Eating Raw food reduced diabetes: कच्चे पदार्थ खाल्याने दूर होतो मधुमेह आणि लठ्ठपणा ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
रॉ फूड म्हणजेच कच्चे (अन्न) पदार्थ खाल्याने डायबिटीस अर्थात मधुमेहचा त्रास दूर होऊ शकतो, अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. एवढेच नव्हे तर लठ्ठपणावरही नियंत्रण मिळवता येते.
मधुमेह हा खराब जीवनशैलीमुळे होणारा एक अतिशय गंभीर आजार आहे. मधुमेहामुळे (diabetes) शरीरात इतर अनेक आजारही बळावतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (world health orgnisation) आकडेवारीनुसार, जगात सुमारे 42.2 कोटी लोक हे मधुमेहाने ग्रासलेले आहेत. त्याशिवाय मधुमेहामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दरवर्षी सुमारे 15 लाख लोकांचा मृत्यू होतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि तसेच जीवनशैलीमुळे (bad lifestyle) मधुमेह हा आजार होतो.
त्यामुळे कच्चे अन्न खाल्ल्याने मधुमेह पूर्णपणे नष्ट होऊ शकतो, असा दावा एका संशोधनातून करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर रॉ फूड म्हणजेच कच्चे पदार्थ हे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही खूप उपयुक्त आहेत. याच कारणामुळे आजकाल लोक मधुमेह दूर करण्यासाठी व्हेगन डाएट किंवा कच्च्या अन्नापदार्थांचा पर्याय अवलंबवत आहेत.
प्रक्रिया केलेले पदार्थ टाळण्यासाठी उत्तम पर्याय
जेव्हा आपण अन्न शिजवतो किंवा त्यावर प्रकिया करतो तेव्हा त्यामधील अनेक पोषकद्रव्ये नष्ट होतात. याचा दुष्परिणाम असा होतो की, त्यात अनेक घातक रसायनेही आढळतात. त्यामुळेच रॉफूड किंवा प्लांट बेस्ड फूड हे आजार किंवा रोग दूर करण्याचे उत्तम सूत्र मानले जाते. रॉ फूडमध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात आणि त्यात असलेले अनेक प्रकारचे एन्झाइम हे लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त ठरतात, असे एचटीच्या बातमीत नमूद करण्यात आले आहे. परंतु रॉ फूडमुळे मधुमेह दूर केला जाऊ शकतो का ? एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, रॉ फूडचे किंवा कच्चा अन्नपदार्थांचे सेवन केल्याने मधुमेह दूर होऊ शकतो. रॉ फूड हे हेल्दी मानले जाते कारण शिजवलेले पदार्थ हे मीठ व साखरमुक्त असतात. आपल्या आहारातून प्रक्रिया केलेले आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड काढून टाकण्यासाठी रॉ फूड हा एक चांगला पर्याय असू शकतो, असे आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी असे स्पष्ट केले आहे.
अनेक प्रकारे फायदेशीर ठरते रॉ फूड
गरिमा गोयल यांच्या सांगण्यानुसार, अन्न हे साधारणत: ४० ते ४८ अंश सेल्सिअस तापमानात शिजवून मग सेवन केले जाते. मात्र त्यामुळे त्यातील अनेक प्रकारचे पोषक घटक नष्ट होतात. पण व्हेगन डाएट, ताक, किफिर, कंबूचा असे पदार्थ शिजवण्याची गरज नाही. रॉ फूडचा मधुमेहाच्या रुग्णांना अनेक प्रकारे फायदा होतो, असे गरिमा यांनी सांगितले. रॉ फूडमध्ये कोणतेही जंक फूड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ नसतात. त्याचे सेवन करून कोणतीही व्यक्ती वजन कमी करू शकते. त्या आहारात साखर किंवा मीठही नसते. त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याचा धोका टळतो. याव्यतिरिक्त, रॉ फूडमध्ये डायट्री फायबर असते जे आपल्या पाचन तंत्रासाठी उत्तम असते. त्याचे पचन अतिशय हळू होते, त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढण्याचा धोका नसतो. रॉ फूड खाऊन आपण मधुमेह दूर करू शकतो का? याबाबत गरिमा गोयल यांनी असे सांगितले की, मधुमेह कमी करण्यासाठी रॉ फूड हे नक्कीच उपयुक्त ठरू शकते. मात्र केवळ तेवढेच पुरेसे नाही. मधुमेह दूर करण्यासाठी रॉ फूड हा एकमेव उपाय असू शकत नाही. त्यासाठी अनेक पावले उचलण्याची गरज आहे, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.
रॉ फूड म्हणजे काय ?
साधारणत: फळे, सॅलॅड, ताक, वाफेवर शिजवलेल्या हिरव्या भाज्या, बदाम, ड्रायफ्रुट्स , ज्यूस, सूप, बिया इत्यादी पदार्थांचा रॉ फूडमध्ये समावेश होतो. हे पदार्थ मिक्स करून अनेक नवे पदार्थ बनवले जातात.