ नका, लसीकरण टाळू नका, लेप्टोस्पायरोसिसला कारणीभूत असलेल्या उंदीरांना दूर ठेवण्यासाठी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, असेही डॉ. शहा यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातम्या :
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ किती आणि कुणाला मिळतो? अर्ज कुठे करायचा?https://t.co/6CXyxz6ROE#MPJAY | #MahatmaPhuleJanArogya | #Maharashtra | #healthcare
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2021
(Rainy diseases like dengue, malaria double the risk of covid infection, doctors warn)