Health : तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, वाचा महत्वाचे!

पूर्वीच्या काळापेक्षा आता आपल्या जीवनशैलीमध्ये (Lifestyle) अनेक बदल झाले आहेत. सध्या धावपळीचे आयुष्य जवळपास सर्वांचेच सुरू आहे. ताण-तणाव (Stress) आणि धावपळीमुळे आपण आपल्या आहारावर जास्त लक्ष देत नाहीत. शिवाय बाहेरील तेलकट, तुपकट आणि मसालेदार पदार्थांचे अधिक सेवन करतो. मग याचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होतो.

Health : तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, वाचा महत्वाचे!
तोंड उघडे ठेऊन झोपणे धोकादायकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 11:26 AM

मुंबई : पूर्वीच्या काळापेक्षा आता आपल्या जीवनशैलीमध्ये (Lifestyle) अनेक बदल झाले आहेत. सध्या धावपळीचे आयुष्य जवळपास सर्वांचेच सुरू आहे. ताण-तणाव (Stress) आणि धावपळीमुळे आपण आपल्या आहारावर जास्त लक्ष देत नाहीत. शिवाय बाहेरील तेलकट, तुपकट आणि मसालेदार पदार्थांचे अधिक सेवन करतो. मग याचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होतो. निरोगी (Healthy) राहण्यासाठी चांगली अत्यंत आवश्यक मानले जाते. तज्ज्ञांच्या मते पूर्ण झोप घेतल्याने शरीरात ऊर्जा राहते. मात्र, झोपेमध्ये अनेकांना वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. पोटावर झोपणे किंवा तोंड उघडून झोपणे यांचा समावेश होतो. जे लोक तोंड उघडे ठेवून झोपतात त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो.

बॅक्टेरियाचा धोका

तज्ज्ञांच्या मते, तोंड उघडे ठेऊन झोपल्याने आपल्या दातांचे नुकसान होण्याची 100 टक्के शक्यता असते. त्यामुळे तोंडात असलेली लाळ कोरडी पडू लागते. लाळेच्या प्लेक्स तयार होण्यापासून प्रतिबंधित करते आणि अशा प्रकारे खराब बॅक्टेरिया काढून टाकते. या स्थितीत झोपल्यामुळे तोंडात दातांमधून रक्त येण्यासह इतर आजारही होऊ लागतात.

फुफ्फुसावर परिणाम

आपल्या बऱ्याच शारिरीक समस्यांचे कारण थकवा हा असतो. असे म्हणतात की तोंड उघडे ठेवून झोपल्याने फुफ्फुसांच्या कार्यावर वाईट परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते अशा झोपेमुळे फुफ्फुसातील ऑक्सिजनच्या प्रवाहावर परिणाम होतो. फुफ्फुसात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा येऊ लागतो. अशावेळी डाॅक्टरांचा सल्ला घेणे अधिक फायदेशीर ठरते.

ओठ कोरडे पडतात

तोंड उघडे ठेवून झोपण्याचा एक तोटा म्हणजे त्यामुळे आपले ओठ कोरडे होऊ लागतात. ओठ जास्त काळ कोरडे राहिल्यास ओठांची त्वचा फाटते.एवढेच नाही तर तोंडातील द्रव कोरडे पडल्याने घशातही त्रास होऊ लागतो. लोकांना एकावेळी काहीही गिळताना त्रास होऊ लागतो. जर तुम्ही या समस्येने त्रस्त असाल तर नक्कीच एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

दुर्गंधीची समस्या

तज्ज्ञांच्या मते, तोंड उघडे ठेवून झोपल्यामुळे हवेतील बॅक्टेरिया आपल्या दात आणि तोंडात बसतात. हे जीवाणू आणि घाण नंतर दुर्गंधीचे रूप घेतात. यामुळे शक्यतो प्रयत्न करा की, रात्री झोपताना तोंड उघडे राहणार नाही. जर आपल्याला ही समस्या सातत्याने होत असेल तर आपण डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा. तोंड उघडे ठेऊन झोपणे अजिबात चांगली सवय नाहीये.

संबंधित बातम्या : 

Skin Care : त्वचेवर नैसर्गिक चमक हवी आहे? मग आजच आपल्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करा!

Health : काकडी आणि कोथिंबीरच्या स्मूदीचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.