228 वर्षांपूर्वी मराठमोळ्या कुंभाराने केली पहिली ‘प्लास्टिक सर्जरी’, लंडनकडून दखल; वाचा, कशी केली सर्जरी

आज अनेक सेलिब्रिटीज आणि श्रीमंत लोक प्लास्टिक सर्जरी करत असतात. (The first plastic surgery was performed 228 years ago in india)

228 वर्षांपूर्वी मराठमोळ्या कुंभाराने केली पहिली 'प्लास्टिक सर्जरी', लंडनकडून दखल; वाचा, कशी केली सर्जरी
kawasji
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 8:04 PM

मुंबई: आज अनेक सेलिब्रिटीज आणि श्रीमंत लोक प्लास्टिक सर्जरी करत असतात. सुंदर दिसण्यासाठी, चेहरा किंवा शरीराला शेप देण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली जाते. त्याचा खर्चही अधिक आहे. परंतु, भारतात पहिली प्लास्टिक सर्जरी तब्बल 228 वर्षांपूर्वी झाली होती. मातीच्या भांड्यांना आकार देणाऱ्या एका कुंभाराने ही प्लास्टिक सर्जरी केली होती. त्याची दखल लंडननेही घेतली होती. कशी होती ही सर्जरी त्याचा घेतलेला हा आढावा. (The first plastic surgery was performed 228 years ago in india)

लेखक चंद्रकांत पाटील यांनी ‘228 वर्षांपूर्वीची… एका मराठ्याची प्लास्टिक सर्जरी’ या शिर्षकाने हा लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी भारतातील पहिल्या प्लास्टिक सर्जरीची रंजक कथा सांगितली आहे. मार्च 1793 साली म्हणजेच तब्बल 228 वर्षांपूर्वी भारतात “प्लास्टिक सर्जरी” ( Plastic Surgery) झाली असेल यावर आपला सहजासहजी विश्वास बसणार नाही. कारण आपल्यापेक्षा इतर राष्ट्रातलं विज्ञान-तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र फार प्रगत असल्याचं आपली धारणा असते. मात्र या ॲापरेशनची धक्कादायक कहाणी 1794 साली लंडनमधल्या ‘द जन्टलमन्स मॅग्झिन ॲन्ड हिस्टॅारिकल क्रोनिकल’ मध्ये “Chirurgical Operation” या नावानेप्रसिद्ध झाली आहे. त्या लेखात उल्लेख केलेल्या भारतातल्या एका ‘कुंभारांची कला’ बरचंकाही सांगून गेली आहे. इतकच नाही तर तो कुंभार चक्क पुण्यातला आहे यावरसुद्धा आपला विश्वास बसणार नाही, असं या लेखाच्या सुरुवातीलाच लेखक चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

कावसजी कोण होता?

1792मध्ये इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यात लढाई झाली. तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध म्हणून हे युद्ध इतिहासात प्रसिद्ध आहे. कावसजी नावाचा एक मराठा शेतकरी बैलगाडीवान म्हणून इंग्रजांच्या बाजूने काम करत होता. हे काम करत असताना टिपू सुलतान यांच्या सैनिकांनी त्याला पकडून कैद केलं होतं. त्यानंतर त्याचा तुरुंगात छळ करण्यात आला होता. कैदेत असताना शिक्षा म्हणून त्याचं नाक कापण्यात आलं होतं. तब्बल 12 महिने तो बिन नाकाचा होता. त्यानंतर कावसजीने संधी मिळताच तुरुंगातून पलायन करून पुणे गाठले होते.

पुण्यात झाली सर्जरी

पुण्यात आल्यावर 1793मध्ये कावसजीने पुण्यातील एका कुंभाराला गाठले होते. या कुंभाराचा विटा बनवण्याचा व्यवसाय होता. त्याबरोबर तो रुग्णांवर उपचारही करत असे. याच ‘शल्यचिकित्सक’ कुंभाराने (Mahratta Surgeon Kumar) कावसजीवर शस्रक्रिया करून नवीन नाक बसवले. म्हणजे त्या काळात ‘प्लास्टिक सर्जरी’ अस्तित्वात होती आणि ती सुद्धा चक्क पुण्यात, असं पाटील या लेखात म्हणतात. Rhinoplasty म्हणजेच कृत्रिम नाक बसवण्याची ही शस्त्रक्रिया होय. त्याकाळी भारतात ही शस्त्रक्रिया काही नवीन नव्हती अशी माहीती या लेखातच आहे. फार प्राचीन काळापासून अशी शस्त्रक्रिया चालत आली असल्याची नोंद बॅाम्बे प्रेसिडन्सितलेदोन ब्रिटीश डॉक्टर्स थॉमस क्रुसो (Thomas Cruso) आणि जेम्स फिन्डले (James Findlay ) यांनी करून ठेवली आहे. त्यांच्या माहितीच्या आधारेच १७९४ साली ‘द जन्टलमन्स मॅग्झिन’ मध्ये “Chirurgical Operation” या नावानेकावसजीच्या फोटोसह या माहितीचा लेख प्रसिद्ध झाला होता.

