Brinjal | नियमित आहारामध्ये वांगं वापरत असाल तर पच्छाताप होण्याआधीच काही गोष्टी जाणून घ्या!

Side Effects of Brinjal: वांग्याचे भरीत किंवा वांग्या पासून बनवलेली कोणतीही डिशचे नाव ऐकताच आपल्या तोंडाला पाणी येऊन जाते अशातच अनेकजण असे सुद्धा आहेत की आठवड्यातून तीन ते चार दिवस फक्त आपल्या आहारामध्ये वांग्याचा समावेश करत असतात. परंतु...

Brinjal | नियमित आहारामध्ये वांगं वापरत असाल तर पच्छाताप होण्याआधीच काही गोष्टी जाणून घ्या!
वांग्याचे दुष्परिणाम
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 5:01 PM

Side Effects of Brinjal : भारतीय आहारामध्ये आपण वेगवेगळे भाजीपालाचा समावेश करत असतो आणि या भाजीपाल्यांचा उपयोग करून आपण अनेक वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. आपल्यापैकी अनेकांना वांगी (Brinjal) आवडतात. वांगी हा भारतीय आहार पद्धती मध्ये एक अत्यंत महत्त्वाचा पदार्थ मानला गेलेला आहे. प्रत्येक शुभ कार्यामध्ये डाळ भात सोबत चवीला वांग्याची भाजी आवर्जून बनवली जाते. अनेक ठिकाणी वांग्याचे भरीत, वांग्याचे भाजी चवीसाठी प्रसिद्ध आहे. आपल्यापैकी अनेक जण असे सुद्धा आहेत की ज्यांच्या घरांमध्ये आठवड्यातून तीन ते चार वेळा वांग्याची भाजी सुद्धा बनवली जाते. वांगी खाणे हे जरी चांगले असले तरी जर तुम्ही सातत्याने वांगी खात असाल तर हे तुमच्या आरोग्याच्या (Health) दृष्टीने हानीकारक ठरू शकते, यामुळे तुमच्या शरीरामध्ये अनेक आजार निर्माण होऊ शकतात. वांगी हे चवीला स्वादिष्ट लागत असले तरी आरोग्याच्या दृष्टीने ही सवय चांगली नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला वांगी खाण्याचे कोणकोणते दुष्परिणाम (Harmful)आहेत, याबद्दलची महत्त्वाची माहिती सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…

जर तुम्ही वांगे नेहमी खात आहात आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आरोग्याची समस्या उद्भवत नसली तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्याला वांगे कधीच तळून नाही खायचे. यामुळे वांग्यात असणारे जे काही पोषक तत्व असतात ते नष्ट होऊन जातात.वांग्याला नेहमी भाजून किंवा शिजवून खाणे उत्तम मानले जाते.

या वेळी चुकून सुद्धा खाऊ नये वांगे

पोटाचे आजार असल्यावर – जर तुमचे पोट वेळेवर साफ होत नसेल,पोटामध्ये गॅस जमा झाला असेल, ऍसिडिटी ,बद्धकोष्ठता यासारखी पोटाशी निगडित असलेले आजार जर तुम्हाला झाले असतील तर अशा वेळी तुम्ही चुकून सुद्धा वांगे सेवन करू नका, अन्यथा पोटाशी निगडित असणाऱ्या समस्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच जातील आणि भविष्यात तुम्हाला या सगळ्या समस्यांचा सामना करावा लागेल.

प्रेग्नेंसी दरम्यान – प्रेग्नेंसी काळात तुम्हाला वांगी सेवन अजिबात करायचा नाही खरंतर या काळात जर तुम्ही वांग्याचे सेवन केले तर अशावेळी गर्भात वाढणाऱ्या बाळाची वाढ व्यवस्थितरीत्या होत नाही आणि जर असे झाले तर बाळासाठी व आईच्या आरोग्यासाठी ही गोष्ट भविष्यात चिंताजनक ठरू शकते.

वजन कमी करत असाल तर – जर तुमच्या शरीरावर अति लठ्ठपणा वाढलेला आहे, वजन कमी करण्यास तुम्ही प्रयत्न करत असाल तर अशा वेळी चुकून सुद्धा तुमच्या आहारामध्ये वांग्याचा समावेश करू नका. वांग्यामध्ये असे काही पोषक तत्व असतात व पदार्थ असतात जे तुमचे शरीर आतून वाढवण्यासाठी मदत करत असतात आणि अशावेळी जर तुम्ही वजन कमी करण्याचा एखादा प्लॅन करत असाल तर यावेळी आपल्या आहारातून वांग्याचा समावेश काढून टाका. जर तुम्ही वांगे खाल्ले तर अशावेळी वजन कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत जाईल.

कोणत्याही प्रकारचे एलर्जी असल्यास – जर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास वांग्याचे सेवन अजिबात करू नका. आपणास सांगू इच्छितो की वांगीचे सेवन केल्याने तुमच्या शरीरामध्ये जर कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर ती कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढू लागते. जर तुम्हाला डोळ्यासंबंधित कोणतेही आजार असतील, तुमच्या डोळ्याचे ऑपरेशन झालं असेल तर अशा वेळीसुद्धा वांगी खाऊ नका.वांगे खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये खाज निर्माण होते आणि जर शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल तर ती जखम बरी होणे याची दिवसेंदिवस चिघळत जाते.

किडनी संदर्भातील आजार असल्यास

जर तुम्हाला किडनी संदर्भातील कोणताही आजार असेल ,मुतखडा, मूत्राशययामध्ये असलेले इन्फेक्शन, लघवी करताना त्रास होत असेल तर अशा वेळी आपल्या आहारातून वांगे काढून टाका. वांग्यामध्ये असणाऱ्या ज्या काही बिया असतात त्या बी यामुळे आपल्या मूत्राच्या मार्गा मध्ये इन्फेक्शन निर्माण होते व तसेच किडनी संदर्भातील आजार सुद्धा होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याला किडनी संदर्भातील कोणतेही आजार भविष्यात होऊ नये तर अशावेळी वांग्याचा समावेश आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात करू नका.

टिप्स : ( या लेखांमध्ये सांगण्यात आलेली माहिती ही प्रामुख्याने सामान्य स्वरूपामध्ये तसेच तज्ञ मंडळींनी सांगितलेल्या मतांवर आधारित आहे आपणास टीव्ही 9 कोणत्याही प्रकारची माहितीचा उपयोग करण्याचा सल्ला देत नाही तसेच कोणताही उपचार करण्याआधी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा )

संबंधित बातम्या :

वीस मिनिटांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे हे पाच व्यायाम, ओमिक्रॉनला पळवून लावतील

Superfoods : हिवाळ्याच्या दिवसात सर्दी फ्लू पासून बचाव करायचाय, ‘ही’ सुपरफुडस तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर

तुमच्याद्वारे सुद्धा चुकून खाल्ले जात आहे प्लास्टिक? जाणून घ्याल तर घ्याल काळजी!!

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.