Testosterone च्या कमतरतेमुळे महिलांना होऊ शकतो ‘या’ समस्यांचा त्रास
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन अने पटींनी कमी असल्याचे आढळून येते, मात्र त्याची पातळी वाढल्याने आणि कमी झाल्याने त्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
टेस्टोस्टेरॉन हे हार्माोन (संप्रेरक) आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असते. मात्र, या हॉर्मोनचं (hormone)नाव घेतल्यावर अनेकदा पुरुषांकडे लक्ष जातं. पुरुषांच्या शारीरिक विकासात या हार्मोनला अतिशय महत्त्व आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. याशिवाय पुरुषांमध्ये स्पर्म्सच्या ( शुक्राणू) उत्पादनासाठीही टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हेच जबाबदार मानलं जातं. पण हे हार्मोन महिलांसाठीही महत्त्वाचं आहे. मात्र महिलांमध्ये (women) या हार्मोनचे प्रमाण खूप कमी असते. महिलांच्या शरीरात या हार्मोनची पातळी वाढल्याने किंवा कमी झाल्यानेही त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकते.
महिलांना सहन करावा लागू शकतो त्रास
हेल्थ शॉट्सच्या एका रिपोर्टनुसार महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत टेस्टोस्टेरोन हे हार्मोन अनेक पटींनी कमी असल्याचे आढळते. मात्र त्याची पातळी वाढल्यास अथवा कमी झाल्यास त्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, महिला प्रणाली इस्ट्रोजेनद्वारे संचलित होते तर पुरुष प्रणाली टेस्टोस्टेरॉन संचलित आहे. महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यास त्यांना कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे जाणून घेऊया.
महिलांवर असा पडतो प्रभाव :
– स्नायूंचे नुकसान
– मूड सतत बदलत राहणे
– थकल्यासारखे वाटणे
– केस गळणे अथवा केस पातळ होणे
– त्वचा कोरडी पडणे.
पुनरुत्पादक टिश्यूज व त्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी खूप महत्वाची ठरते. तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सव्यतिरिक्त अंडाशयामुळे टेस्टोस्टेरॉनही तयार होतो. पिट्यूटरी ग्रंथी अथवा ग्लॅन्ड्स मधून याचे उत्पादन होते.
टेस्टोस्टेरॉन हे महिलांसाठीदेखील आवश्यक असते महिलांच्या आरोग्यासाठी टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन अतिशय महत्वाचे असत. हे हार्मोन त्यांच्या शरीरात वेगवेगळ्या कार्यात मदत करते. टेस्टोस्टेरॉनची सामान्य पातळी स्त्रियांच्या मनःस्थितीवर नियंत्रण ठेवते. याशिवाय हाडांसाठीही हे महत्वपूर्ण ठरते. तसेच महिलांचे स्नायू बळकट रहावेत यासाठीही त्याचा उपयोग होतो.
( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)