पोटातील वाढत्या केमिकल्सचा गर्भावर गंभीर परिणाम! गरोदर महिलांनी हे संशोधन वाचायलाच हवं
नुकताच अमेरिकेमध्ये एक संशोधन करण्यात आले आणि त्या संशोधनामध्ये काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा समोर आला आहे. संशोधनानुसार धोकादायक कमिकल्स आणि बंद करण्यात आलेली रसायनही गर्भाशयात आढळून आली आहेत. हे संशोधन गरोदर महिलांवर करण्यात आले होते.
आपण नेहमीच पाहतो की, गर्भधारणेदरम्यान (Pregnancy) महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच गर्भपात होण्याच्या केसेसमध्येही मोठी वाढ झाली आहे. काही वर्षांपूर्वी गर्भपात होण्याची प्रकरणे खूप कमी होती. मात्र, सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये (Lifestyle) गर्भधारणेमध्ये अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहेत. जवळपास 10 पैकी 8 महिलांचे सिजर देखील होते आहे. कारण सध्या कमिकल्स (Chemical) आणि रसायनांचा वापर आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळेच महिलांना गरोदरपणात अनेक समस्या निर्माण होत आहेत.
संशोधनातून धक्कादायक वास्तव्य समोर
नुकताच अमेरिकेमध्ये एक संशोधन करण्यात आले आणि त्या संशोधनामध्ये काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा समोर आला आहे. संशोधनानुसार धोकादायक कमिकल्स आणि बंद करण्यात आलेली रसायनही गर्भाशयात आढळून आली आहेत. हे संशोधन गरोदर महिलांवर करण्यात आले होते. कमिकल्स आणि रसायनांमुळे गर्भवती महिलेसोबतच तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाचा विकासही खुंटण्याची भीती आहे. अभ्यासातील एका महिलेमध्ये 80 टक्क्यांहून अधिक रसायने आढळून आली. ही एक अत्यंत धोकादायक बाब आहे.
आई आणि बाळासाठी ही केमिकल्स धोकादायक
कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक जे. वुड्रफ म्हणाले की, गर्भवती महिलांच्या गर्भामध्ये इतके जास्त रसायने मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, हे गर्भवती महिला आणि तिच्या बाळासाठीही धोकादायक आहे. मात्र, यामध्ये काही महिला या धूम्रपान करत असल्याचे देखील पुढे आले. जरी रसायने प्रचलित होती. मात्र, लॅटिनामध्ये पॅराबेन्स, फॅथलेट्स आणि बिस्फेनॉलचे प्रमाण जास्त आढळले. यामुळेच आपण दररोजच्या जीवनामध्ये केमिकल्सचा वापर अत्यंत कमी करायला हवा. यासंदर्भात aninews ने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.