डोकेदुखी होईल कायमची दूर, विशेष प्रकारची इम्प्लांट पद्धत करेल कमाल ,जाणून घ्या याबद्दल सविस्तर !
Teflon patch disables headaches: ज्या व्यक्तींना डोकेदुखीची समस्या जास्त असते, अश्या रुग्णांचा समावेश या ट्रायलमध्ये करण्यात आला होता. नेमकी काय आहे या इम्प्लांटचे कार्य पद्धती..
मुंबईः एका छोट्याश्या इम्प्लांट (Implant) च्या मदतीने आपण आपली डोकेदुखी कायमची दूर होऊ शकते. डॉक्टर्स इम्प्लांट आपल्या मेंदूच्या अशा भागात लावतील ज्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची वेदना होत आहे याची जाणीव देणाऱ्या नर्वला ब्लॉक केले जाऊ शकते असे झाल्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारची डोकेदुखी जाणवणार नाही. असे समजून घ्यायची झाल्यास डोकेदुखी जेव्हा आपल्याला होते तेव्हा नर्वस (Brain nerves) सिस्टम मेंदूपर्यंत याचा संदेश पोचवत असते परंतु नव्याने विकसित करण्यात आलेल्या या इम्प्लांटच्या मदतीने तुम्हाला डोकेदुखी(headache) झाली आहे अशा प्रकारचा संदेश देणाऱ्या सर्व नर्वस त्यांना ब्लॉक करण्यात येईल. यामुळे भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची डोकेदुखी उद्भवण्याची शक्यताच होणार नाही म्हणूनच या ट्रायल पद्धतीचा वापर केला जाणार आहे परंतु अद्याप या ट्रायलचे परिणाम समोर यायचे बाकी आहेत. नेमका काय आहे इम्प्लांट? कशा प्रकारे यशस्वी ठरत आहे याचे ट्रायल अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून.
कोण करत आहे या प्रकारचा प्रयोग
हा प्रयोग ब्रिटेनची हेल्थ एजेंसी NHS चे फाउंडेशन ट्रस्ट सेंट गायज सेंट थोमस यांच्यावतीने केले जाते आहे. डेलीमेलच्या रिपोर्टमध्ये असा दावा केला गेला आहे की,या इम्प्लांटच्या माध्यमातून डोकेदुखीचा उपचार करण्यास खूपच सहजता प्राप्त होणार आहे तसेच या प्रयोगांमध्ये जि नर्व सिस्टम असते त्या सिस्टमला ब्लॉक केले जाईल. जी नस मोठ्या प्रमाणामध्ये वेदना दर्शवित असते. अशा प्रकारचे ट्रायल आत्तापर्यंत किती रुग्णांवर केले गेलेले आहे याच्या बद्दल ची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल. रिपोर्टनुसार ज्या रुग्णांमध्ये हा प्रयोग करण्यात आलेला आहे त्यातील 50 टक्के रुग्णांमध्ये डोकेदुखीची समस्या पूर्णपणे समाप्त झाली आहे.
कसे केले गेले इम्प्लांट?
रिपोर्टनुसार कानाच्या मागे आणि मानेच्या वरच्या भागामध्ये एक छोटीसी चीप लावले जाईल. येथूनच डोक्यावरील हड्डीचा एक छोटासा भाग काढला जाईल आणि येथे इम्प्लांट केले जाईल. ट्रिगेमाइनल आणि धमनी दरम्यान हा इम्प्लांट बसवला जाईल.या बसवलेल्या इम्प्लांटमुळे तुमची डोकेदुखी थांबेल.
ट्रायल केलेल्या रुग्णांचे नेमके आहे तरी काय म्हणणे …
ट्रायलमध्ये सहभागी झालेले 50 वर्षीय रुग्ण जूलियन बेलसम यांचे असे म्हणणे आहे की,ते 2014 पासून डोकेदुखीच्या समस्येला वैतागले होते. एका कालावधीनंतर डोकेदुखी इतकी वाढायची की त्यांना नकोसे व्हायचे आणि त्यांचे मन करायचे की आता आपण आत्महत्या करावी म्हणूनच मी माझी नाईट ड्युटी असलेली नोकरी सुद्धा या डोकेदुखीमुळे सोडली होती ,त्यांचे म्हणणे असे आहे की मला नेहमी असे वाटायचे कि कोणीतरी मला वारंवार इलेक्ट्रिकचे शॉक देत आहे आणि ह्या सार्या घटना माझ्यासोबत रोज घडायच्या. या डोकेदुखीमुळे माझे जीवन अगदी थांबून गेले होते.
या सर्जरीशी जोडले गेले कंसल्टेंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. गिऑर्गियो लैम्ब्रू यांचे असे म्हणणे आहे की, हा केला गेलेला प्रयोग न्यूरोलॉजी क्षेत्रामध्ये उचललेले मोठे पाऊल ठरेल. आता डोकेदुखीच्या समस्येपासून त्रस्त असलेले रुग्ण आपले जीवन आनंदाने जगू शकतील प्रत्यक्ष नेहमी नव्याने जगण्यासाठी त्यांना सहाय्यक ठरणार आहे. त्यांच्या मते या इम्प्लांटच्या आधारे SUNCT रुग्णांचे उपचार देखील केली जाईल अशा प्रकारच्या घटना प्रामुख्याने वय वर्ष 50 पेक्षा अधिक असणाऱ्या रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतात आणि अशा घटनांमध्ये जास्तीत जास्त डोकेदुखी उद्भवण्याची लक्षण सुद्धा जाणवू लागतात या रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढणारी डोकेदुखी लक्षात घेऊन या अशा नवीन प्रकल्पाचा विचार करण्यात आलेला आहे आणि या प्रयोगाचा भविष्यात अनेकांना लाभ सुद्धा घेता येणार आहे.
संबंधित बातम्या