Omicron | घाबरवणाऱ्या ओमिक्रॉनवर दिलासादायक संशोधन, नव्या विषाणूशी लढणार शरीरातील खास घटक

अँन्टीबॉडिज अयशस्वी झाल्यावर हाडांना मजबूत करणाऱ्या टी-पेशी (T-सेल्स) देणार ओमिक्रॉनवर मात देतात. 'ओमिक्रॉनवर' झालेले हे संशोधन दिलासा देणारे आहे. जेव्हा शरीरातील अँन्टीबॉडिज ओमिक्रॉनचा सामना करण्यास अपयशी ठरतात तेव्हा टी-पेशी ओमिक्रॉनचा सामना करतात. तर बघूया या टी-पेशी ओमिक्रॉनला कशा हरवतात.

Omicron | घाबरवणाऱ्या ओमिक्रॉनवर दिलासादायक संशोधन, नव्या विषाणूशी लढणार शरीरातील खास घटक
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 4:27 PM

ओमिक्रॉनवर (Omicron) झालेल्या संशोधनामध्ये (New Study) अलीकडच हाती आलेले संशोधन अत्यंत सकारात्मक आहे. मेलबर्न विद्यापीठाचे (Melbourne University) संशोधक मँथ्यू मैके यांच्यानुसार हे संशोधन ओमिक्रॉनच्या संकटात दिलासादायक ठरले आहे. संशोधनानुसार जेव्हा ओमिक्रॉनवर मात देण्यासाठी शरीरातील अँन्टीबॉडिज (Anti-Body) कमी पडतात. तेव्हा शरीरातील टी- पेशी फायदेशीर ठरतात. मेलबर्न युनिव्हर्सिटी आणि हॉंगकॉंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. संशोधकांनुसार व्हायरसचा सामना करताना शरीरातील ‘ सेकंड लाइन ऑफ डिफेन्स’ म्हटले जाणारे टी सेल्स फायदेशीर ठरली आहेत.

टी-पेशी व्हायरसवर कशी मात करतात?

कोरोनाच्या दुसऱ्या व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉनमध्ये सर्वाधिक म्युटेशन झाले आहे. असे म्हणतात की, या म्युटेशनमुळे लस घेतलेल्या शरीरातील अँन्टीबॉडिजवर व्हायरस मात करतो. अशावेळी जर त्या व्यक्तीच्या शरीरात ओमिक्रॉनने प्रवेश केला तर टी-पेशी पुढे येतात आणि ओमिक्रॉनचा सामना करतात. या खास टी- पेशी अस्थिमज्जेत ( Bone Marrow) असतात. या संशोधनासाठी ओमिक्रॉनवर टी- पेशींचा प्रभाव समजून घेण्यासाठी संशोधकांनी करोनाच्या व्हायरल प्रोटीनच्या तुकड्यांचा अभ्यास केला. या तुकड्यांना एपिटोप्स म्हणतात. करोना होऊन गेलेले रूग्ण आणि लस घेतलेल्या व्यक्तींच्या शरीरातून हे प्रोटीन घेण्यात आले. संशोधक अहमद अब्दुल यांच्यानुसार टी -पेेशी संक्रमण होण्यापासून पूर्णपणे ब्लॉक करत नाही.

अभ्यासातून काय समोर आलं?

याऊलट त्या संपूर्ण शरीरात संक्रमण पसरू नये याची काळजी घेतात. यामुळे टी-पेशींपासून मिळणारी इम्युनिटी ओमिक्रॉनसारख्या आजारापासून सुरक्षित ठेवतात असे दिसून येते. रूग्णांकडून रूग्णांकडून घेतलेल्या सँम्पलवर संशोधन करणाऱ्या न्यू साउथ वेल्स युनिव्हर्सिटीचे संशोधक डॉ. स्टुअर्ट टर्विले म्हणतात की, टी-पेशींंचा इम्यून प्रतिसाद ( रिस्पॉन्स) हे बँकअपचे काम करतात. या पेशी व्हायरसला लक्षात ठेवतात. अगदी सोप्या भाषेत सांगायला गेले तर टी आणि बी पेशी मिळून अँन्टीबॉडिज तयार करतात. या पेशींची स्वतःची स्मरणशक्ती असते. व्हायरस शरीरावर कसा हल्ला करतो हे या लक्षाशीत ठेवतात. याच स्मरणशक्तीच्या आधारावर त्या व्हायरसला रोखतात. सुरुवातीच्या संशोधनातील परिणाम सकारात्मक आले असे मेलबर्न युनिव्हर्सिटीचे संशोधक मँथ्यू मैके म्हणाले.

मँथ्यू यांच्यानुसार संशोधनाची सुरूवात आणि मिळालेले परिणाम सकारात्मक होते. या संशोधनानुसार केवळ ओमिक्रॉनच नव्हे तर इतर व्हेरियंटनेही शरीराला गाठले आणि अँन्टीबॉडिज व्हेरियंटचा सामना नाही करू शकले तरीही टी-पेशी बचाव करतात.

कोरोनाच्या इतर बातम्या –

Online Work: या टिप्स फाॅलो करा आणि डोळ्यांची काळजी घ्या…

धनुष, सारा आणि अक्षय स्टारर ‘अतरंगी रे’मध्ये दाखवलेला PTSD आजार म्हणजे नेमकं काय? जाणून घेऊ

हिवाळ्यात फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर!

Postpartum Care | बाळंतपणानंतरही पुन्हा सडपातळ व्हा, वजन नियंत्रणासाठी घरगुती उपाय

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.