Superfoods : हिवाळ्याच्या दिवसात सर्दी फ्लू पासून बचाव करायचाय, ‘ही’ सुपरफुडस तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर

हिवाळ्याच्या दिवसात अनेकांना सर्दी आणि फ्लूचा आजार होतो. यादरम्यान आरोग्याबाबत अनेक समस्या निर्माण होतात. या काळात व्हायरल इन्फेक्शन होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती चांगली असणं आवश्यक आहे.

Superfoods : हिवाळ्याच्या दिवसात सर्दी फ्लू पासून बचाव करायचाय, 'ही' सुपरफुडस तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 1:27 PM

हिवाळ्याच्या दिवसात अनेकांना सर्दी आणि फ्लूचा आजार होतो. यादरम्यान आरोग्याबाबत अनेक समस्या निर्माण होतात. या काळात व्हायरल इन्फेक्शन होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती चांगली असणं आवश्यक आहे. सिझनल व्हायरल इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी काही पदार्थ तुमच्या खाण्यामध्ये असणं आवश्यक आहे. आहारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळ्याच्या काळात काही सुपरफूडसचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे. हे पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

लसूण

लसूण हा घटक आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून ओळखला जातो. भारतीय लोकांच्या घरी बनवल्या जाणाऱ्या जेवणामध्ये लसूण समाविष्ट असतो. लसूण हा रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो. विविध प्रकारच्या कॅन्सरपासून संरक्षण होण्यासाठी देखील लसूण फायदेशीर ठरतो. लसणामध्ये एलिन नावाचा घटक असतो. हा सर्दी आणि फ्लूशी लढण्यास फायदेशीर ठरतो.

आले

आले ऑक्सीडेटिव्ह आणि संसर्ग विरोधक असतंय. सर्दीच्या काळात गळ्यात होणारी खवखव दूर करण्यामध्ये आलं उपोयोगी ठरतंय. अभ्यासानुसार मानवी ह्रदयासाठी देखील आले फायदेशीर आहे. यामध्ये बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सीडंटस असतात.

व्हिटामीन सी असणारी फळं

संत्री, लिंबू, किवी यासारख्या फळांमध्ये व्हिटामीन सी असतं. हे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरतेय. व्हिटामीन सी रक्तातील पांढऱ्या पेशी वाढवण्याचं काम करतात.

दही

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दही देखील फायदेशीर ठरतं. दही खालल्यानं मेटाबॉलिज्म वाढते. दही कोणत्याही प्रकारे सेवन करु शकता. मात्र, बाजारातील प्रक्रिया झालेलं दही खाण्यापासून दूर राहावं. दह्यामध्ये लॅक्टोबेसिलस असते त्यामुळं शरिरात होणारे रोग कमी होण्यास मदत होते.

मध

मधाचा वापर भारतीय कुटुंबामंध्ये गेल्या अनेक वर्षांपासून केला जात आहे. मध्यामधे जंतू विरोधक गुण असतात. त्याचा फायदा मानवी आरोग्याला होतो.

टीप: वर देण्यात आलेली माहिती प्राथमिक माहितीवर आधारीत आहे. सर्दी आणि ताप झाल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करुन घ्यावी.

इतर बातम्या

शरद पवारांकडे निर्मात्यांनी मांडली भूमिका, किरण माने प्रकरणाला वेगळे वळण

Kiran Mane : किरण माने यांच्या समर्थनार्थ ‘राधिका’ मैदानात, म्हणाली, ‘माझा त्यांना फुल्ल सपोर्ट!’

Superfoods in marathi Include these superfoods in the diet to avoid viral infections in winter

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.