कोरोनानंतर नव्या धोक्याने दार ठोठावलं, बहिरेपणाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ

Side effects of coronavirus : एकीकडे कोरोना संसर्गाचा (corona) धोका असताना दुसरीकडे त्यापासूनचे 'साईड इफेक्ट्स' (Corona side effects) अर्थात दुष्परिणामांनी डोकं वर काढलं आहे.

कोरोनानंतर नव्या धोक्याने दार ठोठावलं, बहिरेपणाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ
ear pain
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 6:33 PM

नवी दिल्ली : एकीकडे कोरोना संसर्गाचा (corona) धोका असताना दुसरीकडे त्यापासूनचे ‘साईड इफेक्ट्स’ (Corona side effects) अर्थात दुष्परिणामांनी डोकं वर काढलं आहे. म्युकर मायकोसिसारखे (mucormycosis) धोके असतानाच आता कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना दुसऱ्याच एका त्रासाला सामोरं जावं लागत आहे. कोरोनातून बरं झालेल्यांना आता ऐकायला कमी (deafness ) येण्याचं प्रमाण वाढलं आहे. दिल्लीतील सरकार रुग्णालयात असे 15 रुग्ण दाखल झाले आहेत, ज्यांनी कोरोनावर मात केली आहे, मात्र त्यांना पहिल्यापेक्षा ऐकण्यास कमी येत आहे. (Side effects of coronavirus deafness risk increased after recovering from covid 19 in Delhi many patients found)

बहिरेपणाचा धोका?

दिल्लीतील एक खासगी डॉक्टर कोरोनाबाधित झाले होते. त्यांच्यावर ICU मध्ये 21 दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर कोरोनावर मात केल्यानंतर ते घरी परतले. मात्र त्यांना भलताच त्रास सुरु झाल्याचं जाणवलं. त्यांना पहिल्यासारखं ऐकण्यास येत नाही. मात्र ऐकण्याची क्षमता कमी कमी होत आहे हे त्यांना इतकं उशिरा जाणवलं की त्यांना आता श्रवण यंत्राशिवाय (Hearing Aid) ऐकताच येत नाही. उजव्या कानाने त्यांना ऐकायला येणं जवळपास बंद झालं आहे.

दिल्लीत दोन महिन्यात 15 रुग्ण

राजधानी दिल्लीतील सरकारी आंबेडकर रुग्णालयात गेल्या 2 महिन्यात 15 रुग्ण असे आले आहेत, ज्यांना कानाची समस्या आहे. एकतर कान दुखत आहे किंवा कमी ऐकण्यास येत आहे. हे सर्व रुग्ण कोरोनातून बरे झालेले रुग्ण आहेत. मात्र डॉक्टरांसमोर मोठं आव्हान उभं झालं आहे, कारण हे रुग्ण उपचारासाठी पोहोचत आहेत, तेव्हा खूप उशीर झालेला आहे. या रुग्णांची श्रवण क्षमता पूर्णत: गमावली आहे.

72 तासात उपचार आवश्यक

आंबेडकर रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ पंकज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुमचा कान दुखत असेल, जड वाटत असेल किंवा एखादा आवाज येतोय असं वाटत असेल तर 72 तासांच्या आत डॉक्टरांना दाखवा. सुरुवातीच्या काळात त्याच्यावर उपचार होऊन, श्रवण क्षमता शाबूत ठेवता येऊ शकते. मात्र जास्त वेळ केल्यास, त्यावर उपचार करणे कठीण होतं.

संबंधित बातम्या  

कोरोनानंतर देशात नव्या खतरनाक व्हायरसची एण्ट्री? पहिला रुग्ण आढळल्याचा दावा

Covid 19 Guidelines : मुलांना मास्कची गरज नाही, रेमडेसिव्हीरही अजिबात नको

Side effects of coronavirus deafness risk increased after recovering from covid 19 in Delhi many patients found

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.