शांत झोप लागण्यासाठी फायदेशीर ठरेल 10-3-2-1-0 हा नियम, जाणून घ्या काय आहे 10-3-2-1-0 हा नियम

चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप घेणे देखील आवश्यक आहे. मात्र अनेक जणांना शांत आणि गाढ झोप लागत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. झोपेच्या संबंधित एक खास नियम जाणून घेऊ जो तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी मदत करू शकेल.

शांत झोप लागण्यासाठी फायदेशीर ठरेल 10-3-2-1-0 हा नियम, जाणून घ्या काय आहे 10-3-2-1-0 हा नियम
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 3:03 PM

चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप घेणे महत्त्वाचे असते. म्हणूनच डॉक्टर दररोज किमान आठ ते नऊ तास झोपण्याचा सल्ला देतात. परंतु अनेक जण प्रयत्न करून देखील रात्री शांत झोपू शकत नाही त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी सुस्ती वाटते. ही समस्या सारखी वाढत जाते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो.

तुम्हालाही शांत झोप लागत नसेल तर झोपेच्या संबंधित एक खास नियम जाणून घेऊ जो तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी मदत करू शकेल. हा नियम तुम्हाला रोज झोपण्यापूर्वी काही गोष्टी करायला सांगतो. जेणेकरून तुम्हाला चांगली झोप येते.

झोपण्यासाठी 10-3-2-1-0 नियम काय आहे?

या विशेष नियमात 10 म्हणजे झोपण्याच्या दहा तासासाठी कॉफी घेऊ नका. आजकाल बहुतांश लोकांना कॉफी पिण्याचे व्यसन लागल आहे. कॉफीमूळे तुमची झोप खराब होऊ शकते. चांगल्या झोपेसाठी डॉक्टर सुद्धा दहा तास आधी कॉफी न पिण्याचा सल्ला देतात.

हे सुद्धा वाचा

तीन म्हणजे रात्रीचे जेवण झोपण्याच्या तीन तास आधी करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला शांत आणि चांगली झोप हवी असेल तर झोपण्याच्या तीन तास आधी रात्रीचे जेवण करणे आवश्यक आहे. जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे सॅर्कडियन लयवर परिणाम होतो. ज्यामुळे झोपेमध्ये व्यक्त येऊ शकतो.

दोन म्हणजे झोपण्याच्या दोन तास आधी शरीराला विश्रांती देणे गरजेचे आहे. अनेक जण रात्री उशिरापर्यंत काम करतात आणि काम संपल्यानंतर लगेचच झोपायला जातात. यामुळे झोपेवर परिणाम होतो त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दोन तास आधी तुमचे काम संपवणे आवश्यक आहे. असा सल्ला डॉक्टर देतात असे केल्याने तणावाची पातळी कमी होते आणि रात्री शांत झोप लागते.

एक म्हणजे झोपण्यापूर्वी स्क्रीन पासून एक तास दूर राहणे आवश्यक आहे. काहीजण अनेकदा स्क्रीनवर अनावश्यक वेळ घालवतात. ज्यामुळे झोप लागत नाही याशिवाय स्क्रीन मधून येणाऱ्या प्रकाशनेही झोपेत समस्या निर्माण होऊ शकतात. ही समस्या टाळण्यासाठी झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीन पासून दूर रहा.

हा साधा नियम तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत करू शकेल. ज्यामुळे तुमचे आरोग्य ही सुधारेल आणि तुम्ही तणावापासून मुक्त रहाल.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.