कोरोनाची लाट किती दिवस राहणार?, काय केले पाहिजे?; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात

| Updated on: Apr 17, 2021 | 12:25 PM

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशाचं कंबरडं मोडलं आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच असून कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. (Second wave of coronavirus can last up to 100 days: Expert)

कोरोनाची लाट किती दिवस राहणार?, काय केले पाहिजे?; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात
coronavirus
Follow us on

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशाचं कंबरडं मोडलं आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच असून कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची लाट किती दिवस राहील असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते कोरोनाची ही दुसरी लाट 100 दिवस राहणार आहे. जोपर्यंत 70 टक्के लोकांचं लसीकरण होत नाही, तोपर्यंत कोरोनाची लहर राहील. लसीकरणामुळे हर्ड इम्युनिटी, संसर्गजन्य आजारांविरोधात अप्रत्यक्षपणे बचाव होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. (Second wave of coronavirus can last up to 100 days: Expert)

लोकांना मोठ्या प्रमाणावर लस दिल्यानंतर किंवा संसर्गातून बाहेर पडल्यानंतर इम्युनिटी विकसित होते. समूहाच्या या इम्युनिटीला हर्ड इम्युनिटी म्हणतात, असं तज्ज्ञांनी सांगितलं.

पुन्हा इन्फेक्शन का होतं?

नवा म्युटेटेड व्हायरस अधिक संक्रामक आहे. एक सदस्य प्रभावित झाला तर संपूर्ण कुटुंबाला संसर्ग होतो. लहान मुलांनाही त्याची लागण होते. नवा व्हायरस अधिक संक्रामक असल्याने लस घेतल्यानंतरही पुन्हा कोरोना होतो. नियमितपणे करण्यात येणाऱ्या आरटी-पीसीआर चौकशीतून म्युटेटेड व्हायरसचा पत्ता लागत नाही. कोरोना झालाय याची जाणीव न होणं हाच संबंधित व्यक्तीला कोरोना झाल्याचा संकेत आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

मास्क लावणं हाच जालीम उपाय

कोरोना व्हायरसची दुसरी लाट 100 दिवस राहू शकते. जोपर्यंत 70 टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत या संसर्गावर नियंत्रण मिळवता येणार नाही. जेव्हा तुम्ही कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात 15 मिनिटं की किंवा त्यापेक्षा अधिक काळ संपर्कात येता तेव्हा कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता असते. लठ्ठपणा, मधुमेह, क्रोनिक किडनी आजार आदी आजारांच्या व्यक्तिंनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. तसेच मास्क लावणं, हात धुणं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हाच कोरोना रोखण्यावर एकमेव उपाय आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. (Second wave of coronavirus can last up to 100 days: Expert)

 

संबंधित बातम्या:

कोरोनापासून स्वतःचा बचाव करायचाय, तर मास्क लावताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

उस्मानाबादमध्ये कोरोना मृत्यूची लपवाछपवी, मृत्यूनंतर रुग्ण निगेटिव्ह, आक्षेपानंतर पुन्हा पॉझिटिव्ह

BMC ने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर द्यावेत, बेड मिळण्यात अडचण येऊ देऊ नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

(Second wave of coronavirus can last up to 100 days: Expert)