जनऔषधी योजनेच्या माध्यमातून वर्षभरात 5 हजार कोटींपेक्षा अधिक बचत; तुम्हीही घेऊ शकता योजनेचा लाभ
जनऔषधी योजनेच्या माध्यमातून वर्षभरात 5 हजार कोटींपेक्षा अधिक बचत झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : देशात आरोग्य सेवेचा विस्तार व्हावा, गरिबातील गरीब लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारने (Central Government) भारतीय जनऔषधी योजना सुरू केली आहे. या योजनेचा गरजू लोकांना मोठ्याप्रमाणात फायदा होत असल्याचे समोर आले आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना अगदी माफक दरात चांगल्या प्रतीची औषधे (Medications) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा जसा जसा प्रसार वाढत आहे. तशीतशी या योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्या देखील वाढत असल्याचे समोर आले आहे. नागरिक आता औषधे खरेदीसाठी भारतीय जनऔषधी योजनेंतर्गत येणाऱ्या मेडिकल सेंटरची निवड करत असल्याने नागरिकांचे औषधींवर होणारे पैसे देखील मोठ्याप्रमाणात वाचत असल्याचे समोर आले आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandvia) यांनी ट्विट करत आतापर्यंत भारतीय जनऔषधी योजनेंतर्गत किती रुपयांची बचत झाली याची माहिती दिली आहे.
औषधि बचत की।
हे सुद्धा वाचाPM @NarendraModi जी द्वारा चलाई गयी ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधि परियोजना’ देश के आम व्यक्ति को सस्ती एवं उत्तम दवाई उपलब्ध करवाने का सबसे बड़ा माध्यम बन रही है।
पिछले वर्षों में जनऔषधि स्टोर के जरिए लोगों का दवाइयों के ऊपर खर्च कम हुआ है और बचत में वृद्धि हुई है। pic.twitter.com/q2rofx5ZfO
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) May 18, 2022
2021-22 मध्ये 5360 कोटींची बचत
नागरिक स्वस्त जनऔषधी केंद्राचा पर्याय निवडत असल्याने खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. 2021-22 मध्ये या योजनेच्या माध्यमातून नेमकी किती बचत झाली याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेंतर्गत आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये तब्बल 5360 कोटी रुपयांची बचत झाली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात या बचतिचा आकडा हा 2500 कोटी रुपये एवढा होता. तर 2020-21 मध्ये हा आकडा 4000 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षात त्यामध्ये वाढ होऊन तो 5360 कोटींवर पोहोचला आहे. म्हणजेच जसजसा या योजनेचा प्रसार होत आहे. तसतसे नागरिक देखील या योजनेंतर्गत येणाऱ्या मेडिकल सेंटरमधून औषधी खरेदीला प्राधान्य देत असल्याचे मांडवीया यांनी म्हटले आहे.
स्वस्त दरात औषधांचा पुरवठा
तळागातील लोकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी. महागाड्या औषधीपासून त्यांची सुटका व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत येणाऱ्या मेडिकल सेंटरवर बाजार भावाच्या तुलनेत अगदी स्वस्त दरात औषधे उपलब्ध होतात. औषधांची गुणवत्ता उच्च असते तसेच ही औषधे स्वस्त दरात अपलब्ध असल्याने सामान्यातील सामान्य माणूस देखील ही औषधे खरेदी करू शकतो. यामुळे नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यास मदत झाली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील आरोग्य मंत्र्यांच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे.