Miscarriage : उन्हाळ्यात गर्भपात होण्याची शक्यता जास्त, नव्या संशोधनातून निष्कर्ष, महिलांनो आरोग्य सांभाळा!

उन्हाळ्यात महिलांमधील मिसकॅरेजची (गर्भपात) शक्यता वाढू शकते, असा धक्कादायक निष्कर्ष बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अभ्यासातून निघाला आहे. BUSHPच्या मते, 30 टक्क्यांपर्यंतच्या गर्भधारणचा शेवट गर्भपातात होतो.

Miscarriage : उन्हाळ्यात गर्भपात होण्याची शक्यता जास्त, नव्या संशोधनातून निष्कर्ष, महिलांनो आरोग्य सांभाळा!
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 1:10 PM

मुंबई : आई-वडील होणं हा जगातला सगळ्यात मोठा आनंद असतो म्हणतात. नव्या जीवाला जन्माला घालणं, त्याला मोठं होताना बघणं ही सर्वांसाठीच आनंदाची बाब असते. मात्र मिसकॅरेजमुळे तो आनंदाचा क्षण दु:खात रुपांतरित होऊ शकतो. उन्हाळ्याच्या काळात महिलांमध्ये मिसकॅरेजचे (miscarriages in women) चान्सेस वाढू शकतात, अशी धक्कादायक माहिती बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या (BUSHP) अभ्यासातून (study)समोर आली आहे. BUSHPच्या मते, 30 टक्क्यांपर्यंतच्या गर्भधारणचा शेवट गर्भपातात होतो. गर्भधारणेच्या 20 आठवड्यापूर्वीच गर्भपात झाल्यास त्याला गर्भधारणेचं नुकसान ( प्रेग्नन्सी लॉस) म्हणून संबोधलं जातं. त्यापैकी अर्ध्याहून जास्त मिसकॅरेजचे कारण कळू शकत नाही. मात्र त्यामधील धोक्यामुळे पोस्ट-ट्रॉमॅटिक डिसऑर्डर, डिप्रेशन आणि ॲंक्झायटी असे अनेक परिणाम महिलांच्या आरोग्यावर होऊ शकतात.

‘एपिडेमिलॉजी’ या जर्नलमध्ये हे निष्कर्ष छापून आले आहेत. तापमानानुसार मिसकॅरेजेसमधील धोके, याचा त्यात अभ्यास करण्यात आला आहे. उत्तर अमेरिकेत, उन्हाळ्याच्या काळात, विशेषत: ऑगस्ट महिन्यात, आठ आठवड्यांच्या आत होणाऱ्या गर्भपाताचा धोका 44 टक्के अधिक आहे. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. मात्र प्रेग्नन्सीच्या कोणत्याही आठवड्यात मिसकॅरेज होण्याचे प्रमाण फेब्रुवारी महिन्यापेक्षा ऑगस्टच्या शेवटी अधिक आहे. दक्षिण आणि मध्यपूर्व भागांत, जिथे कडकडीत उन्हाळा असतो, तिथे ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्यात मिसकॅरेजचे प्रमाण अधिक असते. कडक उन्हाळा, तापमानातील बदल तसेच बदलती जीवनशैली आणि मिसकॅरेज यांचा परस्परसंबंध समजून घेण्यासाठी आणखी अभ्यासाची गरज असल्याचेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

एखाद्या हंगामातील, ऋतूतील भिन्नता, त्याचे परिणाम पाहिल्यास त्यामागची कारणे लक्षात येतात, असे BUSHPमधील एपिडेमीलॉजीच्या रिसर्च असिस्टंट प्रोफेसर , डॉ. ॲमेलिया वेसलिंक यांनी सांगितले. जेव्हा कडकडीत उन्हाळा असतो तेव्हा ( विशेषत: आठ आठवड्यांपूर्वी होणाऱ्या) मिसकॅरेजेसचा धोका अधिक होता, असे आम्हाला आढळले. उन्हाळ्याच्या काळातील असे कोणते घटक मिसकॅरेजसा”R कारणीभूत ठरतात, हे शोधावे लागेल, असे डॉ. वेसलिंक यांनी नमूद केले. यासाठी वेसलिंक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी BUSPH-बेस्ड प्रेग्नन्सी स्टडी ऑनलाइन प्लानर्सच्या डेटाचा अभ्यास केला.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.