AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Benefits Of Flax Seeds : सुपर फूड अळशी, रोज 1 चमचा अळशी खाल्ल्याने होतील चमत्कारिक फायदे

आपल्या पैकी अनेक जण लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी एक उपयुक्त असे औषध म्हणजे 'अळशी' (Flax) या बिया वजन कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

Health Benefits Of Flax Seeds : सुपर फूड अळशी, रोज 1 चमचा अळशी खाल्ल्याने होतील चमत्कारिक फायदे
alshi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 12:05 PM

मुंबई : आपल्या पैकी अनेक जण लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी एक उपयुक्त असे औषध म्हणजे ‘अळशी’ (Flax) या बिया वजन कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अळशीमध्ये आरोग्याचा खजिना लपलेला असतो. त्याचे सेवन आरोग्याशी संबंधित बर्‍याच समस्यांपासून वाचवू शकते. अळशीच्या बिया हृदयासाठीही फायदेशीर आहेत, परंतु जर आपण कोणत्याही प्रकारच्या शारीरिक समस्येने ग्रस्त असाल तर अळशीच्या बिया सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. सुका मेवा (Dry fruits) आणि बिया या प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत मानले जातात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मूठभर सुका मेवा खाल्ल्यास तुम्हाला आवश्यक ती पोषकतत्वे मिळतात तसेच भूकही कमी होते. बदाम, काजू, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया यात बरीच पोषकतत्वे असतात. ते हेल्दी (Health) तसेच पौष्टिक असतात.

हृदयरोग कमी करण्यास उपयुक्त

अळशी अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. यात ओमेगा 3 फॅटी एसिड प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हेच कारण आहे की अळशी पचन सुधारते.अळशी च्या बिया मधुमेह, कर्करोग आणि हृदय रोगाचा धोका कमी करण्यास देखील मदत करते.

रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास उपयुक्त

अळशी कोलेस्ट्रॉलसाठी उपयुक्त आहेत. अभ्यासानुसार, अळशी रोज खाल्ल्याने तुमच्या कोलेस्ट्रॉल ची पातळी 6 ते 11 टक्क्यांनी कमी होऊ शकते. हे शक्य आहे, कारण त्यात फायबर आणि लिग्ननचे प्रमाण जास्त आहे.

पचनशक्ती सुधारते

अळशी चे नियमित सेवन केल्यास आपण पाचक शक्ती वाढवू शकता. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनशक्ती वाढवते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.

अळशीचे शरीराला होणारे फायदे :

  1. शरीरासाठी आवश्यक असलेले ओमेगा-३ फॅडी अ‍ॅसिड्स, इसेन्शियल फॅडी अ‍ॅसिड्स अळशीमध्ये असतात.
  2. अळशीचा थेट फायदा हृदयाच्या आरोग्यासाठी होतो.
  3.  या पदार्थामध्ये वनस्पतीजन्य इस्ट्रोजेन आणि अ‍ॅण्टी अ‍ॅसिड्स देखील भरपूर प्रमाणात असतात.
  4. उन्हाळ्यामध्ये तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर 2 ते 3 चमचे अळशी तुम्हाला त्यासाठी मदत करेल.
  5.  अळशीमुळे शरीराला भरपूर फायबर सुद्धा मिळते.
  6. रक्तदाब, हृदयाच्या ठोक्यांची गती समान स्तरावर आणण्यास अळशी उपयुक्त ठरते.

हेही वाचा:

गर्भधारणेतील ‘ही’ पाच लक्षणं आहेत अगदी सामान्य…असे होतात शारीरिक बदल

Health Care Tips : वाचा उष्माघात होण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय डाॅक्टरांकडूनच!

OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?.
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.