Ramzan 2022 : गरोदरपणात रोजा ठेवत आहात?, मग या गोष्टी लक्षात ठेवा!
रमजानच्या (Ramzan) पवित्र महिन्याला सुरूवात झाली आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा ठेवतात. यामध्ये सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्तानंतर खाल्ले जाते. विशेष म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न (Food) किंवा पाणी देखील सेवन केले जात नाही. सूर्योदयापूर्वी घेतलेल्या जेवणाला सेहरी म्हणतात.
मुंबई : रमजानच्या (Ramzan) पवित्र महिन्याला सुरूवात झाली आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा ठेवतात. यामध्ये सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्तानंतर खाल्ले जाते. विशेष म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न (Food) किंवा पाणी देखील सेवन केले जात नाही. सूर्योदयापूर्वी घेतलेल्या जेवणाला सेहरी म्हणतात आणि सूर्यास्तानंतर घेतलेल्या जेवनाला इफ्तार असे म्हणतात. जवळपास 14 तास काहीही खाल्ल्याशिवाय राहणे सोपे नाही. यादरम्यान ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना (Women) रोजामध्ये काही प्रमाण सुट दिली जाते.
रोजा ठेवणे गर्भवती महिल्यांसाठी कितपत योग्य
आज आपण जाणून घेणार आहोत की, रोजे ठेवणे गर्भवती महिल्यांसाठी कितपत योग्य आहे. तज्ञांच्या मते, गर्भधारणेदरम्यान महिलेला जास्त पोषक तत्वांची आवश्यकता असते. कारण तिच्या शरीराच्या गरजेसोबतच बाळाचा विकास देखील होत असतो. याचदरम्यान गर्भवती महिलेने काही खाल्ले किंवा पिले नाहीतर निर्जलीकरण होण्याची शक्यता असते. यामुळे गर्भवती महिलेने ठेवलेले रोजे हे तिच्यापेक्षा अधिक बाळासाठी धोकादायक ठरू शकतात. जर एखाद्या महिलेला रोजे ठेवण्याची इच्छाच असेल तर रोजा ठेवण्याच्या अगोदर एखाद्या तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेणे कधीही अधिक फायदेशीर ठरेल.
आहारामध्ये या घटकांचा समावेश करा
जर गर्भवती महिलेला रोजा ठेवायचाच असेल तर त्यांनी आपल्या आहारामध्ये खनिजे, फायबर, जीवनसत्त्वे यांचा समावेश करायला हवा. तसेच हिरव्या भाज्या सह कडधान्यांचा देखील आहारात समावेश करायला हवा. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे तज्ज्ञांकडून तुम्ही डाएट प्लान तयार करून घेतला तर ते अधिक उत्तम राहिल. मसालेदार, तेलकट आणि तुपकट पदार्थ खाणे तर पूर्णपणे टाळाच. त्याऐवजी ताक, फळांचे आणि भाज्यांचे ज्यूस देखील घ्यावे.
डाॅक्टरांच्या संपर्कात राहा…
रोजा दरम्यान थोडी जरी तब्येत बिघडल्यासारखी वाटत असेल तर लगेचच डाॅक्टरांचा सल्ला घ्या. जर तुमचे शरीर खूप कमजोर असेल किंवा शरीरात रक्ताची कमतरता असेल तर उपवास करू नका. यामुळे तुमची आणि बाळाची स्थिती बिघडू शकते. रोजामध्ये सेहरी आणि इफ्तारमध्ये जास्तीत-जास्त हेल्दी पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुमचे आणि तुमच्या बाळाचे आरोग्य निरोगी आणि चांगले राहण्यास नक्की मदत होईल.
(वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे, tv9 यावर कोणताही दावा करत नाही)
संबंधित बातम्या :
Health care : रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी हे आहेत सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या याबद्दल सविस्तर!
Health Care : उन्हाळ्यात या गोष्टींचा आहारात समावेश करा आणि वजन कमी करा!