Monkeypox: मंकीपॉक्स आणि तीच ती नेहमीची शंका ! हे रशियाचं ‘बायोवेपन’ आहे की…? जाणून घ्या
मंकीपॉक्स बायोवेपन: माजी सोव्हिएत शास्त्रज्ञ कर्नल कानाट अलिबेकोव्ह यांनी दावा केला आहे की 1990 च्या दशकात रशियाला मंकीपॉक्स बायोवोपन म्हणून वापरायचे होते. आता आलेला हा आजार म्हणजे रशियाचेच कारस्थान असल्याचा संशय शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
कोरोना महामारीनंतर आता, जगभरात मंकीपॉक्स आजाराची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. स्वीडन, स्पेन, पोर्तुगाल, यूके, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये मांकीपॉक्सची (Of monkeypox) प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतात आतापर्यंत असे एकही प्रकरण समोर आलेले नाही, परंतु वैद्यकीय सुत्रांनी याबाबत दक्षता घेणे सुरू केले आहे. युरोपपासून अमेरिकेपर्यंत हाहाकार माजवणाऱ्या मंकीपॉक्सबाबत एक नवा दावा (New claim) समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी सोव्हिएत शास्त्रज्ञ कर्नल कानाट अलीबेकोव्ह यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, 1990 च्या दशकात सोव्हिएत युनियनला मंकीपॉक्सचा वापर बायोवेपन (Bioweapon) म्हणून करायचा होता. सोव्हिएत युनियनमध्ये फूट पडेपर्यंत अलिबेकोव्ह हे बायोवेपन कार्यक्रमाचे उपप्रमुख होते. त्यावरून असा प्रश्न निर्माण झाला आहे की जगभरात वेगाने पसरत असलेला मंकीपॉक्स खरंच, रशियाचे बायोवेपन आहे का?
बायोवेपन म्हणजे काय ?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, कोणतेही जीवाणू, विषाणू, बुरशी यांचा जैविक शस्त्रांद्वारे म्हणजेच बायोवेपनच्या माध्यमातून, वापर केला जातो. अशा शस्त्रांचा वापर करण्यामागे लोकांना आजारी पाडण्याचा उद्देश असतो. अनेक प्रकरणांमध्ये यामुळे मृत्यू देखील होतो. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोकाही वाढतो. यामुळे केवळ मानवच नाही तर झाडे-वनस्पती, प्राणी यांचेही नुकसान होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते, जैविक शस्त्रे दोन प्रकारे वापरली जाऊ शकतात. पहिला वेपनाइज्ड एजंट आणि दुसरी डिलिव्हरी यंत्रणा. अशा शस्त्रांचा वापर राजकीय हत्येसाठी केला जाऊ शकतो. गुरांमध्ये संसर्ग पसरू शकतो आणि शेती पिकांचा नाश होऊ शकतो, जेणेकरून देशात अन्न संकट येईल. तसेच जगभरात, मोठ्या प्रमाणात रोगराई पसरू शकते. वेपनाइज्ड एजंट मध्ये, ज्यामध्ये जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा विष (प्राणी किंवा वनस्पतींचे विष किंवा कृत्रिमरीत्या तयार केलेले विष) वापरले जाऊ शकते ते म्हणजे शस्त्रयुक्त एजंट. तर, डिलिव्हरी मेकॅनिझम अशी आहे की, ज्यामध्ये बायोवेपन मिसाईलद्वारे सोडले जाते, तर डिलिव्हरी मेकॅनिझम अशी आहे की ज्यामध्ये बायोवेपन मिसाइल, बॉम्ब किंवा रॉकेटद्वारे सोडले जाते.
हे होऊ शकते का?
हो नक्कीच होऊ शकते. जगभरातील अनेक देश बायोवेपनवर काम करत आहेत. जैविक शस्त्रांच्या वापराबाबत अनेक वर्षांपासून भीती व्यक्त केली जात आहे. तेव्हाच सुमारे 50 वर्षांपूर्वी अशा शस्त्रांचा वापर थांबवता यावा म्हणून आंतरराष्ट्रीय कायदा करण्यात आला होता. जैविक शस्त्रांचा वापर रोखण्यासाठी 1972 मध्ये कायदा करण्यात आला. यामध्ये कोणताही देश जैविक किंवा विषारी शस्त्रे बनवणार नाही किंवा वापरणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. या कायद्यावर रशियासह 183 देशांनी स्वाक्षरी केली आहे.
मंकीपॉक्स हे जैव शस्त्र आहे का?
असे म्हणता येणार नाही. पण रशियाला ते जैव-शस्त्र म्हणून वापरायचे होते, असा दावा माजी सोव्हिएत शास्त्रज्ञाने केला आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) नुसार, हा रोग पहिल्यांदा 1958 मध्ये दिसून आला होता. त्यानंतर संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये हा संसर्ग आढळून आला. त्यामुळे त्याला मंकीपॉक्स असे नाव पडले. या माकडांमध्ये स्मॉलपॉक्ससारखी लक्षणे दिसून आली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, मानवांमध्ये मंकीपॉक्सची पहिली केस 1970 मध्ये नोंदवली गेली. त्यानंतर काँगोमध्ये राहणाऱ्या ९ वर्षांच्या मुलामध्ये हा संसर्ग आढळून आला. 1970 नंतर, 11 आफ्रिकन देशांमध्ये मानवांना मंकीपॉक्सची लागण झाल्याची प्रकरणे नोंदवली गेली. जगात मंकीपॉक्सचा संसर्ग आफ्रिकेतून पसरला आहे. 2003 मध्ये, अमेरिकेत मंकीपॉक्सची प्रकरणे नोंदवली गेली. सप्टेंबर 2018 मध्ये, इस्रायलमध्ये मंकीपॉक्स आणि ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे आढळून आली. मे 2019 मध्ये, नायजेरियाला प्रवास करून परत आलेल्या लोकांमध्ये सिंगापूरमध्येही मंकीपॉक्सची प्रकरणे समोर आली आहेत.