Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health care tips | दिवसाची सुरुवात सुक्या मेव्याने केल्यावर मिळतात आश्चर्यकारक फायदे…

सकाळी सुक्या मेव्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. सकाळी सुक्या मेव्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. मात्र, कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा अधिक खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरते. त्याप्रमाणे ड्रायफ्रुट्सचे देखील अधिक सेवन करणे टाळा.

Health care tips | दिवसाची सुरुवात सुक्या मेव्याने केल्यावर मिळतात आश्चर्यकारक फायदे...
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 6:00 AM

मुंबई : ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर प्रमाणात पोषक असतात. त्यांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Beneficial) आहे. ड्रायफ्रुट्समध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. पोषणतज्ञांच्या मते, सकाळी ड्रायफ्रुट्सचे सेवन करणे आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया सकाळी ड्रायफ्रुट्स खाण्याचे फायदे. विशेष म्हणजे आपण ड्रायफ्रुट्सचे सेवन करून आरोग्याच्या अनेक समस्या सहजपणे दूर करू शकते. त्यामध्येही जर आपण रात्री झोपण्याच्या अगोदर जर बदाम आणि मनुके पाण्यात भिजत घातले आणि सकाळी त्याचे सेवन केले तर आरोग्याच्या समस्या (Problem) दूर होण्यास नक्कीच मदत मिळते.

सकाळी ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने दिवसभर उत्साही राहण्यास मिळते मदत

सकाळी ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने दिवसभर उत्साही राहण्यास मदत होते. ते तुमच्या शरीराला झटपट ऊर्जा देण्याचे काम करतात. तुम्ही भिजवलेल्या ड्रायफ्रुट्सचेही सेवन करू शकता. त्यांचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला अनेक पोषक द्रव्ये मिळतात. तसेच जर तुम्ही जिमला जात असाल तर जिमला जाण्याच्या काही वेळ अगोदर खारीकचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

हे सुद्धा वाचा

ड्रायफ्रुट्समध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने अधिक फायदा

ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर फायबर असते. त्यात चरबीही असते. ते पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करतात. हे कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात. त्यांचे सेवन केल्याने तुम्हाला बराच काळ पोट भरलेले वाटते. तसेच जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आपल्या आहारात नक्कीच ड्रायफ्रुट्सचा समावेश करा कारण हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास होते मोठी मदत

सकाळी सुक्या मेव्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. सकाळी सुक्या मेव्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. मात्र, कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा अधिक खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरते. त्याप्रमाणे ड्रायफ्रुट्सचे देखील अधिक सेवन करणे टाळा. सुक्या मेव्यामध्ये हेल्दी फॅट असते. त्यांच्याकडे अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. सुका मेवा हृदयाशी संबंधित समस्यांपासून वाचवण्याचे काम करतो. त्यांचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी राहते.

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.