67 टक्के भारतीयांमध्ये कोरोना अँटीबॉडी, 40 कोटी लोकांना अद्यापही संसर्गाचा धोका, चौथ्या सिरो सर्वेत दावा
भारत कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या काठावर असतानाच काहिसी दिलासादायक बातमी आहे. चौथ्या राष्ट्रीय सिरो सर्वेत भारतातील 67 टक्के भारतीयांमध्ये कोरोना अँटिबॉडी आढळल्याचा दावा करण्यात आलाय.
नवी दिल्ली : भारत कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या काठावर आहे. त्यातच आता चौथ्या राष्ट्रीय सिरो सर्वेत भारतातील 67 टक्के भारतीयांमध्ये कोरोना अँटिबॉडी आढळल्याचा दावा करण्यात आलाय. दुसरीकडे अद्यापही 40 कोटी नागरिकांना कोरोना संसर्गाचा धोका असल्याचंही स्पष्ट झालंय. ICMR चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी याबाबत माहिती दिली. जून-जुलैमध्ये 21 राज्यांमधील 70 जिल्ह्यांमध्ये हा सिरो सर्वे करण्यात आला. यात 6-17 वयोगटातील मुलांचाही समावेश होता. भार्गव म्हणाले, “आम्ही 7 हजार 252 हेल्थकेअर वर्कर्सचा अभ्यास केला. यात 10 टक्के लोकांनी लस घेतलेली नव्हती. यात एकूण 85.2 टक्के ‘सिरोप्रिव्हिलन्स’ (seroprevalence) आढळला.
डॉ. बलराम भार्गव म्हणाले, “या सिरो सर्वेत सामान्य लोकसंख्येत 2/3 म्हणजे 6 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये SARS-CoV-2 संसर्ग होता. यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे यातील एक तृतीयांश लोकसंख्येत अँटीबॉडी नव्हत्या. म्हणजे देशात अजूनही 40 कोटी लोकसंख्या कोरोना संसर्गाच्या धोक्यात आहे. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलं कोरोना संसर्गाचा अधिक चांगल्या प्रकारे सामना करु शकतात.”
The 4th round of national serosurvey was conducted in 70 districts in June-July and included children of 6-17 years of age: ICMR DG Dr Balram Bhargava pic.twitter.com/mMxyJU0vBH
— ANI (@ANI) July 20, 2021
“6-9 वर्षांच्या मुलांमध्ये प्रौढांइतक्याच अँटीबॉडी आहेत. विशेष करुन तरुण मुलांमध्ये प्रौढांप्रमाणेच अँटीबॉडी एक्सपोजर आढळलं. काही देशांमध्ये प्राथमिक शाळा बंदच करण्यात आल्या नव्हत्या. अशा परिस्थितीत भारतात शाळा सुरू करायच्या असतील तर आधी प्राथमिक शाळा सुरू कराव्या लागतील. प्राथमिकनंतर माध्यमिक शाळा सुरू कराव्या लागतील. मात्र, त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण होणं आवश्यक आहे. शाळा सुरू होतील मात्र त्यासाठी काही निकषांची पुर्तता करावी लागेल,” असंही नमूद करण्यात आलं.
“लवकरच शाळा सुरू होणार”
कोरोना रुग्णांच्या संख्येतील घट आणि लहान मुलांमध्ये प्रौढांपेक्षा अधिकच्या अँटिबॉडी यामुळे लवकरच मुलांना शाळेत पाठवता येईल, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलंय. दुसरीकडे निती आयोगाचे सदस्य डॉ वीके पॉल म्हणाले, “अजूनही मोठ्या लोकसंख्येला कोरोना संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा. ज्यांनी कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेतलेत त्यांनीच प्रवास करावा.”
हेही वाचा :
कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसनंतर जास्त अँटीबॉडी तयार होतात, ICMR प्रमुखांचा दावा
कोरोनाचा सामना करणारी शरीरातील ‘आर्मी, पोलीस आणि स्पेशल टास्क फोर्स’, कशी काम करते? वाचा…
Corona | मॉडर्ना वॅक्सीन मानवी शरीरात 3 महिन्यात बनवू शकते अँटीबॉडी, रिसर्चमध्ये दावा
व्हिडीओ पाहा :
Sero survey suggest that 40 crore people of India still have corona infection risk