अति ताणामुळे कमी होऊ शकते वजन ? जाणून घ्या परस्परसंबंध….

तणावामुळे आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तणावामुळे काही लोकांचे वजन वाढू शकते तर काहींचे वजन कमी होते. एका संशोधनातून ही माहिती नुकतीच समोर आली आहे.

अति ताणामुळे कमी होऊ शकते वजन ? जाणून घ्या परस्परसंबंध....
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 2:14 PM

Stress and Weight Loss:ताण-तणावामुळे (Stress) अनेक लोकांना मानसिक व्याधींचा सामना करावा लागतो, हे आपण आत्तापर्यंत ऐकले आहे. त्याचा परिणाम शरीरावर होऊन अनेकांचे वजनही वाढते. तणावामुळे आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर अतिशय गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही लोकांचे वजन वाढू शकते. मात्र नुकत्याच एका संशोधनातून (Research) धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार, तणावाचा शरीरावर गंभीर परिणाम (many changes in body) तर होतोच पण त्यामुळे काही लोकांचे वजन कमीही (weight loss) होऊ शकते. यामागे नेमके काय कारण असू शकते व ते आपल्या शरीरासाठी किती धोकादायक ठरू शकते, याबद्दल सखोल माहिती जाणून घेऊया. मेडिकल न्यूज टुडेने सादर केलेल्या अहवालानुसार, तणावामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो व त्यामुळे वर्तणुकीत अनेक बदलही होऊ शकतात. तणावामुळे काही लोकांच्या वजनात बदल होऊ शकतो. त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलू शकतात. जे वजन वाढणे किंवा कमी होणे, यासाठी कारणीभूत ठरू शकते. मात्र तणाव नियंत्रित केल्यास वजनही नियंत्रणात येऊ शकते. तणावामुळे इन्फ्लेमेशन होऊ शकतो, ज्याचा परिणाम मेटाबॉलाइज्ड प्रक्रियेवरही होतो.

तणावाचा असा होतो परिणाम

तणावामुळे आपल्या शरीरातील सिंपेथेटिक नर्व्हस सिस्टीम एपिनफ्रीन हे ट्रिगर होते. ज्यामुळे शरीरातील फाईट रिस्पॉन्स सिस्टीम कार्यरत (ॲक्टीव्ह) होते. या परिस्थितीत आपल्या हृदयाची गती वाढते आणि श्वासोच्छ्वासही जलद होऊ लागतो. त्यामुळे शरीरातील कॅलरी जास्त बर्न होतात, परिणामी पचन (डायजेशन) व रक्तातील साखरेचे प्रमाणही बदलते. यामुळे वजन कमी होऊ शकते. याशिवाय तणावाच्या स्थितीत आपली पिट्युटरी ग्लँड ही, ॲड्रेनल ग्लँडला कॉर्टिसोल रिलीज करण्याचा संकेत देते. हे हार्मोन यकृतातून फॅटी ॲसिड आणि ग्लूकोज रिलीज करून शरीराची एनर्जी वाढवतो. त्याचा परिणामही वजनावर दिसून येतो.

हे सुद्धा वाचा

मेंदू – गॅस्ट्रोइंटेस्टायनल संपर्कही होतो प्रभावित

तणावामुळे मेंदू व गॅस्ट्रोइंटेस्टायनल यांच्यातील संपर्क प्रभावित होतो. त्यामुळे हार्टबर्न, अन्नपदार्थ गिळण्यास त्रास होणे, गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, उलटी होणे, भूक कमी लागणे, डायरिया, बद्धकोष्ठता आणि स्नायूंमध्ये पेटके येणे, असे अनेक त्रास होऊ शकतात. या सर्व समस्यांमध्ये काहीही खाणे अथवा पिणे अतिशय कठीण होते. परिणामी शरीराचे वजन झपाट्याने कमी होत जाते. ही परिस्थिती शरीरासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. त्यामुळे असा कोणताही त्रास जाणवू लागल्यास वेल न घालवता त्वरित डॉक्टरांकडे जावे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.