‘ब्रेन स्ट्रोक’ची लक्षणे दिसताच काळजी घ्या, उशीर झाल्यास जीवावर बेतेल!

साधारणत: स्ट्रोकचे दोन प्रकार आहेत. पहिला ‘ब्लड क्लॉट स्ट्रोक’ आणि दुसरा ‘ब्रेन हॅमरेज’. स्ट्रोकच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे तीव्र डोकेदुखी. रुग्णाला नीट बोलता येत नाही. त्याची जीभेची बोबडी वळते. शरीर सुन्न होउन जाते.

‘ब्रेन स्ट्रोक’ची लक्षणे दिसताच काळजी घ्या, उशीर झाल्यास जीवावर बेतेल!
‘या’ आजाराने त्रस्त असल्याने, ब्रूस विलिस यांनी स्विकारली निवृत्तीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 12:26 PM

मुंबई : देशात काही वर्षांपासून ब्रेन स्ट्रोकचा (Brain Stroke) धोका वाढताना दिसत आहेत. लोकांना या आजाराबद्दल तसेच यातील लक्षणांची (symptoms) योग्य माहिती नसते. शिवाय अनेकदा डोकेदुखी तसेच इतर लक्षणांकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असते. जागृतीचा अभाव आणि रुग्णालयात पोहोचण्यास उशीर यामुळे मृत्यूचे प्रमाण (Death rate) वाढत आहे. शरीरात स्ट्रोकची लक्षणे दिसू लागताच तातडीने उपचार करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यासाठी लोकांमध्ये या आजाराबाबत जागरुकता असणे गरजेचे आहे. देशात दरवर्षी 18 लाख लोकांना ‘ब्रेन स्ट्रोक’चा त्रास होतो. त्यातून सुमारे 30 टक्के लोकांचा मृत्यू होतो. ब्रेन स्ट्रोकचा आजार काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत आणि ते कसे टाळता येईल याबाबत या लेखात जाणून घेणार आहोत.

एम्सच्या सेंटर फॉर न्यूरोसायन्सेसचे प्रमुख प्राध्यापक असलेले एम.व्ही. श्रीवास्तव यांच्या मते, डोक्याच्या वेगवेगळ्या भागांना रक्तपुरवठा योग्य न झाल्यास मेंदूचा झटका येतो. शरीरातील ऑक्सिजन आणि रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे मेंदूतील नसा कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे पक्षाघातही होतो. स्ट्रोकचे दोन प्रकार आहेत. पहिला ‘ब्लड क्लॉट स्ट्रोक’ आणि दुसरा ‘ब्रेन हॅमरेज’आहे. स्ट्रोकच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे तीव्र डोकेदुखी. रुग्णाला नीट बोलता येत नाही. शरीर किंवा हात पाय सुन्न होऊ लागतात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास उशीर न करता तातडीने जवळच्या रुग्णालयात जावे. कारण स्ट्रोक झाल्यास लवकर उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असते. विलंबाने रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. स्ट्रोकच्या बाबतीत पहिले तीन ते चार तास खूप महत्त्वाचे असतात. मात्र बहुतांश रुग्ण उशिराने रुग्णालयात पोहोचल्याचे दिसून येते, त्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या व्यक्तींना सर्वाधिक धोका

वरिष्ठ फिजिशियन डॉ. कमलजीतसिंग कैंथ यांच्या मते, ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आहे आणि जे लोक जास्त प्रमाणात दारू आणि सिगारेटचे सेवन करतात. त्यांना पक्षाघाताचा धोका जास्त असतो. म्हणूनच जे लोक भरपूर दारू पितात त्यांनी त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, शक्य असल्यास दारू पूर्णपणे सोडून देणे उत्तम. सिगारेट ओढणाऱ्यांनाही पक्षाघाताचा सर्वाधिक धोका असतो. तसेच ज्या लोकांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांनी स्वत:ची नियमित तपासणी करत राहावी, तसेच सकस आहार व नियमित व्यायाम करावा

असा टाळा धोका!

1) दररोज व्यायाम करा.

2) प्रदूषित वातावरणापासून दूर राहा.

3) नेहमी ताजा व सकस आहार घ्या.

4) ‘स्ट्रोक’ची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

संबंधित बातम्या

वंध्यत्वाची समस्या? हा ओटीपोटाचा क्षयरोग तर नाही… ही आहेत लक्षणे

Yoga Poses : चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी ‘हे’ 5 योगासन नियमित करा!

मळमळ, मूड स्विंग आणि बरंच काही, गरोदरपणातील समस्यांवर सात घरगुती उपाय

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.