Stomach flu | तुमच्याही लहानग्यांना पोटाचा त्रास? स्टमक फ्लूची कारणं आणि लक्षणं

लहान मुलांमध्ये पोटाचा त्रास म्हणजे 'स्टमक फ्लू'चा त्रास दिसून येतो. नोरोव्हायरस, रोटाव्हायरस आणि एस्ट्रोव्हायरस यांसारख्या जीवाणूंमुळे हा त्रास होतो. साधारण दूषित पाणी आणि अन्नातून स्टमक फ्लू होतो. लहान मुलांना कशामुळे हा त्रास होता आणि याची लक्षण काय आहेत ते आपण जाणून घेऊयात.

Stomach flu | तुमच्याही लहानग्यांना पोटाचा त्रास? स्टमक फ्लूची कारणं आणि लक्षणं
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 11:40 AM

मुंबई : साधारण 2 ते 3 वर्षांपर्यंत लहान मुलांची पचनशक्ती कमी असते. त्यांना अनेक पदार्थ पचविण्यास जड जातात. त्यामुळे त्यांना वरच्या वर पोटात गॅस होण्याचा त्रास होतो. तसंच लहान मुलांमध्ये साधारण पोटाचा त्रास म्हणजे स्टमक फ्लू (Stomach flu) यालाच गॅस्ट्रोएन्टेरिटिस असंही म्हणतात. नोरोव्हायरस, रोटाव्हायरस आणि एस्ट्रोव्हायरस यांसारख्या जीवाणूंमुळे हा त्रास होतो.

स्टमक फ्लू म्हणजे नेमकं काय होतं?

स्टमक फ्लू हा एक प्रकारचा इन्फेक्शनचा प्रकार आहे. हे इन्फेक्शन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टवर परिणाम करतं. आणि यामुळे तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होऊन पचनशक्ती कमजोर होते. हा फ्लू डॉक्टरांना सहज लक्षात येतो. पण काही खबरदारी म्हणून डॉक्टर काही रक्ताच्या चाचण्या करु घेतात. त्यामुळे या फ्लूची तीव्रता कळते. आणि मग उपचार करणं सोपं जातं.

लहान मुलांना स्टमक फ्लू होण्याची कारणं

लहान मुलांची पचनशक्ती कमजोर असते. त्यामुळे त्यांना सहज पोटाचे विकार होऊ शकतात. लहान मुलांना दूषित पाणी आणि अन्नातून इन्फेक्शन होऊन स्टमक फ्लू होऊ शकतो. लहान मुलं सतत काहीतरी खात असतात अशातून त्यांना पोटाला त्रास होऊ शकतो. नवजात बालकांना स्टमक फ्लू होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून लहान मुलांच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. लहान मुलं कुठही खेळतं बागडतं, शाळेत, बागेत जातं तिथे वस्तूसोबत येणारा संपर्क किंवा टॉयलेट सीट, खेळणी अगदी कशातूनही लहान मुलांना इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे त्यांना कायम हात धुण्याची सवय लावली गेली पाहिजे.

स्टमक फ्लूची लक्षणं काय?

जुलाब उल्टी मळमळणं पोटात दुखणं पोट कडक होणं भूक कमी लागणं ताप चिडचिड करणे डोकं दुखणे

यावर काय आहे उपचार?

वरील लक्षणं आढळल्यास सर्वप्रथम डॉक्टरांकडे जावं. कारण पोटात इन्फेक्शन झाल्यामुळे सगळ्यात पहिलं लक्षण असतं ते म्हणजे जुलाब आणि उल्टी. त्यामुळे मुलं जेवत नाही आणि त्यांना अशक्तपणा येतो. म्हणून त्यांना लगेचच डॉक्टरांकडे घेऊन जाणे. डॉक्टर काही चाचण्याकरुन अशावेळी मुलांना जास्त जास्त पाणी प्याजण्याचा सल्ला देतात. आणि एंटीबायोटिक औषधांचा कोर्स सुरु करतात.

संबंधित बातम्या :

Music Therapy | ‘संगीत थेरपी’ चा अवलंब करा …. अन आनंदीदायी जीवनशैली अनुभवा

शरीराला नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ आयुर्वेदिक उपाय फायदेशीर!

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.