रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही या 5 पैकी एकतरी गोष्ट करत असाल, तर वेळीच सावध व्हा! अन्यथा होऊ शकते नुकसान
स्वस्थ शरीर आणि डोक शांत ठेवण्यासाठी पुरेशी आणि शांत झोप अत्यंत आवश्यक आहे. पण आपल्या चुकीच्या सवयी याला बाधा आणतात. रात्रीची चांगली झोप संपूर्ण दिवसाची एनर्जी टिकवून ठेवते. नियमित व्यायाम आणि स्वस्थ आहार चांगली झोप येण्यासाठी आवश्यक आहे.
वेगवेगळ्या अभ्यासातून हे समोर आले की, शरीर स्वस्थ (Healthy body) ठेवण्यासाठी आणि मेंदू अँक्टिव्ह ठेवण्यासाठी रात्रीची झोप पूर्ण झालीच पाहिजे. पण व्यस्त दिनचर्येत खूप लोकांना चांगल्या झोपेचा जसा विसरच पडला आहे. तज्ज्ञांच्या मते, जर रात्री नीट झोप झाली नाही तर हार्मोन्स, परफॉर्मन्स आणि मेंदूच्या नियोजित कार्यावर वाईट परिणाम होतो. इतकेच नाही तर वजन वाढते. गेल्या काही वर्षांत झोपण्याची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्हींवरही परिणाम झाला आहे. प्रत्यक्षात खूप जणांना झोप न येण्याची समस्या असते. पण याला ते स्वतः जबाबदार आहेत. तुमच्या चुकीच्या सवयी झोपेच्या आड येतात. या सवयींमुळे खूप वेळ झोपच येत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना गळल्यासारखे वाटते. असे जर दररोज होत असेल तर याचा प्रभाव तुमच्या फिटनेसवरही लगेच दिसून येतो. म्हणजे तुमची दिनचर्या तुमच्या संपूर्ण शरीरावर परिणाम करत असते. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी आणि झोपताना ज्या अँक्टीव्हीटी करता यावर तुमची झोप अवलंबून आहे. आता जर तुमची झोप नीट होत नसेल तर तुम्हाला तुमच्या काही सवयी बदलाव्या लागतील.
झोपण्यापूर्वी कॉफी नकोच
रात्री झोपण्यापूर्वी कॉफी पिण्याची सवय अनेकांना आहे. कॉफी मेंदूवर उत्तेजक प्रभाव टाकते. रात्रीपाळीवर असलेल्या सैनिकाप्रमाणेच कॉफीमुळे मेंदू अलर्ट होतो आणि झोप गायब होते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कँफिन किंवा मादक द्रव्य नकोच.
झोपेची वेळ निश्चित नसणे
तुमच्या झोपण्याच्या वेळा दररोज बदलतात काय? याचे उत्तर जर होय असेल तर ही सवय तुमच्या शरीराला अपायकारक आहे. त्यामुळे जसा तुमच्या कामाचे वेळापत्रक असते. अगदी तसेच तुमच्या झोपण्याची वेळ नक्की करावी लागेल
रात्री स्नँक्स ?
रात्री झोपताना भूक लागणे म्हणजे विचार करण्यासारखे आहे. जेव्हा तुम्ही रात्री उशीरापर्यंत टीव्ही- मोबाइल बघता तेव्हा तुम्हाला भूक लागते. ही सवय रात्रीच्या नाश्त्यात बदलत असेल तर ते अजून घातक ठरते. झोपण्यापूर्वी काही अपायकारक खाल्ल्याने शरीरावर सूज, गँसेस, अपचन होते आणि तुमची उर्वरित झोप खराब होते.
रात्री उशिरापर्यंत जागरण-
जागरण करण्याची सवय फिटनेसवर खूप जास्त परिणाम करते. लॉकडाउनमध्ये अनेकांनी जागरण सुरू केले. म्हणजे नेटफ्लि्क्स आणि हॉटस्टारवरचे अॉनलाइन शोजची मागणी वाढली. दिवसा वेळ मिळत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी हे कार्यक्रम बघणे अनेकांना सोईचे वाटत असल्याने रात्री उशिरापर्यंत मोबाइल- टीव्ही पाहला जातो. साहजिकच तुमच्या रूटीनवर याचा परिणाम होतो. सतत स्क्रीनच्या निळ्या प्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर झोप खराब होते. त्यामुळे जागरणाच्या या सवयीवर नियंत्रण आणायलाच हवे.
ब्रश न करणे
तुम्हाला हे माहिती नाही पण दातांची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. दिवसभरात केवळ एकदा दात घासणे पुरेसे नाही. दिवसातून कमीत कमी दोनवेळा ब्रश करा असे तज्ज्ञ सांगितात. स्वस्थ, चमकदार आणि मजबूत दातांसाठी दात स्वच्छ करणे आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी दात घासा आणि बघा तुम्हाला चांगली झोही येईल.
या सवयींपैकी काही सवयी किंवा हेच तुमचे रूटीन असेल तर या सवयी आजच बदला. या सवयी केवळ तुमच्या शरीरावर ताण आणत नाही तर अनेक आजारांना निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी मन शांत ठेवा आणि चांगली झोप घ्या.
संबंधित बातम्या
हिवाळ्यातील आरोग्य : बंद नाकाच्या समस्येबाबत अशी घ्या काळजी…
लग्नानंतरही येतेय प्रियकर किंवा प्रेयसीची आठवण, मग करा या 5 गोष्टी – सुखी होणार तुमचा संसार
हिवाळ्यातील आरोग्य : बंद नाकाच्या समस्येबाबत अशी घ्या काळजी…