World TB Day 2022 : टीबी हा सर्वात घातक संसर्गजन्य आजार, जाणून घ्या या आजाराशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती एका क्लिकवर
टीबी (TB) म्हणजेच क्षयरोग हा जगातील सर्वात घातक संसर्गजन्य आजार मानला जातो. हा रोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो आणि फुफ्फुसांवर (Lungs) परिणाम होतो. टीबी हा इतर अवयवांवर देखील परिणाम करू शकतो, परंतु जास्त समस्या फुफ्फुसांनाच असते.
मुंबई : टीबी (TB) म्हणजेच क्षयरोग हा जगातील सर्वात घातक संसर्गजन्य आजार मानला जातो. हा रोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो आणि फुफ्फुसांवर (Lungs) परिणाम होतो. टीबी हा इतर अवयवांवर देखील परिणाम करू शकतो, परंतु जास्त समस्या फुफ्फुसांनाच असते. टीबीची सुरूवातीची लक्षणे (Symptoms) लोकांना समजण्यास उशीर होतो. बर्याच वेळा लोक टीबीच्या लक्षणांना सामान्य म्हणून दुर्लक्ष करतात, अशावेळी हा आजार गंभीर स्थितीत पोहोचतो आणि काही वेळा तो प्राणघातक ठरतो.
टीबी होण्याची काही कारणे खालीलप्रमाणे
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणे, धुम्रपान किंवा जास्त प्रमाणात मद्यपान, संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्याने, स्वच्छतेची काळजी न घेतल्यामुळे, लहान मुले, वृद्ध, गरोदर स्त्रिया, किडनीचे आजार, मधुमेह किंवा इतर जुनाट आजारांनी ग्रस्त लोकांची रोगप्रतिकारक शक्ती अनेकदा कमकुवत होते. ज्यामुळे त्यांना या आजाराचा धोका वाढतो. याशिवाय ज्या लोकांचे अवयव प्रत्यारोपण, कॅन्सरच्या उपचारासाठी केमोथेरपी झाली आहे, असे लोकही टीबीच्या बाबतीत हाय रिस्क झोनमध्ये येतात.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, धाप लागणे, भूक न लागणे किंवा कमी होणे, थकवा किंवा अशक्तपणा, वजन कमी होणे, ताप, रात्री घाम येणे, कधीकधी श्लेष्मामध्ये रक्त येणे. आजच्या काळात हा आजार वाढतच जात आहे. त्यासाठी लोकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. एकदा क्षयरोगाची पुष्टी झाल्यानंतर, विशेषज्ञ सहा ते नऊ महिन्यांचा कोर्स करून त्यावर उपचार करतात. जर क्षयरोगाने गंभीर स्वरूप धारण केले असेल, तर हा उपचार 18 ते 24 महिन्यांपर्यंत चालू शकतो. परंतु उपचारात अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.
उपचार नेमका कसा केला जातो!
टीबीवर उपचार सुरू असताना औषधांमध्ये अंतर येऊ देऊ नका. अन्यथा उपचार पुन्हा सुरू करावे लागतील. त्यामुळे या बाबतीत तज्ज्ञांच्या सूचनांचे पालन करा. टीबीची लागण झालेल्या लोकांपासून योग्य अंतर ठेवा. स्वच्छतेची काळजी घ्या. कोणाशीही बोलत असताना नाक-तोंडावर कपडा ठेवा. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करा. नियमित व्यायाम करा. विशेष म्हणजे टीबी असलेल्या रूग्णांने नेहमीच इतरांना बोलताना किंवा घरामध्ये, सार्वजनिक ठिकाणी तोंडाला रूमाल बांधावा.
(टीप : ही माहिती फक्त सामान्य ज्ञानाच्या उद्देशाने देण्यात आली आहे. तुम्ही कोणत्याही आजारतात औषधोपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आजारवर उपचार सुरू करा.)
संबंधित बातम्या :
World TB Day : 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन का साजरा केला जातो?