झोप चांगली हवी? मग ‘या’ 2 वाईट सवयींपासून सुटका करा
झोप अत्यंत गरजेची असते. विश्रांतीबरोबरच काम केल्यामुळे गमावलेली सर्व ऊर्जा परत आणणे हा यामागचा हेतू असतो. बहुतेक आरोग्य तज्ञांच्या मते, निरोगी प्रौढ व्यक्तीला 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे, परंतु प्रत्येकाला इतका वेळ नसतो.
मुंबई: दिवसभराच्या थकव्यानंतर आपल्याला झोप अत्यंत गरजेची असते. विश्रांतीबरोबरच काम केल्यामुळे गमावलेली सर्व ऊर्जा परत आणणे हा यामागचा हेतू असतो. बहुतेक आरोग्य तज्ञांच्या मते, निरोगी प्रौढ व्यक्तीला 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे, परंतु प्रत्येकाला इतका वेळ नसतो.
कमी झोप घेणे धोकादायक
हल्लीच्या धावपळीच्या आयुष्यामुळे आणि बिझी लाईफस्टाईलमुळे अनेकांना ४ ते ५ तास शांत झोप येते, त्यानंतर ते अनेकदा ऑफिसमध्ये थकलेले दिसतात. सलग अनेक दिवस कमी झोपल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास ती प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे पूर्ण झोप घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे.
‘या’ 2 वाईट सवयींपासून सुटका करा
वेळ असूनही झोप पूर्ण करता येत नसेल तर स्लीप डिसऑर्डर टाळण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करू शकता. यात काही वाईट सवयी तुम्हाला असतात, त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर या सवयी सोडाल तितक्या लवकर चांगलं.
1. अल्कोहोल आणि गांजाचे व्यसन
अल्कोहोल आणि गांजाचे सेवन नेहमीच आरोग्यासाठी वाईट मानले गेले आहे. यामुळे शरीराच्या अनेक भागांचे गंभीर नुकसान होते. परंतु काही लोक इच्छा असूनही ही सवय सोडू शकत नाहीत. काही लोकांना असे वाटते की, नशेमुळे झोप चांगली येते. पण याने आरोग्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे चांगली झोप घेण्यासाठी कधीही अल्कोहोल आणि गांजाचा वापर करू नका. झोपेच्या विकारामुळे तुम्हाला तणाव जाणवेल.
2. चुकीच्या पद्धतीने अलार्म सेट करणे
अलार्म वाजला की जाग येणार नाही, हे अनेकांना माहीत असतं, त्यामुळे ते मोबाईलमध्ये स्नूज बटण वापरतात. यामुळे अधूनमधून अलार्म वाजतो आणि लोक तो पुन्हा पुन्हा बंद करतात. जर तुम्हीही हे करत असाल तर आजच सोडा, कारण यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी यंत्रणेत ताण येतो, जो आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)