भारतीय आयुर्वेदातून प्रेरणा

भारतीय आयुर्वेदात अशा शल्यचिकित्सेसाठी ‘सुश्रुत संहिता’ सर्वात महत्वाचा ग्रंथ मानला जातो. त्यामुळे पुण्यातल्या कुंभाराला या शस्त्रक्रियेचं ज्ञान अवगत झालं असणार यात शंका नाही. जेव्हा या कुंभाराने कावसजीवर शस्त्रक्रिया केली तेव्हा मि. थॉमस क्रुसो आणि मि. जेम्स फिन्डले तिथं उपस्थित होते. त्यांच्यासमोरच ही शस्त्रक्रिया घडली होती.

अशी झाली प्लास्टिक सर्जरी

कावसजीच्या नाकावरील शस्त्रक्रियेत पहिल्यांदा कापलेल्या नाकाच्या मापाचा मेणाचा आकार बनवून तो कपाळवर बसवला गेला. या शस्त्रक्रियेसाठी ज्या ठिकाणची त्वचा वापरायची त्या ठिकाणी तो मेणाचा भाग बसवून त्याच्या भोवतीचा आकार रेखाटून कपाळावरची त्वचा कापून घेतली. पण ही त्वचा पूर्णपणे बाजूला न करता दोन डोळ्यांच्या मधला त्वचेचा भाग अखंडपणे तसाच ठेवला. नंतर मेणाला नाकाचा आकार देवून ते कापलेल्या भागावर ठेवले आणि कपाळावरून कापलेली त्वचा त्या मेणावर पसरली. त्यानंतर खैराच्या झाडापासून बनवलेला कात पाण्यात उगळून त्याचा लेप कापडावर लावला. कापडाच्या पाच-सहा पट्ट्या त्या जोडलेल्या भागावर ठेवून त्या ४ दिवसानंतर काढून टाकल्या. पुढे सर्जरी केलेल्या भागावर तूपात भिजवलेला कपडा ठेवून दिला. 25 व्या दिवशी सर्जरी केलेल्या भागाची जखम भरून आली. त्यानंतर नाकाला हवा तसा आकार देवून सुधारणा केली. पुढे 5-6 दिवस कावसजीला झोपून रहावे लागले. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 10 व्या दिवशी पुन्हा त्याच्या नाकपुड्यांमध्ये मऊ कापडाचे बोळे घातले गेले. थोड्या दिवसानंतर कपाळावरील काढलेली त्वचा भरून आली आणि कपाळावरचे व्रणही निघून गेले. कालांतराने कृत्रिम नाक सुरक्षित आणि नैसर्गिक दिसू लागले. अगदी पूर्वीसारखे… त्यामुळे कृत्रिम नाक बसवण्याची ही शस्त्रक्रिया यशस्वी मानली गेली. या शस्त्रक्रियेनंतर दहा महिन्यानंतर म्हणजेच 1794 च्या जानेवारीत जेम्स वेल्स याने त्याचे पेंटिग काढले. सद्या हे पेंटिंग लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. त्या पेंटिगमुळेच भारतातल्या सव्वा दोनशे वर्षांपूर्वीच्या ‘प्लास्टिक सर्जरी’ची कहाणी जतन करता आली, असं या लेखात नमूद करण्यात आलं आहे. (The first plastic surgery was performed 228 years ago in india)

संबंधित बातम्या:

‘देश जळतोय अन् ‘आधुनिक निरो’ प्रचारात मग्न’; कोरोना, औषध टंचाईवरुन काँग्रेसचा मोदींवर निशाणा

LIVE | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मतदान अपेडट, आतापर्यंत 57.81 टक्के मतदान

Corona Cases and Lockdown News LIVE : यवतमाळमध्ये दिवसभरात 26 रुग्णांचा मृत्यू, तर 1048 नवे रुग्ण

(The first plastic surgery was performed 228 years ago in india)

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.