Side effects of sugar : ‘रिफाइंड साखरे’चे शरीरावर होतात वाईट परिणाम; ‘ही’ लक्षणे दिसत असल्यास वेळीच व्हा सावध!
तुम्हाला माहिती आहे का की, जर तुम्ही जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केले तर ते तुमच्या शरीराला आतून खराब करू शकते. त्यामुळे, आपल्या शरीरात अशी काही लक्षणे दिसतात, ज्यामुळे तुमच्या शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते.
आपण रोज जे अन्नपदार्थ (Foodstuff) खात असतो, त्यामुळे आपल्या शरिराचे काही प्रमाणात नुकसान होते. पण तरीही ते आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून आपण त्याचे सेवन सुरूच ठेवतो. काही पदार्थांचे तोटे (Disadvantages of substances) आपल्याला माहिती असतात. पण, तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. येथे आपण रिफाइंड साखरेबद्दल बोलत आहोत, जी आपल्या शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचवते. अनेक संशोधनाचा हवाला देत डॉक्टर असे सांगतात की, साखर आपल्या शरीरासाठी चांगली नाही. काही लोकांना मिठाईची इतकी आवड असते की, त्यांना त्याची तल्लफ होऊ लागते आणि त्यांना डोकेदुखीचाही त्रास (Also headache) होऊ लागतो. दररोज आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे साखरेचे सेवन करतो. त्याच्या अतिसेवनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
4 चमचे साखर खाऊ शकता
संशोधनांनुसार, तुम्ही दररोज 4 छोटे चमचे साखरेचे सेवन करू शकता. परंतु, यापेक्षा जास्त साखर तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, ज्यावरून असे दिसून येते की साखरेचे जास्त सेवन केल्याने तुमचे शरीर आतून खराब होत आहे.
त्वचेवर खाज सुटणे
जर त्वचेवर सतत खाज येत असेल तर तुमच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी बिघडलेली आहे असे समजावे. शरीरातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने खाज येण्याची समस्या सुरू होते. साखरेमुळे इन्सुलिनची पातळी खालावते आणि ग्लायकेशनची प्रक्रिया सुरू होते. शरीरात ग्लुकोज गेल्याने त्वचेच्या समस्या सुरू होतात. अशाप्रकारे, केवळ खाजच नाही तर मुरुम देखील बाहेर येऊ लागतात.
वजन वाढणे
जास्त साखर खाल्ल्यास वजन वाढू शकते. वजन वाढून लठ्ठपणा येतो आणि या स्थितीत तुम्हाला अनेक आरोग्य समस्या येऊ शकतात. तुम्ही गोड चहा-कॉफी, चॉकलेट केक किंवा अशा इतर गोष्टी विचार न करता खातात, पण त्या तुमच्या शरीराला आतून खराब करण्याचे काम करतात. जर तुम्ही साखर टाळू शकत नसाल तर ते प्रमाण प्रमाणातच सेवन करा.
दात किडणे
दात किडणे हे देखील सांगते की, आपण आवश्यकतेपेक्षा जास्त साखर खात आहात. दात किडण्यामागे साखर हे नक्की कारण आहे की हे निश्तीत सांगता येत नसले तरी, साखरेचे अति सेवन दात किडण्यास कारण असू शकते. एखादी गोड पदार्थ काही काळ दातांमध्ये अडकून राहिल्यास, तुम्हाला दातदुखीचा सामना करावा लागू शकतो. दातांमध्ये अडकलेल्या अन्नामुळे दातांवर प्लेक तयार होतो आणि दातांत पोकळी निर्माण होते.