Health Care : गर्भपात का होतो? जाणून घ्या 4 मोठी कारणे आणि अशाप्रकारे घ्या काळजी!

जेव्हा एखादी स्त्री गर्भवती राहते. त्यावेळी संपूर्ण कुटुंबच आनंदी असते. विशेषतः मुलाचे पालक जन्मापूर्वीच आपल्या मुलाशी भावनिकरित्या जोडले जातात. गर्भवती महिला आणि तिचा पत्नी येणाऱ्या बाळाबद्दल सुंदर स्वप्न रंगवतात. तसेच येणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट देखील बघतात

Health Care : गर्भपात का होतो? जाणून घ्या 4 मोठी कारणे आणि अशाप्रकारे घ्या काळजी!
गर्भपात
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 8:12 AM

मुंबई : जेव्हा एखादी स्त्री गर्भवती राहते. त्यावेळी संपूर्ण कुटुंबच आनंदी असते. विशेषतः मुलाचे पालक जन्मापूर्वीच आपल्या मुलाशी भावनिकरित्या जोडले जातात. गर्भवती महिला आणि तिचा पत्नी येणाऱ्या बाळाबद्दल सुंदर स्वप्न रंगवतात. तसेच येणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट देखील बघतात. (Take care in this way to prevent miscarriage)

यादरम्यानच एखाद्या महिलेचा गर्भपात झाला तर सर्वांनाच मोठा धक्का बसतो. याचा परिणाम केवळ स्त्रीवरच नाही तर तिच्या पतीवर आणि संपूर्ण कुटुंबावर देखील होतो. तज्ज्ञांच्या मते, गर्भपाताचे नेमके कारण सांगता येत नाही, परंतु काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींमध्ये स्त्रीला सतर्क राहण्याची गरज असते.

थायरॉईड : थायरॉईड ही आजकाल एक अतिशय सामान्य समस्या आहे. या समस्येचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. साधारणपणे, स्त्रिया ही समस्या सामान्य मानतात. परंतु जर तुम्हाला गर्भधारणेदरम्यान थायरॉईड असेल तर तुम्ही खूप सावध असणे आवश्यक आहे. कारण ही हार्मोनशी संबंधित समस्या आहे. थायरॉईड असलेल्या महिलेनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली असणे खूप महत्वाचे आहे. कारण कधीकधी ते गर्भपात होण्याचे कारण बनते.

मधुमेह : अनेक महिलांना गर्भधारणेदरम्यान गर्भधारणेचा मधुमेह होतो. अशा परिस्थितीत महिलांनी वेळोवेळी तज्ज्ञांकडून स्वत: ची तपासणी करत राहावे. मधुमेहामुळे कधीकधी सुरुवातीच्या महिन्यात गर्भपात होऊ शकतो. या व्यतिरिक्त, मधुमेहामुळे मुलामध्ये विकार होण्याचा धोका असतो.

हार्मोनल असंतुलन : जर एखाद्या स्त्रीला आधीच हार्मोनल समस्या असेल किंवा तिच्या शरीरात पुरेसे प्रोजेस्टेरॉन हार्मोन तयार होत नसेल. जे गर्भाशयाच्या आवरणाला आधार देण्यासाठी आवश्यक असतात. तर गर्भपात होण्याची शक्यता वाढते. जर ही समस्या वेळीच समजली तर औषधांद्वारे ही स्थिती नियंत्रित केली जाऊ शकते.  

फायब्रॉईड्स : गर्भाशयाच्या फायब्रॉईड गर्भाशयाचे दोष किंवा स्वयं रोगप्रतिकार विकार देखील कधीकधी गर्भपात होण्याचे कारण बनतात. अशा कोणत्याही वैद्यकीय स्थितीच्या बाबतीत आपण अत्यंत सावध असले पाहिजे. तसेच तज्ञांच्या सूचनांचे पूर्णपणे पालन केले पाहिजे. जेणेकरून गर्भपातासारखी समस्या टाळता येईल.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Take care in this way to prevent miscarriage)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.