टेन्शन घेणे बंद करा अन्यथा वाढू शकतो लठ्ठपणा, स्ट्रेसमुळे अनेक आजारांचा धोका

ज्या लोकांना छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल ताण घ्यायची सवय असते त्यांच्यासाठी लठ्ठपणाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

टेन्शन घेणे बंद करा अन्यथा वाढू शकतो लठ्ठपणा, स्ट्रेसमुळे अनेक आजारांचा धोका
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 12:43 PM

नवी दिल्ली – साधारणत: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव (no exercise) या गोष्टी लठ्ठपणासाठी (causes of obesity) कारणीभूत ठरू शकतात. मात्र वजन वाढण्याची इतरही अनेक कारणे असतात. काही औषधांचा दुष्परिणाम, पुरेशी झोप न घेणे आणि तणाव (stress can lead to weight gain) या गोष्टींमुळेही वजन वाढू शकते. काही अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की ज्या लोकांच्या जीवनात अधिक ताण असतो त्यांचे वजनही वेगाने वाढू शकते व असे लोक लठ्ठपणाची शिकार होतात. ताणामुळे लठ्ठपणा कसा वाढतो, हे पाहूया.

जास्त ताण घेतल्यामुळे होते हे नुकसान

हार्मोनल असंतुलन वाढते

हे सुद्धा वाचा

तणावामुळे अनेकदा शरीरातील हार्मोन्सची पातळी वाढते आणि हे हार्मोन्स वजन वाढवण्याचे काम करतात. कार्टिसोल हार्मोन्स पातळी वाढल्यामुळे शरीरावरील सूज वाढते आणि लोकांचे शरीर जाड दिसायला लागते.

मधुमेहाशी संबंधित समस्या वाढतात

जास्त ताण घेतल्यास आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे शरीराची सूज वाढू शकते. तसेच लठ्ठपणाही वाढतो.

थायरॉईडची समस्या होऊ शकते गंभीर

थायरॉइड ग्रंथी योग्य प्रकारे काम करत नसल्याने मेटाबॉलिज्म आणि पचनशक्तीही कमकुवत होते, ज्यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते. वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो.

शरीरात चरबी जमा होऊ शकते

तणावामुळे शरीरातील प्रोजेस्टेरॉनची (progesterone)पातळी कमी होते आणि त्यामुळे इस्ट्रोजेनची पातळी वाढते. एस्ट्रोजेनमुळे शरीरात चरबीची पातळी वाढू शकते. एकंदरच जास्त तणाव हा आपल्या शरीरासाठी नुकसनादायक ठरतो व वजनही वाढू शकते.

(टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.