उन्हाळ्यात आंब्याचा रस पिण्याचे फायदे माहित आहेत का? वाचा
आंबा स्वादिष्ट तसेच अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. जर तुम्ही उन्हाळ्याच्या हंगामात आंब्याचा रस प्यायला तर तो तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. चला तर मग जाणून घेऊया आंब्याचा रस प्यायल्याने कोणते फायदे होतात...
आंब्याचा हंगाम येत आहे. आंबा हा सर्वांचा आवडता असतो. तसे आंब्याचे अनेक प्रकार आहेत. आंबा चवीला अतिशय चवदार असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तो आवडतो. त्याचबरोबर आंब्याच्या चवीबद्दल तुम्ही ऐकलं असेल पण त्याच्या फायद्यांबद्दल माहिती नसेल. होय, आंबा स्वादिष्ट तसेच अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. जर तुम्ही उन्हाळ्याच्या हंगामात आंब्याचा रस प्यायला तर तो तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. चला तर मग जाणून घेऊया आंब्याचा रस प्यायल्याने कोणते फायदे होतात…
उन्हाळ्यात आंब्याचा रस पिण्याचे फायदे
कोलेस्टेरॉल
आंब्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती मजबूत राहते. कारण हे शरीरातील लो डेन्सिटी लिपोप्रोटिन्स कमी करण्यास उपयुक्त आहे, तर रोज आंब्याचा रस प्यायल्यास रक्ताभिसरण व्यवस्थित राहते, ज्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. यासोबतच तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार होत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात दररोज आंब्याचा रस पिऊ शकता.
बीपी नियंत्रित होतो
आंब्याच्या रसात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे उन्हाळ्यात रोज आंब्याच्या रसाचे सेवन केल्यास तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो तसेच स्ट्रोक आणि हार्ट अटॅकची समस्या उद्भवत नाही.
डोळ्यांसाठी फायदेशीर
आंब्याचा रस व्हिटॅमिन सी तसेच व्हिटॅमिन ए ने समृद्ध आहे, जो आपल्या दृष्टीसाठी थेट चांगला आहे. अशावेळी जर तुम्ही रोज आंब्याच्या रसाचे सेवन केले तर तुम्हाला डोळ्यांशी संबंधित समस्या होत नाहीत आणि दृष्टीही तीक्ष्ण होते.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)