Stevia Benefits : मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी चहामध्ये साखरेऐवजी स्टीविया वनस्पतीचा समावेश करा! वाचा अधिक!

मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही औषधी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात नसल्याप्रमाणेच कॅलरीज असतात. चहा किंवा अनेक गोड पदार्थांमध्ये आपण साखरेऐवजी ही वनस्पती वापरू शकता. बरेच लोक चहा आणि कॉफी गोड करण्यासाठी स्टीवियाच्या वाळलेल्या पानांचा वापर करतात.

Stevia Benefits : मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी चहामध्ये साखरेऐवजी स्टीविया वनस्पतीचा समावेश करा! वाचा अधिक!
Stevia
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 12:05 PM

मुंबई : स्टीविया एक औषधी वनस्पती आहे. जी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे या वनस्पतीची चव साखरेप्रमाणचे गोड आहे. स्टीविया वनस्पतीला गोड तुळस असेही देखील म्हणले जाते. त्याची पाने अगदी तुळशीच्या पानांसारखी दिसतात. (Stevia is extremely beneficial for health)

विशेष म्हणजे ही खास वनस्पती आपण आपल्या घरी देखील लावू शकता. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही औषधी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात नसल्याप्रमाणेच कॅलरीज असतात. चहा किंवा अनेक गोड पदार्थांमध्ये आपण साखरेऐवजी ही वनस्पती वापरू शकता.

बरेच लोक चहा आणि कॉफी गोड करण्यासाठी स्टीवियाच्या वाळलेल्या पानांचा वापर करतात. स्टीवियाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. हे लोह, प्रथिने, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, व्हिटॅमिन ए, सी सारख्या पोषक घटकांनी समृद्ध आहे. हे सर्व पोषक आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तसेच इतर अनेक आरोग्य फायदे देखील या वनस्पतीचे आहेत.

स्टीविया म्हणजे काय?

स्टीविया जगभरातील अनेक देशांमध्ये नैसर्गिक गोडव्यासाठी वापरली जाते. हे स्टीविया वनस्पती म्हणून देखील ओळखले जाते. सामान्यतः बोली भाषेत लोक त्याला गोड पाने म्हणतात. याचे सेवन करुन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाते. 2011 च्या एका संशोधनानुसार, स्टीवियामध्ये मधुमेह-विरोधी गुणधर्म आहेत. यासोबतच यात क्षती बीटा पेशीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी देखील गुणधर्म आहेत. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी स्टीविया खूप फायदेशीर आहे.

मधुमेहाच्या रुग्णासाठी फायदेशीर

स्टीवियामध्ये कॅलरीज जास्त नसतात. एका अभ्यासानुसार, स्टीवियाच्या वापरामुळे इन्सुलिनच्या प्रमाणावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी या वनस्पतीची पाने अनेक प्रकारच्या डिशमध्ये वापरू शकतात. स्टीविया साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

कर्करोग

या औषधी वनस्पतीमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे कर्करोगविरोधी लढते. स्टीवियामध्ये केम्फेरोल नावाचा अँटीऑक्सिडेंट घटक असतो. हे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतो. स्वादुपिंडाचा कर्करोग रोखण्यासाठी हे विशेषतः उपयुक्त आहे.

वजन कमी करण्यास मदत

स्टीविया ही वनस्पती गोड असूनही कॅलरीज खूप कमी असतात. वजन वाढवण्याची चिंता न करता आपण ते आपल्या आहारात समाविष्ट करू शकतात. विशेष म्हणजे स्टीवियाचा लहान मुलांच्या आहारात त्याचा समावेश करू शकता. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही साखरेऐवजी आहारामध्ये स्टीवियाचा समावेश करू शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

रक्तदाबाची समस्या

स्टीवियामध्ये ग्लायकोसाइड्स असतात. जे शरीरातून अतिरिक्त सोडियम काढून टाकण्यास मदत करतात. हे रक्तदाब पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. हे हृदयविकाराचा धोका कमी करते. यामुळे आपण आपल्या आहारात स्टीवियाचा समावेश केला पाहिजे.

असे करा सेवन

तज्ज्ञांच्या मते दररोज स्टीविया पावडर घेतल्यास मधुमेहामध्ये लवकरच आराम मिळतो. यासाठी अर्धा ग्रॅम स्टीविया पाण्यात किंवा दुधात मिसळा आणि दररोज त्याचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. साखरेपेक्षा 20 पट जास्त गोडपणा देखील देतो. हे इतर अनेक रोग निर्मूलन करण्यास सक्षम आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Stevia is extremely beneficial for health)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.