Hair care during monsoons : पावसाळ्यात केसांची अशी घ्या काळजी, केसांच्या समस्या टाळण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो!

पावसाळ्यात आद्रता लक्षणीय वाढते. त्यामुळे केसांमध्ये घाम येऊन केस कमकुवत होतात. टाळूवर खाज येणे, केसांत कोंडा होणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या ऋतूत केसांशी संबंधित समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता.

Hair care during monsoons : पावसाळ्यात केसांची अशी घ्या काळजी, केसांच्या समस्या टाळण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो!
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 9:14 PM

मान्सून हा उन्हाळ्यापासून दिलासा देण्याचे काम करतो. परंतु, या ऋतूमध्ये केवळ सर्दी, खोकल्यासारख्या आरोग्याच्या समस्यांना (Health problems) तोंड द्यावे लागत नाही तर केसांशी संबंधित अनेक समस्यांनाही तोंड द्यावे लागते. या ऋतूत केस खूप गळायला लागतात. केसांमध्‍ये कोंडा, खाज सुटणे आणि इन्फेक्‍शन होणे हे सामान्य आहे. अशा परिस्थितीत केसांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. दमट हवामानामुळे टाळूवर कोंडा (Dandruff on the scalp) होण्यास सुरुवात होते. यामुळे टाळूवरही खाज येते. टाळूमध्ये जास्त प्रमाणात सेबम जमा झाल्यामुळे केस कमकुवत होतात. त्यामुळे केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या उद्भवते. केसांशी संबंधित (Pertaining to hair) समस्या टाळण्यासाठी तुम्ही अनेक टिप्स फॉलो करू शकता. या टीप्स पावसाळा ऋतूमध्ये तुम्हाला येणाऱ्या केसांच्या समस्यांपासून आराम देण्याचे काम करेल.

केस ओले ठेवू नका

पावसात भिजल्यानंतर केस कधीही ओले ठेवू नका. जर तुम्हाला शॅम्पूने केस धुता येत नसतील तर साध्या पाण्याने केस धुवा. त्यानंतर केस सुकण्यासाठी मोकळे सोडा. ओले केस बांधू नका.

मायक्रोफायबर टॉवेल

केस सुकविण्यासाठी तुम्ही मायक्रोफायबर टॉवेल वापरू शकता. त्यामुळे केस व्यवस्थित कोरडे होण्यास मदत होते. या ऋतूत ओले केस विंचरणे टाळा. ओल्या केसांना कंगवा केल्याने केस तुटतात.

हे सुद्धा वाचा

हाताने कंगवा

पावसाळ्यात केस कोरडे आणि कमकुवत होतात. या दरम्यान केसांमध्ये जास्त कंघवा करू नये. तुम्ही हलक्या हाताने केसांचा गुंता काढू शकता. या ऋतूमध्ये केस धुतल्यानंतर लगेच कंगवा करू नका. तुम्ही वापरत असलेला कंगवा इतर कोणालाही वापरू देऊ नका. त्यामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो.

निरोगी आहार

पावसाळ्यात केस निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. हे केसांना खोलवर पोषण देण्याचे काम करते. आपण आहारात पोषक तत्वांनी समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट करू शकता. प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, खनिजे आणि निरोगी चरबी समृध्द असलेले अन्न. हे केसांसाठी खूप फायदेशीर आहेत.

तेल मालीश

या ऋतूत केसांना नियमित तेलाने मसाज करा. केसांच्या आणि टाळूच्या मसाजसाठी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. हे रक्ताभिसरण सुधारण्याचे काम करते. यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.