कांद्याची पात का खावी? काय आहेत फायदे?
भारतासह जगभरात हृदयरुग्णांची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारात ज्या गोष्टी आरोग्यदायी मानल्या जातात, त्याच गोष्टी आपण निवडणे गरजेचे आहे. आहारतज्ञांनुसार आपण नियमित कांद्याच्या पातीचे सेवन केले तर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. काय काय फायदे आहेत कांद्याच्या पातीचे? बघुयात...
मुंबई: हार्ट अटॅक हा शब्द वारंवार ऐकण्यात येतोय. पूर्वी याचं प्रमाण फार कमी होतं.आता हे प्रमाण वाढत चाललंय. असं का होतंय? याला कारण आत्ताची जीवनशैली आहे. याला कारण आपण काय खातो ते आहे. आपल्या क्षणिक सुखासाठी आपण वाट्टेल ते खातो. तेलकट, उघड्यावर असणारं, पाव, ब्रेड या सगळ्याचा कशाचा कशाला ताळमेळ नसतो. परिणामी आपलं आरोग्य बिघडतं. हार्ट अटॅकला याच गोष्टी कारणीभूत आहेत. तेलकट पदार्थ खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमधील खराब कोलेस्ट्रॉल वाढते, ज्यामुळे रक्तदाब वाढू लागतो आणि नंतर तो हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर आजाराचे कारण बनतो. भारतासह जगभरात हृदयरुग्णांची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारात ज्या गोष्टी आरोग्यदायी मानल्या जातात, त्याच गोष्टी आपण निवडणे गरजेचे आहे. आहारतज्ञांनुसार आपण नियमित कांद्याच्या पातीचे सेवन केले तर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. काय काय फायदे आहेत कांद्याच्या पातीचे? बघुयात…
कांद्याच्या पातीचे फायदे
कांद्याच्या पातीमध्ये आहारातील फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 9, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के यासारखे महत्त्वपूर्ण पोषक असतात. याशिवाय या हिरव्या पालेभाजीमध्ये केम्फेरॉल, फ्लेव्होनॉइड्स, क्वेरसेटिन, अँथोसायनिन असते. कांद्याची पात खाल्ल्याने अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म मिळतात.
कांद्याच्या पातीत भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, ज्याच्या मदतीने रक्तदाब नॉर्मल राहण्यास मदत होते, कारण यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.
कांद्याची पात कॅल्शियमचा समृद्ध स्त्रोत मानली जातात, जी हाडांच्या मजबुतीसाठी खूप महत्वाची आहे. हे खाल्ल्याने हाडांची घनता वाढते आणि ते लवचिक होते. वयाची चाळीशी ओलांडलेल्या व्यक्तींची हाडे कमकुवत होऊ लागतात, अशा वेळी कांद्याची पात खूप उपयुक्त ठरू शकतात.
पोट बिघडण्याची तक्रार असेल तर रोजच्या आहारात कांद्याच्या पातीचा समावेश अवश्य करावा. यामुळे मूत्रपिंडाचे काम सोपे होते आणि त्याचबरोबर अन्न पचविण्यात कोणतीही समस्या येत नाही. ही पाने बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या दूर करतात
वाढत्या वयाबरोबर अनेकांच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवू लागते, ज्यामुळे ते लवकरच थकायला लागतात. अशा वेळी जर एखाद्या व्यक्तीने कांद्याच्या पातीचे सेवन केले तर त्याला व्हिटॅमिन सी मिळते आणि त्याचबरोबर शरीरात लोहाचे शोषण वाढते. कांद्याची पात खाल्ल्याने लाल रक्तपेशी वाढतात, ज्यामुळे ॲनिमियापासून सुटका मिळते.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)