‘सयामी’ जुळ्यांवर शस्त्रक्रिया वैद्यकीय विश्वासाठी ठरली..मैलाचा दगड; अथक प्रयत्नाअंती यशस्वी शस्त्रक्रिया!
भारतात जोडलेल्या जुळ्या मुलांचे प्रकरण नुकतेच समोर आले होते ज्यात नवजात बाळाला दोन डोके, तीन हात आणि दोन हृदय होते. अशी जटीलशस्त्रक्रिया ब्राझील मध्ये नुकतीच पार पडली. जाणून घ्या, शस्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती.
‘डायसेफॅलिक पॅराफॅगस’ स्थितीमुळे एकत्रित जुळी मुले (conjoined twins) जन्माला येतात. हा एक अत्यंत दुर्मिळ आजार (rare disease) आहे. या स्थितीसह जन्मलेल्या मुलांची जगण्याची शक्यता खूपच कमी असते. बहुतेक प्रकरणांमध्ये, या स्थितीसह जन्मलेली मुले जन्मापूर्वी किंवा जन्मानंतर लगेचच मरतात. अशी जुळी मुले पेल्वीस (श्रोणि), उदर किंवा छाती यांनी एकत्र जोडलेली असतात परंतु त्यांची डोकी वेगळी असतात. या व्यतिरिक्त, अशा जुळ्यांना दोन, तीन किंवा चार हात आणि दोन किंवा तीन पाय असू शकतात. अशा मुलांमध्ये, शरीराचे अवयव कधीकधी एकसारखे असतात किंवा भिन्न असू शकतात. सयामी जुळ्यांची (एकमेकांना जोडलेली मुले) अनेक प्रकरणे जगभर वेळोवेळी समोर येत असतात. अलीकडेच, भारतात जोडलेल्या जुळ्या मुलांचे प्रकरण नुकतेच समोर आले होते ज्यात नवजात बाळाला दोन डोके, तीन हात आणि दोन हृदय होते. अशी जटील शस्त्रक्रिया (Complex surgery) ब्राझील मध्ये नुकतीच पार पडली असून वैद्यकीय शास्त्रासाठी ही शस्त्रक्रिया मैलाचा दगड ठरणार आहे.
दोन मुलांना केले वेगळे
झीलमध्ये जोडलेल्या जुळ्या मुलांचे प्रकरण समोर आले आहे जिथे डॉक्टरांनी या मुलांवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करून त्यांना व्हर्च्युअल रिॲलिटी टेक्नोलॉजी द्वारे(आभासी वास्तव तंत्रज्ञानाद्वारे) वेगळे केले. बर्नार्डो आणि आर्थर लिमा अशी या दोन्ही मुलांची नावे आहेत. बर्नार्डो आणि आर्थर लिमा यांच्यावर रिओ डी जनेरियोमध्ये 7 शस्त्रक्रिया झाल्या. ग्रेट ऑरमंड स्ट्रीट हॉस्पिटलचे बालरोग शल्यचिकित्सक नूर उल ओवासे जिलानी यांच्या देखरेखीखाली या मुलांची ही शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलांच्या अंतिम शस्त्रक्रियेला डॉक्टर,नर्सेसहीत सुमारे 100 मेडीकलस्टाफचा सहभाग असलेल्या 33 तासांपेक्षा जास्त वेळ लागला.
आधी केला शस्त्रक्रियेचा सराव
या संपूर्ण शस्त्रक्रियेचे नेतृत्व नूर उल ओवासे जिलानी तसेच डॉ. गॅब्रिएल मुफारेजो यांनी केले. ही शस्त्रक्रिया सुरू करण्यापूर्वी, शल्यचिकित्सकांनी अनेक महिने आभासी वास्तविकतेसह हे शस्त्रक्रियेसाठीचा सराव केला. त्यानंतरच अंतिम शस्त्रक्रिया करण्यात आली. श्री. जिलानी यांनी या जटिल शस्त्रक्रिया यशस्वी हेाणे हे एक मोठे यश असल्याचे वर्णन केले. जिलानी म्हणाले, बर्नार्डो आणि आर्थरला वेगळे करणे हे खूप गुंतागुंतीचे काम होते. अनेक शल्यचिकित्सकांना याचा विचारही करता आला नाही. अशी प्रकरणे जगभर क्वचितच पाहायला मिळतात.
अडीच वर्षापासून घेत होते काळजी
डॉ. मुफरेजो यांनी सांगितले की, ते काम करत असलेल्या रुग्णालयात या दोन्ही मुलांची गेल्या अडीच वर्षांपासून काळजी घेतली जात आहे. दोन्ही मुलांची ही शस्त्रक्रिया आयुष्य बदलून टाकणारी होती. “या दोन मुलांचे पालक अडीच वर्षांपूर्वी रोराईमा येथून रिओला आले होते, त्यानंतर ते येथील रुग्णालयात आमच्या कुटुंबाचा एक भाग बनले,” असेही ते म्हणाले. डॉ. मुफ्रेझो म्हणाले, “आम्ही खूप आनंदी आहोत की ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि ही मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयुष्य बदलणारी संधी आहे. शस्त्रक्रियेनंतर दोन्ही मुलांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अशी होतात सयामी जुळे
गर्भधारणेच्या काही आठवड्यांनंतर, फलित अंडी दोन स्वतंत्र भ्रूणांमध्ये विभाजित होते. त्यानंतर त्यामध्ये अवयवांच्या निर्मितीचे काम सुरू होते. जेव्हा असे घडते, तेव्हा जुळी मुले जन्माला येतात, परंतु काही प्रकरणांमध्ये, गर्भाची विभक्त होण्याची प्रक्रिया मध्यभागी थांबल्यामुळे संयुक्त जुळी मुले जन्माला येतात. जोडलेल्या जुळ्यांचे वर्गीकरण शरीराच्या कोणत्या भागाशी किंवा कोणत्या भागाशी आहे या आधारावर केले जाते. अनेक वेळा अशी मुले शरीराचे समान भाग एकमेकांशी जोडलेले असतात.