कोरोना व्हॅक्सिनच्या मॉडेलनुसार प्लेगची व्हॅक्सिन तयार; 40 लोकांवर होणार ट्रायल

हजारो वर्षापासूनचा आजार असलेल्या प्लेगवर एकदाचं औषध सापडलं आहे. ऑक्सफर्ड व्हॅक्सिन ग्रुपच्या संशोधकांनी ही व्हॅक्सिन तयार केली आहे. (Scientists are Testing A Vaccine Against The PLAGUE Based On The AstraZeneca Vaccine)

कोरोना व्हॅक्सिनच्या मॉडेलनुसार प्लेगची व्हॅक्सिन तयार; 40 लोकांवर होणार ट्रायल
PLAGUE
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 7:36 AM

नवी दिल्ली: हजारो वर्षापासूनचा आजार असलेल्या प्लेगवर एकदाचं औषध सापडलं आहे. ऑक्सफर्ड व्हॅक्सिन ग्रुपच्या संशोधकांनी ही व्हॅक्सिन तयार केली आहे. कोरोना व्हॅक्सिनच्या मॉडेलवर ही व्हॅक्सिन तयार करण्यात आली आहे. लवकरच या व्हॅक्सिचन्या पहिल्या फेजची ट्रायल सुरू होणार आहे. 18 ते 55 वर्ष वयोगटातील 40 लोकांचा या ट्रायलमध्ये समावेश करण्यात येणार आहे. व्हॅक्सिनचे साईड इफेक्ट, आजाराला रोखणारी प्रतिकारशक्ती आदी गोष्टी या ट्रायलमधून समजणार आहे. (Scientists are Testing A Vaccine Against The PLAGUE Based On The AstraZeneca Vaccine)

आजही अधूनमधून प्लेगचे रुग्ण सापडत असतात. आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील ग्रामीण भागात प्लेगचे रुग्ण सापडत असतात. कोरोना महामारीमुळे लोकांना व्हॅक्सिनचं महत्त्व समजलं आहे. बॅक्टेरिया व्हायरसपासून वाचणं किती महत्त्वाचं आहे हे या आजाराने दाखवून दिलं आहे. लोक हजारो वर्षांपासून प्लेगचा सामना करत आहेत. प्लेगची भीती आजही लोकांमध्ये आहे. त्याच्यापासून बचावासाठी व्हॅक्सिनची नितांत आवश्यकता आहे, असं ऑक्सफर्ड व्हॅक्सिन ग्रुपचे डायरेक्टर सर अँड्र्यू पोलार्ड यांनी सांगितलं.

ग्रामीण भागाला फायदाच होणार

प्लेग झाल्यास अँटिबायोटिक्सद्वारे त्यावर नियंत्रण आणता येतं. मात्र, ग्रामीण क्षेत्रात वैद्यकिय सुविधांचा अभाव असतो. अशावेळी ही व्हॅक्सिन ग्रामीण भागासाठी वरदानच ठरेल, असं व्हॅक्सिन एक्सपर्ट क्रिस्टिन रोलियर यांनी सांगितलं. ही व्हॅक्सिन म्हणजे इंजेक्शन असेल असंही त्यांनी सांगितलं.

प्लेग होण्याची कारणं

>> येर्सिनिया पेस्टिस बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे प्लेग फैलावत असल्याचं ऑक्सफर्ड व्हॅक्सीन ग्रुपने सांगितलं. उंदिरामुळे प्लेगचा संसर्ग पसरतो. या बॅक्टेरियाने संक्रमित असलेला उंदिर चावल्यास प्लेग होतो.

>> प्लेग झाल्यार प्रचंड ताप येतो. सूज येते, श्वास घेण्यास त्रास होतो. काही प्रकरणात खोकताना तोंडावाटे रक्त पडतं. वेळीच उपचार झाला नाही तर या आजाराने मृत्यू ओढवतो.

>> संक्रमित उंदिर चावल्याने प्लेग होतोच. पण बॅक्टेरिया संक्रमित प्राण्यांच्या आजूबाजूला राहिल्यास किंवा त्याला उचलून घेतल्यासही प्लेग होतो. संक्रमित व्यक्तीच्या लाळेच्या संपर्कात आल्यास दुसऱ्या निरोगी व्यक्तिलाही प्लेग होतो.

>> अँटिबायोटिक्सद्वारे त्यावर उपचार केला जाऊ शकतो. मात्र, ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा नसल्याने प्लेगच्या रुग्ण संख्येत वाढ होते.

>> आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील गावांसहीत जगभारत 2010-2015 दरम्यान प्लेगचे 3,248 रुग्ण सापडले होते. तर या काळात प्लेगमुळे 548 लोक दगावले होते. (Scientists are Testing A Vaccine Against The PLAGUE Based On The AstraZeneca Vaccine)

संबंधित बातम्या:

नाभी तेल चिकित्सेचा नियमित अभ्यास केल्यास 5 आरोग्यदायी फायदे; वाचा कसे?

अमेरिकेत कोरोनाचा स्फोट, एकाच दिवसात 1 लाखापेक्षा जास्त रुग्ण, जगाचं टेन्शन वाढलं

जगभरात दरवर्षी 9 लाखाहून अधिक लोकांचा अकाली मृत्यू कशामुळे?; अमेरिकन संशोधकांनी केला ‘हा’ दावा

(Scientists are Testing A Vaccine Against The PLAGUE Based On The AstraZeneca Vaccine)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.