राज्यात 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण आजपासून सुरू

राज्यात शनिवारपासून (19 जून) 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

राज्यात 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण आजपासून सुरू
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 10:04 AM

मुंबई : राज्यात आजपासून (19 जून) 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या कोरोना लसीकरणास सुरुवात होत आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (Rajesh Tope declared Corona vaccination of 30-44 age group in Maharashtra from 19 June 2021).

लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा राज्यांना दिल्यानंतर निर्णय

18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केलाय. त्याप्रमाणे 19 जूनपासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.

लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर करता येणार

शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन अॅपमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकिस्तक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठविले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

औरंगाबादमध्ये सक्तीच्या लसीकरणावर विचार

दरम्यान, टक्केवारी वाढत नसल्यामुळे लसीकरण सक्तीचे करण्याचा विचार औरंगाबाद महानगरपालिकेकडून केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या 35 हजार लसी पडून आहेत. लसी असूनही नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. याच कारणामुळे मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडे यांच्याकडून हा विचार केला जातोय.

सर्वांना लसीकरण सक्तीचे

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. दुसरी लाट सरल्यामुळे लोक आता घराबाहेर पडू लागले आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण युद्धपातळीवर राबविने गरजेचे आहे. तसे प्रयत्न विविध जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहेत. मात्र, असे असले तरी औरंगाबादकर लसीकरणाविषयी सतर्क आणि जागरुक असल्याचे दिसत नाही. येथे लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी वाढत नाहीये. याच कारणामुळे औरंगाबाद पालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मनपा प्रशासक पांडे हे औरंगाबाद शहरात लसीकरण सक्तीचे करण्याचा विचार करत आहेत.

हेही वाचा :

Photo : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांनी घेतली कोरोनाप्रतिबंधक लस, पाहा फोटो

औरंगाबाद शहरात सक्तीचे लसीकरण ? 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन

‘अहंकाऱ्यांनो जरा शिका’; नितीन राऊतांकडून कार्टुनद्वारे पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

व्हिडीओ पाहा :

Rajesh Tope declared Corona vaccination of 30-44 age group in Maharashtra from 19 June 2021

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.